शुक्रवार, १२ जुलै, २०१९

डिक्की देशभरात दलित आदिवासी तरुणांना उद्योजक करणार -मिलिंद कांबळे,परभणीतील 14 तरुणांना एलपीजी टँकर चे वितरण

*डिक्की देशभरात दलित आदिवासी तरुणांना  उद्योजक करणार -मिलिंद कांबळे*

 -- परभणीतील 14 तरुणांना एलपीजी टँकर चे वितरण --


पुणे --- केंद्र सरकारच्या स्टँडप योजनेअंतर्गत तसेच डिक्की (दलित इंडियन चेंबर  ऑफ कॉमर्स )आणि बँक बडोदा यांच्या संयुक्त विदयमाने  डीक्कीचे संस्थापक पदमश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील 14 तरुणांना आज टँकरचे वितरण करण्यात आले .या वेळी बँक ऑफ बडोदाचे डेप्युटी  झोनल हेड हरिष चांद ,बँक ऑफ बडोदाचे पुणे झोनचे मुख्य व्यवस्थापक नितीन जमाणिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

         

या वेळी मार्गदर्शन करताना मिलिंद कांबळे म्हणाले की , बँक ऑफ बडोदाची स्थापना करणारे सयाजीराव गायकवाड यांनी त्याकाळी डाॅ. आंबेडकरांना परदेशी शिक्षणासाठी मदत केली होती .आज बडोदा बॅंकेने दलित तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी मदत करुण इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. 

      पुढे कांबळे म्हणाले की ,आता राज्य सरकारच्या नवीन धोरणे नुसार राज्य सरकार 15 % सहभाग व केन्द्र शासन 25 % असे मिळून 40%सहभाग शासन देणार असल्याने यापुढे येत्या काळात शासनाच्या सहयोगाने डिक्की दलित आदिवासी समाजातील तरुनांना व्यवसायात सक्षमपणे उभे करण्याचे काम करणार आहे.

          यावेळी नितीन जमाणिक म्हणाले की ,बँका या सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठीच आहेत उपेक्षित माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बँका करू शकतात आणि डिक्की ने आमच्याबरोबर मिळून काम करण्याचे ठरवल्याने आम्हाला आज गरजू लोकांना मदत करता येत आहे .

           या वेळी डिक्कीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज आदमाने ,पुणे प्रेसिडेंड अशोक ओहोळ तसेच मराठवाडा विभागाचे प्रमुख प्रफुल्ल पंडित,परभणी समन्वयक प्रफुल्ल पैंठणे प्रकाश साळवे आदिसह लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...