रविवार, ७ जुलै, २०१९

गाव तस चांगल पण महसूल /पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमते मूळे वेशिला टागंल

*गाव तस चांगल पण महसूल /पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमते मूळे वेशिला टागंल*

                

*दि 28/4/2019 पासून नैकोटा गावातील बौध्द वस्तिवर सामूहिक बहिष्कार टाकल्या नंतर या गावास अद्यापही तहसिलदार यांनी भेट दिली नाही .गावात दंवडी दिल्याची माहिती तेथील पोलिस पाटलानी पोलिस स्टेशन सोनपेठ दिली नाही*


*गावातील सप्ताह्यास परवाणा होता का?

गावात तलाठी, गिरधावर, ग्रामसेवक फिरकलेच नाही .या गावात अशीच परिस्थिती राहिली तर या गावातील बौध्द रोजगार, अन्न, पाण्या विना कसे जगतील. 

 

*प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन नैकुटावासींयाचे पुर्नवसन करावे.*


     लक्ष्मण उजगरे/परभणी:-कोणत्याही गावात गंभीर सामाजिक वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि तो वाद पोलिस प्रशासनाने मिटवण्या साठी पोलिस प्रशासनाने त्या गावातील पोलिस पाटील, तंटामुक्त आध्यक्ष, सरपंच, व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढला पाहिजे आणि एवढे करूनही मिटत नसेल तर महसूल प्रशासनाची मदत घेऊन हा वाद मिटविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे मात्र सोनपेठ जि परभणी येथील महसूल  /पोलिस प्रशासन यांनी नैकूटा ता सोनपेट या गावातील गंभीर वादाची गांभीर्याने दखल न घेतल्याने या गावातील प्रास्थिपताने बौध्द समाजावर गेल्या तीन महिन्यांपासून बहिष्कार टाकला आहे .

याचा पुर्वाध असा आहे की या गावात दि 27/एप्रील/2019 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना सदरील मिरवणूक गावातील मंदिरा जवळ आली या मंदिरात सप्ताह चालू असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक तेथील स्थानिक प्रस्थापितानी अडवुन धरली व पंगत उठल्या शिवाय मिरवणूक पूढे जाऊ देणार नाही आसा आक्रमक पवित्रा घेतला तद नंतर काही विचित्र प्रकार होण्या अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने मिरवणूकीचे विसर्जन न करता बौध्द वस्ति कडे आले व दुसर्‍या दिवशी सोनपेठ पोलीस स्टेशनला येऊन सार्वजनिक जयंती मध्ये अडथळा निर्माण करणा-यांच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या प्रमाणे गून्हा दाखल केला याचा राग मनात धरूण येथील प्रस्थापित गावकर्‍यांनी गावात दंवडी दिली कि बौध्द समाजावर बहिष्कार टाकला असून गावात त्यांना कोणी मदत केली तर 10,000 रु दंड आकारला जाईल या अशा दंवडीच्या भिती पोटी गावातील किराणा, पिठाची गिरणी ,पिण्याचे पाणी,रोजगार, अँटो प्रवास, व इतर जीवनावश्यक वस्तू देणे बंद केले या बौध्द समाजाचे कामा विना रोजगारा अन्न विना भुक तर पिण्याच्या पाण्या विना तहाण भागेणाशी झाली असून यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे आणि हे सर्व 28/4/2019पासुन चालू आसुन , येथील महसूल /पोलिस प्रशासन या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती दिसत आसल्याने या गावास भारिप बहुजन महासंघ युवा जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे, लोकनेते प्रकाश उजागरे, घागरमाळे, रणजित कांबळे, अणिल ब्रम्हराक्षे, नवनाथ मुजमले, सूमित जाधव, महेंद्र ठेंगे अँड आशोक पोटभरे अवडाजी ढवळे आदींनी या गावास भेट देवून त्यांचे सांत्वन करुण न्याय मिळवून देण्यासाठी सोनपेठ जि परभणी येथील तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...