पाथरी विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही : खा.संजय जाधव साहेब
परभणी/प्रतिनिधी- पोखर्णी (नृ) येथे श्री नृसिंह अभिषेक कीर्तन व महाप्रसाद तसेच शिवसेना पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन काल माझ्या वतीने करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्ह्याचे लाडके खासदार संजय जाधव साहेब उर्फ बॉस मेळाव्यास उपस्थित होते.
यावेळी बोलताना बॉस म्हणाले, "आपला उमेदवार म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा धनुष्यबाण आहे. आपल्याला येत्या काळात या धनुष्यबाणालाच निवडून आणण्याचं काम करायचं आहे. जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा पक्ष हा फक्त शिवसेनाच आहे. जनतेशी आपली नाळ जोडल्याशिवाय फळ मिळत नाही. आम्ही ती नाळ जोडण्याचा काम आतापर्यंत करत आलो आहोत. ही शिवसेना बाळासाहेबांनी प्रेरित केलेली शिवसेना आहे. माझा अखेरचा श्वास सुद्धा मी शिवसेनेतच घेणार आणि पाथरी मतदार संघात भगवा फडकिल्याशिवाय शांत बसणार नाही"
.
.
तर माझे मनोगत व्यक्त करताना, "शेतकऱ्याच्या कोणत्याही अडचणींना धाऊन जाणारा पक्ष म्हणजे तो फक्त शिवसेनाच आहे. येत्या काळात ज्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC परिक्षांची तयारी करण्याची आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणण्याचा प्रयन्त करणार, मतदारसंघात रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतार. शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन, या पाथरी मतदार संघावर भगवा फडकविणारच!" असा विश्वास मी उपस्थितांना दिला.
मेळाव्यास मुख्य मार्गदर्शक खासदार संजय जाधव साहेबांसह जिल्हाप्रमुख सुरेशबप्पा ढगे, युवासेना युवा जिल्हाप्रमुख दीपकभाई बारहाते, पंढरीनाथ धोंडगे, मधुकर निरपणे, बाळासाहेब जाधव, अशोक वाघ, माणिक आव्हाड, आत्माराम वाघ, परमेश्वर सुकरे, रामेश्वर मोकाशे व इतर सर्व पदाधीकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा