राजेश विटेकर यांचे नाव घेताच गर्दीतुन टाळ्यांचा प्रतिसाद
परभणी/लक्ष्मण उजागरे:-अजित दादा पवार यांनी राजेश दादा विटेकर यांचे नाव घेताच प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला निश्चित जिंतूर, गंगाखेड आणि घनसावंगीमध्ये अपेक्षा होती परंतु अपेक्षांचा भंग झाला. राजेश विटेकर आज खासदार झाले असते. परंतु आतादेखील हिम्मत हरायची नाही . महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात चांगल्या पद्धतीने लढायचे आहे
विद्यमान सरकारच्या गलथान कारभाराचा निश्चितपणे अनुभव घेतलेली जनता आपल्या राष्ट्रवादीच्या पाठीशी राहील असा स्पष्ट दावा माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी गंगाखेड येथे शिवस्वाराज याञे बोलताना व्यत केले.
यावेळी खा.अमोल कोल्हे ,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी,मा.खा.सुरेश जाधव आ.मधुसुदन केंद्र हे मंचावर उपस्थित होते.
*हे सरकार सामान्य जनतेवर अन्याय करणारे सरकार -*
शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील गंगाखेड येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर ताशेरे ओढले.
शासकीय आणि खासगी क्षेत्रात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र या युती सरकारच्या काळात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, गुन्हेगारांवर कुठलाच अंकुश राहिलेला नाही, असा आरोप अजीत पवार यांनी केला.
आज राज्यात सर्वाधिक अन्याय हा मराठवाड्यावर होत आहे. मराठवाड्यासाठी हे सरकार काहीच करत नाही. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर गाजरं दाखवण्याचं काम या सरकारनं केलंय. अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस-सोयाबीन-तूर अशा अनेक धान्यांचा हमीभाव मिळालेला नाही. तर आजही तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हे सरकार सामान्य जनतेवर अन्याय करत असल्याचे पवार यांनी सांगितले.
आज राज्याची परिस्थिती बिकट आहे. शिक्षक, पोलिस, तलाठी यांच्या जागा रिक्त आहेत. पण हे सरकार जागा भरतच नाही. फक्त सामान्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच राज्य सहकारी बॅंकेवर घोटाळ्याचा आरोप फडणवीस सरकारने केला. मात्र, निवडणूक जवळ येताच असे आरोप होणे स्वाभाविक असल्याचे पवार म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रेतून महाराजांच्या विचारांचे, अठरापगड जातींचे राज्य स्थापन करण्याची भूमिका मांडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धंनजय मुंडे यांनी केले. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात, आम्ही शेतकऱ्यांना विहिरी बांधून दिल्या, शेततळी दिली, ३३ कोटी झाडे लावली, या ३३ कोटी झाडांपैकी एकतरी झाड कुठे दिसलं का? जलयुक्त शिवाराचं काय झालं? असे सवाल मुंडे यांनी उपस्थित केले.
*सरकारने विमा कंपन्यांचा खिसा भरण्याचे काम केले. -*
मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या घामाचा पैशातून विमा कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम सरकारने केले. गुन्हेगारीतही मुख्यमंत्र्यांच्या नागपूरचा पहिला क्रमांक लागतो. अनेक क्षेत्रात बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार काहीच करत नाही. त्यामुळे या सरकारला जाब विचारण्याची वेळ आज आली असल्याचे खा. अमोल कोल्हे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा