सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

वाढदीवसाचा अनावश्यक खर्च टाळुन मुलीच्या वाढदीलसानिमित्त पांडुरंग कोल्हे यांनी बांधले महीला स्वच्छालय.

पाथरी प्रतिनिधी:-
    "बदलत्या काळानुसार निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करुन ग्रामीण भागातील तरुणांनी विकास करुन घ्यावा,व्यसनाधिनतेपासुन लांब राहुन कोणतेही कष्ट करण्याची तरुणांनी तयारी ठेवुन पांडुरंग कोल्हे यांच्याप्रमाणे गावातील समस्यावर उपायेजना करावी", असे आवाहन  परभणीचे शिक्षणाधिकारी व प्रसिद्ध वाख्याते विठ्ठल भुसारे यांनी केले.

    ते रविवारी पाथरी तालुक्यातील उमरा येथे प्रियल कोल्हे हिच्या  वाढदिवसानिमत्य अवांतर खर्चाला फाटा देत ,ग्रामीण महिलांची मुख्य समस्या निवारण्यासाठी गावात पांडूरंग कोल्हे यांनी उभारलेल्या महिला सार्वजनीक शौचालयाच्या 3 कँबीन लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित तरुणांशी संवाद साधत होते .
   प्रारंभी विठ्ठल भुसारे  यांच्या हस्ते  फित कापुन महिला शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंजाभाऊ कोल्हे शिवसेना तालुकाप्रमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन   सेवानिवृत मुख्याध्यपक जानकीराम मोरे, सुभाष शिंदे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ परभणी,एकनाथ मस्के,गावचे सरपंच दत्ता बिजुले,तुकाराम पौळ,सचिन निलवर्ण आदींची उपस्थीती होती.
    गावातील प्रत्येक नागरिकांने कुवतीनुसार आर्थीक व वेळ देऊन गावाच्या विकासात सहभाग घेऊन आदर्श गांव निर्माण करण्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहान शिवसेना तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक पांडुरंग कोल्हे यांनी केले तर सुत्रसंचालन माऊली कोल्हे यांनी केले.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...