सोमवार, १५ जुलै, २०१९

मतदार नोंदणीसाठी मा.जिल्‍हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन


मतदार नोंदणीसाठी मा.जिल्‍हाधिकारी पी.शिवशंकर यांचे आवाहन


परभणी / लक्ष्मण उजगरे

गामी महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या सार्वत्रिक निवडणुका आक्‍टोबंर २०१९ मध्‍ये प्रस्‍तावित असुन मा. भारत निवडणुक आयोगाने मतदार नोंदणी, वगळणी आणि मतदार यादीतील सुधारणा करण्‍यासाठी संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार मा.जिल्‍हाधिकारी पी.शिवशंकर यांनी परभणी जिल्‍हयातील नागरीकांना मतदार यादीत नाव नसल्‍यास, पात्र मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले आहे. 

मा.भारत निवडणुक आयोगाने विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्‍यानुसार दि.१५ जुलै २०१९ रोजी सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचे मार्फत प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्‍दी होणार आहे. दि. १५ जुलै २०१९ ते ३० जुलै २०१९ नागरीकांकडुन दावे व हरकती स्‍वीकारल्‍या जाणार आहेत. दि. २०, २१, २७, २८ जुलै रोजी विशेष मोहिमा घेतल्‍या जाणार असुन या दिवशी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ( BLO ) आपल्‍या मतदान केंद्रावर हजर राहणार असुन दि. १९ ऑगस्‍ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होणार आहे. सदर पुनरीक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर घेतला जाणार आहे म्‍हणजे ज्‍यांच्‍या वयाला १ जानेवारी २०१९ रोजी १८ ( अठरा ) वर्ष पुर्ण झाली असतील अशा व्‍यक्‍तीस आपले नाव मतदार यादीत नोंदवता येईल.

आगामी महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या निवडणुका ध्‍यानात घेता पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी ही अखेरची संधी असल्‍याचे मा.जिल्‍हाधिकारी पी.शिवशंकर यांनी सांगितले.

सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय आपले प्रतिनिधी म्‍हणजे BLA ( Booth Level Agent ) नियुक्‍त करावेत व मतदार यादया अदयावत आणि शुध्‍द करण्‍यासाठी BLO यांच्‍याशी समन्‍वय ठेवावा असे आवाहन मा.जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.

अतिमहत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींची नावे चुकीने वगळली जावु नयेत यासाठी डेटाबेस मध्‍ये चिन्‍हांकन ( Flagging ) करण्‍यात येणार आहे तसेच दिव्‍यांग व्‍यक्‍तींच्‍या नावाला चिन्‍हाकिंत केले जाणार आहे. 

मा.जिल्‍हाधिकारी जिल्‍हयातील ५० प्रकरणांची पडताळणी स्‍वतः करणार आहेत यात २० प्रकरणे मतदार नोंदणीची, २० मतदार वगळणीची आणि १० प्रकरणे मतदार यादीतील सुधारणे संदर्भातील असतील.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका ध्‍यानात घेता मतदार यादी शुध्‍द व अदयावत ठेवण्‍यासाठी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, राजकीय पक्षांचे BLA या विविध पातळयांवर समन्‍वय आणि नियोजन करण्‍यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...