गुरुवार, २५ जुलै, २०१९

विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बैल दगावला,मजुर मात्र बाल-बाल बचावला

*विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बैल दगावला,मजुर मात्र बाल-बाल बचावला*
   
पाथरी प्रतिनिधी:- पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी दी26 वार गुरवार रोजीसकाळी शेतात लावण्यात आलेल्या  विद्युत पोलसाठी लावलेल्या तान तारेला चिमणी नसल्याने तारेत विज उतरल्याने शेतात अतंरगत चालु असताना बेलाचा धक्का या तान तारेला लागल्याने बैलाचा जागिच दगावला.

   
सविस्तर माहीती अशी की,सतत पावसाने पाठ फीरवल्याने आधिच शेतकरी नैसर्गिक संकटाने त्रस्त झाला आहे त्यात विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे पोहेटाकळी येथिल शेतकरी अशोक लिंबाजी शिंदे यांच्या शेतात असलेला मजुर बैलाच्या सह्याने अतर्गंत मशागत करत असताना बैलाचा धक्का शेतात असलेल्या पोलच्या तानतरेला लागल्याने बैल जागीच दगावल्याने शेतकरी अशोक शिंदै यांच्यावर मोठ संकट कोसळले आहे.

विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा बैल दगावल्याचे बोलले जात आहे कारण मागील महीण्यापुर्वी अशोक शिंदे यांच्या शेतातुन विज वितरन कंपनीने पोल रोवले आहेत या पोलला जी तानतार लावली जाते त्याला चिमनी लावली नसल्याने या तान तारेत विज उतरली आणी हा बैल दगावला त्यात मजुर मात्र बाल-बाल बचावला.अशोक शिंदे यांनी विज वितरन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता वितरन कंपनीचे अभियंता मठपती यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली.तर अशोक शिंदे यांनी विज वितरण कंपनीच्या विरोधत पाथरी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...