सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

ताडलिंबला येथे विकासकामाचे भूमिपूजन...* -------------------------------------------------

*ताडलिंबला येथे विकासकामाचे भूमिपूजन...*
-----------------------------------------------------------

परभणी /प्रतिनिधी:-परभणी
विधानसभा मतदारसंघातील ताडलिंबला  येथे परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या प्रयत्नातून 2515 निधीतून गावातील सी.सी रोड च्या कामासाठी मंजूर झालेल्या 15 लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपुजन आज दि.12 रोजी परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते झाले.
  यावेळी आनंद भरोसे यांनी मनोगत व्यक्त करताना परभणी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असून मागील साडेचार वर्षात परभणी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम,२५१५ निधी,दलित वस्ती,तांडा वस्ती निधी अंतर्गत अनेक गावात विकासकामे झालेली आहेत. समोरही ग्रामीण भागातील प्रलंबित राहिलेल्या विकासकामांना प्राधान्य देऊन ती करण्यासाठी माझा सर्वपरी प्रयत्न राहणार आहे असे प्रतिपादन यावेळी आनंद भरोसे यांनी केले.
   यावेळी सरपंच अर्जुन बागल,उपसरपंच गोविंद जोगदंड,ग्रामपंचायत सदस्य किशन देशमुख,लिंबाजी गरुड,अजित गरुड,अंगद शेरे,ग्यानदेव लोडे,विठ्ठल चव्हाण,सुरेश जोगदंड,बालासाहेब देशमुख,किशन लोडे,विष्णू तांबे,भगवान नाईकवाडे,वामन तांबे,किशन नाईकवाडे,कांतराव जोगदंड,बबन नाईकवाडे, प्रल्हाद राहटकर,ज्ञानदेव जोगदंड,मारोती लोडे,राजू ढगे,ज्ञानदेव कुटे आदी गावकरी यावेळी उपस्थितीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...