मानवत नगरीत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती आश्वरुढ पुतळाचे आगमण
[]आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांच्या अथक प्रयत्नामुळे मानवतकराची स्वप्नपुर्ती []
लक्ष्मण उजागरे /परभणी
दि.९: मानवत शहरात छञपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरुढि पुतळा उभारणीची मागणी कित्येक वर्षापासुन शिवप्रेमी जनतेतुन होत होती यासाठी पाथरी विधानसभाचे आमदार मोहन फड व युवानेते डॉ.अंकुश लाड यांनी या कार्यासाठी अथक परीश्रम घेत लाखो रुपयाचा निधी खर्च करत शहरातील छञपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याचे जागेचे सुशोभीकरण करुन लगेच येथे पुतळा उभारणीसाठी प्रयत्न केले व दि.९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजाचा आश्वरुढ पुतळा अहमदनगर चे प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बनवलेली १६ फुटि उंच मुर्ति मानवत शहरात मोठ्या थाटामाटात पाथरी ते मानवत मिरवणुक व भव्य मोटरसायकल रँली काढुन आणण्यात आली .
९ ऑगस्ट रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक पाथरी येथील आष्टी फाट्यावरून विधिवत पूजा करून काढण्यात आली ही मिरवणूक पाथरी शहरातील मेनरोडावरुन वाजत गाजत मानवत शहरातील नाक्याजवळील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेपर्यंत काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याची आ.मोहन फड यांच्याहस्ते विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांच्या अथक प्रयत्नामुळे मानवतकराची स्वप्नपुर्ती आज कित्येक वर्षानंतर पुर्ण झाल्याने बहुजन समाज आ.मोहन फड व डॉ.अंकुश लाड यांचे कौतुक करत आहे . यावेळी आमदार मोहनराव फड ,भाजपाचे युवानेते डॉ.अंकुश लाड,श्री.मनिषानंद पुरीजी महाराज,नगराध्यक्ष एस एन पाटिल ,मुख्यधिकारी उमेश ढाकणे ,नगरसेवक गिरीशसेठ कञुवार,नगरसेवक गणेश कुमावत,अन्वरभैय्या शेख,आसेफ खान,मोईज अन्सारी , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अभय चाटे, मानवत तालुका अध्यक्ष अनंत गोलाईत ,पाथरी तालुका अध्यक्ष उद्धव नाईक, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी सुरेश भुमरे ,संजय साळेगावकर, शशिकांत देशपांडे, डॉ.उमेश देशमुख ,शिवराज नाईक ,पी डी पाटिल, नारायण भिसे, अनिरुध्द पांडे,सचीन कोक्कर ,ज्ञानेश्वर मोरे ,डॉ.योगेश तोडकरी ,सुरेश कच्छवे ,पप्पु नखाते ,सचीन मगर ,बापु जाधव,बंटिभैय्या आहिर,नितीन कुमावत यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक प्रतिष्ठित नागरीकांसह हजारोच्या संख्येने शिवप्रेमी जनता या ऐतिहासिक समयी उपस्थीत होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा