*आत्ताच्या पिढीने दुष्काळ पाहिला तुमची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही :-मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस*
*वॉटर ग्रीडच्या माध्यमातून लवकरच परभणी जिल्ह्यात पाणी*
परभणी(लक्ष्मण उजागरे)मागील चार वर्षापासून राज्यात दुष्काळ पडत आहे दुष्काळामध्ये आमच्या सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत केली आहे मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वाटर ग्रीड करण्यात येणार आहे, कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा महत्वकांक्षी निर्णय आमच्या सरकारने घेतला असून मराठवाड्याचा कायमचा दुष्काळ मुक्त करण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पाथरी येथे सभेत बोलताना केले
गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रा परभणीत दाखल झाली त्याच अनुषंगाने सेलू येथे बोर्डीकर मैदानावर सभा घेऊन ही महाजन आदेश यात्रा पाथरी कडे निघाली व पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे महाजनादेश यात्रा येताच पाथरीचे विद्यमान आमदार मोहन फड यांनी या यात्रेचे जंगी स्वागत केले व येथून 500 मोटर सायकल व महाजन आदेश यात्रेचा ताफा पाथरी शहरात चारच्या सुमारास दाखल झाला व या यात्रेच्या निमित्ताने पाथरी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होती व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर ,आमदार मोहन फड, माजी आमदार विजयराव गव्हाणे,भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, उपाध्यक्ष डॉक्टर उमेश देशमुख, तालुका अध्यक्ष उद्धव नाईक शहराध्यक्ष शिवाराज नाईक सुरेश भुमरे अंकुश लाड आनंद भरोसे, शशिकांत देशपांडे,रामप्रसाद बोर्डीकर, सुभाष आंबट, नानासाहेब वाकणकर, उद्धव श्रावणेआदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मराठवाड्याचा दुष्काळ घालवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून महत्वकांक्षी प्रकल्प वाटर ग्रीड राबविणार आहोत यामध्ये धरणांना एकमेकांशी जोडले जाणार आहे व त्यातून पाणी गावा गावा पर्यंत व शहरापर्यंत पोहोचले जाणार आहे आणि साधारणपणे वीस हजार कोटी रुपये या वाटर ग्रीड ला लागतील असा अंदाज आहे.पहिल्या टप्प्यात दहा हजार आठशे कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आहे त्यामाध्यमातून 64000 किमी पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यापैकी चार हजार कोटी रुपयाचा निविदा निघाले असल्याने या योजना पूर्णत्वास येऊन मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर दुसऱ्या योजनेतून कोकणातील वाया जाणारे 167 टीएमसी पाणी बोगद्याच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तसेच कृष्णा खोऱ्यातील कृष्णा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून सोडणार आहोत असे महत्त्वकांक्षी निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे त्याचा फायदा परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याला होणार असल्याचे या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्याला मुबलक पाणी उपलब्ध होऊन कायमचा मराठवाडा दुष्काळा मुक्त होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पाथरी येथील महाजनादेश यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या पाथरी येथील सभेमध्ये केले
*भाजपा विधानसभा स्वबळावर लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत*
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी परभणी जिल्हा ढवळून काढला.सेलू पाथरी परभणी येथे जाहीर सभेमध्ये त्याने महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर माझ्यासह जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी मेघना बोर्डीकर पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी मोहन फड परभणी विधानसभा मतदारसंघासाठी अभय चाटे आणि आनंद भरोसे ,गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी विजय गव्हाणे विठ्ठल रबदडे यांच्यासाठी जनादेश मागितला.
जाहीर सभेत जनादेश देणार का असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट विचारलं, तेव्हाच भारतीय जनता पक्षाची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे याचा अंदाज येतो आहे....!!
महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या सोबत असलेली युती होणार नसल्याचे संकेतही यानिमित्ताने मिळत आहेत.जिंतूर परभणी पाथरी या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेला प्रतिसाद मिळाला असला तरी भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत दृष्टीने प्रयत्नशील आहे.आणि त्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी परभणी जिल्ह्यातील निवडक नेत्यांनाच पुढे करून जनादेश मागितला आहे प्रारंभी मोदी साठीनंतर स्वतःसाठी आणि नंतर इतरांसाठी त्यांनी मागितलेला जनादेश बरेच काही सांगून जातो.
वास्तविक परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो भारतीय जनता पक्षाला मागच्या विधानसभा निवडणुकीत अनेक हादरे परभणी जिल्ह्यात बसले.
एवढे असतानादेखील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली ..... त्यामुळे शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून आले याचा उल्लेखही राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सभेमध्ये आवर्जून केलाय.भारतीय जनता पक्षाच्या पाठबळामुळेच खासदार निवडून आल्याचे ते म्हणालेत.
एकंदरीतच महा जनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाची परभणी जिल्ह्यातील ताकद पाहिली आणि त्यानंतर आता स्वबळाचा निर्णय होतो की काय याकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले
परभणीत भाजपा इच्छुकांच्या मुलाखती घेणार राज्याचे मंत्री!!सीएम जाताच क्षणी निर्णय.. बघा स्वबळ!!.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.... परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला तीन मतदारसंघात प्रत्यक्ष जाहीर सभा घेतल्या.भारतीय जनता पक्षाची वाटचाल स्वबळावर निवडणुका लढविण्याची आहे काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आणि त्याच धर्तीवर अनेक घडामोडी देखील घडत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी हिंगोलि जिल्ह्या कडे रवाना झाले.त्यानंतर परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विशेष निरीक्षक म्हणून राज्यमंत्री येणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता आणि आता ते विद्यमान राज्यमंत्री आहेत असे संजय ऊर्फ बाळा भेगडे शनिवारी सकाळी परभणीत दाखल होत आहेत.
परभणी येथे आल्यानंतर परभणी सह जिंतूर गंगाखेड आणि पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती ते घेणार आहेत.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे स्वबळाची भाषा असल्याचे चर्चिले जात असतानाच परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना शनिवारी मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यमंत्री भेगडे सकाळीच परभणी येथे दाखल होतील आणि तातडीने मुलाखती घेतील.परभणी जिंतूर पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार कशा पद्धतीचे शक्तिप्रदर्शन करणार हाही प्रश्न उद्या दिसेल पक्षनिरीक्षक राज्यमंत्री भेगडे आपला अहवाल तातडीने वरिष्ठांकडे सादर करणार आहेत पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे या तातडीच्या घडामोडी घडत आहेत.....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाला जनादेश सर्वच ठिकाणी मागितला त्याच मुळे स्वबळाची निवडणूक होते की काय अशी शक्यता वाढली आहे..