संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने हादगाव येथे आरोग्य शिबिर सपन्न.
संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने हादगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 23/07/2019 रोजी घेण्यात आले.
शिबिराची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. नंतर संस्थेचे समन्वयक विठ्ल साळवे यानी प्रस्ताविक केले, या नंतर प्रत्यक्ष लोकांची आरोग्य तपासणी करून त्याना औषधउपचार देण्यात आले.
या आरोग्य शिबिरात हादगाव PHC चे डॉ.चिस्ते सर यानी रुग्णाची तपासणी केली.या आरोग्य शिबिरात 52 किशोरी मुलींची, 13 गरोदर मातांची, 14 स्तनदा महिलांची, 0 ते 1 वयोगटातिल 24 मुलांची, 1 ते 5 वयोगटातील 47 मुलांची व इतर 73 रुग्णाची असे एकुण 223 रुग्णाची तपासणी करुन त्याना औषध वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिरास डॉ.चिस्ते सर, कुलकर्णी सर MPW, मस्के सर MPW, बोत सर, आण्सारी सर ,कांबळे सर अंगणवाडी ताई शिला नखाते, वंदना गायकवाड,सीमा लालझरे, अरुणा नखाते व साजन शेख हे उपस्थीत होते.आरोग्य शिबिर सम्पन करण्यासाठी संकल्प संस्थेचे बाळासाहेब खोपे, विठ्ल साळवे ,शंकर होगे,सावन जोंधळे, प्रतिभा अभोरे, सुरेश लालझरे , अरुणा आठवले, सतिश तोडके, पुजा गाडे, अन्कुश कांबळे, सतिश तोडके ,निशा पंडीत,राणी आवटे,पुजा कदम ,वैजेनाथ कसबे यानी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा