सोमवार, ३० मार्च, २०२०

जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी

*जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांचे आवाहन; जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा 24 तास सुरू ठेवावी*

परभणी दि.30:- जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोशियशन , आयुर्वेदिक व्यासपीठ असोशियसन , निमा असोशियशन , अध्यक्ष होमिओपॅथी असोशियशन आणि जिल्हयातील इतर वैद्यकीय सेवा देणा-या संघटनांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा 24 तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.


  राज्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येवून शहरी व ग्रामीण भागातील दवाखाने बंद असल्यामुळे आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी एकवटत असल्याचे निदर्शनास येत आहे .
     तरी कोरोना विषाणू संसर्गच्या या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा खंडित करण्यात येऊ नयेत तसेच आपण आपल्या ओपीडी आणि इतर सर्व वैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी २४ तास नियमितपणे सुरु ठेवण्यात याव्यात. जेणेकरून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवेसाठी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमध्ये सहभागी होवून या आपत्तीचा सक्षमपणे सामना करता येईल. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                             -*-*-*-*-

रविवार, २९ मार्च, २०२०

सतर्क ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा आणला उघडकीस; महसूल विभागाकडून पंचनामा

*सतर्क ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा आणला उघडकीस; महसूल विभागाकडून पंचनामा*
पाथरी (लक्ष्मण उजागरे):-कोरोनाव्हायरस संसर्ग थांबवण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संचारबंदी चालू आहे. सध्या प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना संसर्ग थांबवण्याकडे असल्याचा फायदा घेत अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळूमाफियांनी पुन्हा गोदावरी पोखरण्यास सुरुवात केली आहे.पाथरी तालुक्यातील सर्तक ग्रामस्थांनी अशाच प्रकारे होणारी वाळूचोरी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.
  पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण व कानसुर दरम्यान नदीपात्रात वाळूचा मोठा साठा आहे. मागील अनेक वर्षापासून कानसुर ग्रामस्थांच्या विरोधामुळे नदीपात्रातील ही वाळू प्रशासनाला लिलावात काढता आली नाही. आता यावर वाळूमाफियांची नजर आहे अधून-मधून ही वाळू चोरण्याचा प्रयत्न केला जातो. मागील सहा दिवसांपासून संचारबंदी असल्याचा फायदा घेत, काही वाळू चोरट्यांकडून नदीपात्रापर्यंत रस्ता करत वाळूचोरी करण्यात येत होती. सदरील वाळूचा साठा एका शेतात करण्यात आला होता.
दरम्यान, ही बाब कानसुर येथील सर्तक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिली. रविवारी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पथकाने वाळूसाठा ठिकाणी पंचनामा करत ही वाळू ताब्यात घेतली. यावेळी नदीपात्रातून तयार करण्यात आलेला रस्ताही जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आला आहे.जप्त केलेली वाळू आता घरकुल लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याचे मंडळाधिकारी यांनी सांगितल आहे.

शनिवार, २८ मार्च, २०२०

केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थीना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना – मुख्यमंत्री

केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील सर्व लाभार्थीना लाभ देण्यासाठी यंत्रणेला सूचना – मुख्यमंत्री



केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेलं 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे देशातील गोरगरिब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात या योजनेतील सर्व लाभार्थीना व्यवस्थित लाभ मिळेल यासाठी राज्य शासन संपूर्ण प्रयत्न करेल. यादृष्टीने राज्यातील यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले

गोरगरिब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप, उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस, स्वस्त धान्य दुकानात रास्त भावाने अन्नपुरवठा, शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांची रक्कम, यासारख्या निर्णयांमुळे त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळित राहण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गरीब, वृद्ध, दिव्यांग विधवा महिला यांच्या जनधन खात्यांमध्ये एक हजार रुपये जमा करण्याचा, मनरेगा कामांवरील मजुराना दरदिवशी 200 रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय योग्य आहे. केंद्र शासनाचे हे मदतीचे पॅकेज लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचे काम राज्य शासन प्रभावीपणे पार पाडेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.. या युद्धात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची भुमिका खुप मोलाची आहे. त्यांच्यासाठी विम्याचे कवच देऊन केंद्र शासनाने यंत्रणेत काम करणाऱ्यांना बळ दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एकीच्या बळावर आपण विषाणुला देशातून हद्दपार करण्यात नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी गरजेनुसार केंद्राने अशाच प्रकारे राज्यासाठी मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

CoronaVirus : राज्यात इतर रुग्णांवर डिजिटल प्रिस्क्रिप्शनने उपचार

CoronaVirus : राज्यात इतर रुग्णांवर डिजिटल प्रिस्क्रिप्शनने उपचार! 

मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली काही डॉक्टरांनी दवाखाने बंद करणे, दवाखान्यांच्या वेळा कमी करणे किंवा आठवड्यातून एक-दोन दिवस रुग्णसेवेसाठी खेडोपाडी जाणे बंद करणे, कर्मचाऱ्यांअभावी डॉक्टरांची हॉस्पिटल चालवण्याबाबत असमर्थता अथवा संचारबंदीत रुग्णांनाच डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यात येणाºया अडचणी, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून आता डॉक्टरांना टेलिफोनिक सल्ला आणि डिजिटल प्रिस्क्रिप्शनची परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आता आपल्या मोबाईलवरून डॉक्टरांना कॉल/व्हिडिओ कॉल करून कुठली लक्षणे आहेत ते सांगायचे. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतील आणि त्याचा फोटो रुग्णाला व्हॉटस्अ‍ॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवतील. तो दाखवून रुग्ण व त्यांच्या आप्तांना दुकानांमधून औषधी घेता येईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी देशभरातील आरोग्यमंत्री आणि अन्न व औषधी प्रशासनमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. तीत डिजिटल प्रिस्क्रिप्शन बाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. एक-दोन दिवसांत याबाबतचे आदेश निश्चित काढले जातील, असे आश्वासन हर्षवर्धन यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेले राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वतोपरी उपायोजना करीत असताना इतर रुग्णांची हेळसांड होऊ नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच डिजिटल प्रिस्क्रिप्शनचा पर्याय देण्यात आला आहे. कौन्सिलने याबाबत आधीच पुढाकार घेतला आहे. याबाबत केंद्राच्या दिशानिर्देशांचे पालनदेखील केले जाईल.

कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर जाण्यापासून नातेवाईकच रोखतात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने बंद केल्याचा त्यांनी स्पष्टपणे इन्कार केला. ते म्हणाले की, दवाखाने हॉस्पिटल्समधील बरेचसे कर्मचारी कामावर येत नाहीत.या कर्मचाºयांना ड्यूटीवर जाण्यापासून त्यांचे नातेवाईकच रोखतात. तरीही ते आलेच तर वाटेत पोलीस मारहाण करतात. इच्छा असूनही कर्मचाºयांअभावी हॉस्पिटल चालवणे कठीण होऊन बसले आहे.

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव,कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

*Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव,कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर*
नवी दिल्ली – देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे. कोरोनाने जवळपास 198 देशांना विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतातील अनेकांची चाचणी निगेटिव्ह आली असून काहींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी देशात सर्वात मोठं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ओडिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांसाठी सर्वात मोठं रुग्णालय उभारणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. कोरोनाग्रस्तांसाठी हे रुग्णालयात उभारण्यात येत असून यामध्ये तब्बल एक हजार बेडची व्यवस्था असणार आहे. ओडिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. गुरुवारी (26 मार्च) एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुख्‍यमंत्री नवीन पटनायक यांनी याबाबत आदेश दिले आहे. सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे.
कोरोनामुळे इटलीत 8200 जणांना जीव गमवावा लागला आहे. चीनच्या पाठोपाठ कोरोना व्हायरसनं इटली आणि स्पेनमध्ये धुमाकूळ घातला आहे. इटलीमध्ये नवीन 6153 संक्रमित झालेले रुग्ण समोर आले आहेत. तर हीच संख्या जागतिक स्तरावर 5 लाखांच्या पार गेली आहे. वॉशिंग्टनच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, इटलीत 6153 नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. इटलीच्या सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सी रिपोर्टनुसार, गुरुवारी दिवसभरात 662 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील मृतांची संख्या 8 हजारांच्या पार गेली असून, कोरोना संक्रमितांची संख्या  80589 पर्यंत पोहोचली आहे. इटलीसारखंच स्पेनमध्येही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. स्पेनमध्ये झालेले मृत्यूंच्या आकड्यांनी चीनमधल्या मृतांच्या आकड्यालाही मागे टाकले होतं.

गुरुवार, २६ मार्च, २०२०

CoronaVirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

CoronaVirus : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा


coronavirus : वर्षा येथे कोरोना उपाययोजनांसंदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली.
मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केले आहे. वर्षा येथे कोरोना उपाययोजनांसंदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न-धान्य खरेदी करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, असेही ठरले.

देशातील गरिबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

देशातील गरिबांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
                   _________
कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. 
निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केले आहे.
गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी १.७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत हे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, हा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या  व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. 

महत्वाच्या घोषणा - 

- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५०  लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. 

- पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर माणसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.

- मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे. 

- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना २००० रुपये देण्यात येणार आहेत. याचा फायदा ८.६९ करोड शेतकऱ्यांना होणार आहे. 

- जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार. 

- उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.

- वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.

- बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा. 

- सरकार पुढील तीन महिने खासगी नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग असे दोन्ही २४ टक्के टाकणार आहे. यासाठी ही कंपनी १०० पेक्षा कमी कर्मचारी आणि ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५००० पेक्षा कमी असायला हवा.

- कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के नॉन रिफंडेबल अॅडव्हान्समध्ये पैसे काढू शकणार आहेत. किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकणार आहे.


भारतामध्ये बुधवारी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे १३० कोटी लोकसंख्येला घर सोडण्यावर बंदी आणण्यात आली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात येत आहे.  २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार कर्ज वाढवू शकते. येत्या आर्थिक वर्षासाठी ७.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची सरकारची योजना आहे. आरबीआयला केंद्राचे बाँड खरेदी करण्यास सांगितले होते. मात्र, महागाईच्या भीतीने गेल्या दशकभरापासून आरबीआयने खरेदी केलेली नाही. यामुळे आता आरबीआला जगातील अन्य देशांसारखाच सरकारी बाँड खरेदी करावा लागणार आहे.

बुधवार, २५ मार्च, २०२०

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन;जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी,आज 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले,कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी.

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन;
जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी

*आज 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले

* कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी

परभणी दि.25:- जिल्ह्यातील सर्व नागरीकांना
२१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न - धान्याचा साठा मुबलक असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे.
तरी जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य , भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरीकांनी काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२६२४४ व्हॉटसअप क्रमांक - ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२४५२ - २२६४०० येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण 121 रुग्णांची नोंद झाली असून 74 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 15 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण 15 स्वॅबबाबत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
जिल्ह्यात परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील एकूण 54 नागरिक निगराणीखाली असून यापैकी 14 नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले आहेत. 107 नागरीकांचे त्यांच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांची वैद्यकीय पथकामार्फत फेरतपासणी करण्यात येत असून या 107 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आज नवीन 8 संशयीत नागरिकांची जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्थेत नोंद झाली. तर कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. आज रोजी 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दि. २५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु बाधीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये. असे जिल्हाधिकारी दी म . मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

*परभणी जिल्ह्यात संचारबंदी काळात कष्टकरी रोजमजूर भिकारी यांच्यावर उपासमारीची वेळ...!जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता*

परभणी जिल्ह्यात संचारबंदी काळात कष्टकरी रोजमजूर भिकारी यांच्यावर उपासमारीची वेळ...!



💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकरांनी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता💥


परभणी/संपूर्ण जगात माहामारी म्हणून उदयास आलेल्या भयंकर चिनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस,संपूर्ण देश लॉकडाऊन केल्याची घोषणा काल मंगळवार दि.२४ मार्च रोजी केली.लोकांनी गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढवण्याचा धोका लक्षात घेऊन २१ दिवस लॉकडाऊन अर्थात संचारबंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला परंतु हातावर पोट असलेल्या रोजंदारी कामगार,फिरस्ती छोटे व्यवसाईक,गोरगरीब भिकारी यांच्या उदरनिर्वाहाचे काय ? प्रश्न निर्माण झाला आहे.

परभणी जिल्ह्यात कामगार,रोजंदारीवाले मजुर,रस्त्यावर भिक मागणारे गोरगरीब फिरस्ती छोटे व्यवसायीक गरजु यांना तर रोज बाहेर जावुन कमवुनच आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागतो अशा हातावरचे पोट असणारे असंख्य लोक तब्बल २१ लॉकडाऊ संचारबंदीत तग कसे धरतील बरं ? कोरोना विषाणूच्या संसर्गा अगोदरच त्यांना उपासमारीतून आपणे प्राण गमवावे लागणार नाही का ? जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हापोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी अशा गोरगरीब,रोजमजूर,रस्त्यावर भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्यांच्या पोटापान्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पावले उचलतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परभणी जिल्ह्यातील परभणी रेल्वे स्थानकासह पुर्णा रेल्वे स्थानक,सेलू रेल्वे स्थानक,मानवत रेल्वे स्थानक,गंगाखेड रेल्वे स्थानक पाथरी बसस्थानक,सोनपेठ बसस्थानक,पालम बसस्थानक,परिसरात वास्तव्यास असणाऱ्या व रस्त्यावर भिक मागून जिवण जगणाऱ्या गोरगरीब भिकारी तसेच वाड्या वस्त्यामध्ये,झोपडपट्यामध्ये राहणारे गोरगरीब रोजंदारी कामगार या २१ दिवसांच्या संचारबंदी काळात अक्षरशः उपासमारीने आपला जिव सोडून देतील.अश्या गोरगरीब लोकांच्या जवळ नाही पैसा नाही हाताला कुठलेच काम नाही अशा गंभीर परिस्थितीत त्यांना कोणी उधार पैसाही देणार नाही आणी एखादा दुकानदारही दुकाना पुढे उभे राहू देणार नाही मग अश्या गंभीर परिस्थितीत त्यांनी करायचे तरी काय ? प्रशासनानेच आता अशा गरीबांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता निर्माण झाली असून परभणी जिल्हा प्रशासनाने २१ दिवसांच्या संचारबंदी काळात अश्या गोरगरीब रोजमजूरांवर उपासमारीची वेळ येऊ नए या दृष्टीने तात्काळ पावल उचलने आवश्यक असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होतांना दिसत आहे....

*आग्रलेख-राज्यात लॉक डाऊन*


      *आग्रलेख-राज्यात लॉक डाऊन*
          
              आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा, भारतीय  नवीन वर्षाच्या शुभारंभाचा पहिला दिवस.  नववर्षाची सुरुवात म्हणून आपण गुढीपाडवा पारंपारिक उत्साहाने आणि आनंदाने   थाटात साजरा करतो. रावणावर विजय मिळवत  मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र  14वर्षाच्या वनवास नंतर  आयोध्या मध्ये परतले . तो गुढीपाडव्याचा दिवस , आयोध्यावासी यांनी प्रभू रामचंद्राचे सीतामाता व लक्ष्मण  यांचे घरोघरी गुढ्या  उभारून तोरणे लावून उत्साहाने स्वागत केले.तेव्हा  पासून गुढीपाडवा नववर्षारंभ दिन  पारंपारिक पद्धतीने साजरा करावयाचा प्रघात रूढ झाला. गुढीपाडव्याच्या आणि नव वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना   कोरोना च्या  प्रादुर्भावला  रोखण्यासाठी जनता  कर्फ्यू  पाळण्याचे आवाहन केले होते .22 मार्च सकाळी सातपासून रात्री नऊ पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन होते. देशभरातून कोरोना रोगाला हद्दपार करण्याकरिता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतीय  देशवासीय बंधू-भगिनी यांनी या आव्हानाला  उस्फुर्तप्रतिसाद दिला आणि जनता  कर्फ्यू चे पालन केले. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले. कोरोनाहद्दपार करण्यासाठी ही कोरोना विरुद्ध लढाईची सुरुवात आहे, यापुढेही मला जनतेच्या अशाच सहकार्याची आणि साथीची गरज आहे असे मोदी यांनी नमूद केले . पंतप्रधान मोदी यांनी जे संबंधित कोरोणा विरुद्ध लढताहेत आणि त्याला  आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्नशील आहेत, अशा नर्स डॉक्टर्स आणि संबंधितांना  प्रोत्साहन देण्याकरिता पाच वाजता टाळ्या आणि  थाळ्या वाजवत घंटानाद करीत त्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन केले होते, या आवाहनाला  देखील जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .

           जनता  कर्फ्यू  संपता च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात बंद  म्हणजे  टोटल बंद करिता 22 मार्च मध्यरात्रीपासून राज्यात सर्वत्र  लॉक डाऊन   घोषित केले.  संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश कलम 144 लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तीने एकत्र येऊ नये, आणि गर्दी करू नये याकरिता जमा बदली आदेश लागू करण्यात आला आहे   कोरोना रोगाच्या.     विषाणूचा  प्रादुर्भाव राज्यामध्ये  दिवसेंदिवस वाढत आहे.   कोरोना गस्त  रोग्यांच्या संकेत भर पडत आहे रुग्ण वाढत आहे त, त्याकरिता आवश्यक ती खबरदारी आणि काळजी  घेण्याकरिता हे उपाय योजनेत आली आहे त. 31 मार्च  ही  तारीख पहिला टप्पा म्हणून ठरवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.  गरजपडली तर, ती तारीख पुढेही वाढविण्यात येईल असे त्यांनी  नमूद केले.  जमावबंदी आदेश आणि कलम 144 मधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आली आहे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू ची दुकाने सुरू राहतील मात्र,  बाकीची सर्व दुकाने व्यवस्था आणि वाहतूक बंद राहील  ते स्पष्टकरण्यात आली आहे. जनतेने अनावश्यक गर्दी करणे टाळावे, आणि कोरोना रोगाला आटोक्यात आणण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला केले आहे.  वाहतूक बंद करावयाची वेळ येऊ देऊ नका, असे मुख्यमंत्री  म्हणत होते, परंतु नाईलाजाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. नाईलाजाने वाहतूक बंद केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या सीमा बंद कराव्या लागल्या  तर तसा  निर्णय घ्यावा लागेल. असेही मुख्यमंत्री म्हणाले. परदेशातून राज्यात आणि मुंबई मध्ये  येणारी विमाने बंद करण्यात आली आहेत. विमानाची फ्लाईट बंद ठेवून विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस सेवा, ट्रॅव्हल्स रेल्वे, देखील बंद करण्यात आले आहेत . शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा  या  अधि च पुढे ढकलण्यात  आल्याआहेत. परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी कोरोना रोगाच्या  प्रादुर्भावला  रोखण्यासाठी  ही तुम्हा  आम्हा सर्वांची परीक्षा आहे,  असे निदर्शनास आणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपले सरकार योजत असलेल्या उपायांना आणि घेत असलेल्या काळजी व खबरदारीला सहकार्य करावे साथ द्यावी, आणि आपण सर्वांनी मिळून  कोरोना ला हद्दपार करू असे आवाहन केले.

         जगामधील बहुतांशी देश  कोरोना रोगाच्या विषाणूचा प्रसार आणि प्रचार रोखण्यासाठी आणि त्याला आटोक्यात आणण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करीत लढा देत आहेत .भारत देशात कोरोना ने शिरकाव केला आहे .बाधा झालेल्या रोग्यांच्या  संख्येमध्ये भर पडत आहे आणि आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातील काही  शहरे आणि भागांमधून  कोरोना  चा प्रादुर्भाव  वाढत आहे. या रोगाचे विषाणू पसरण्याची आणि प्रसार वाढण्याची  जी साखळी आहे, ती साखळी तोडणे  महत्वाची  आणि गरजेचे आहे जनता  कर्फ्यू पालन करून आपण त्याविरुद्ध सज्ज असल्याचे दाखवली आहे. गर्दी टाळत. आणि स्वतःची आणि   स्वतः बरोबर इतरांची काळजी घेत आपण  निकराने आणि  हिंमतीने  संघटितपणे लढा देत, कोरोना ला हद्दपार करावयास हवे.   राज्यामध्ये सर्वत्र   लाक  आऊट घोषित असताना, आज गुढीपाडवा साजरा होत आहे, जमावबंदी आदेश आणि संचारबंदी लागू असल्यामुळे पाडवा साजरा करावयास मर्यादा आहेत. मर्यादा   पाळावयास हि हव्या, तरच  कोरूना विरुद्ध  लढण्याचा आपला संकल्प पूर्ण होईल. !

पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना  कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.पाहा व्हिडीओ

https://twitter.com/PIBHindi/status/1242776983060140033?s=19

सोमवार, २३ मार्च, २०२०

कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नका, त्वरीत या नंबरवर कॉल करा


कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यास घाबरून जाऊ नका, त्वरीत या नंबरवर कॉल करा

डेस्क स्पेशल | आपल्याला जर कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्यास घाबरून जाऊ नका. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कोरोना व्हायरस संदर्भात काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. आपण किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला ताप, खोकला, डोकेदुखी, शरीरावर वेदना इत्यादीसारख्या कोरोनाची लक्षणे दर्शविल्यास. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. येथे आम्ही देशभरात कोरोना व्हायरसचे नमुना केंद्र आणि हेल्पलाइन क्रमांक देत आहोत. आपण त्यांना त्यावर कॉल करून मदत मिळवू शकता.

देशात कोरोनाचा कहर थांबवण्याच्या अधिक हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. अशा परिस्थितीत, सामान्य नागरिक म्हणून आपण नियमांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या घरात किंवा आपल्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास घाबरून जाण्याची गरज नाही.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत. यावरून नागरिकांना 24-तासांची माहिती किंवा या मदत डेस्कद्वारे मदत मिळवू शकतात.

केंद्र सरकारने कोरोना विषाणूवर एक मदतनीस स्थापित केले आहे. My Gov हेल्प डेस्क नंबर 9013151515 वर व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून कधीही कोरोना संबधित माहिती विचारता येऊ शकते. 24 तासांचा एक हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला आहे. हे मदत लाईन क्रमांक + 91-11-23978046 आहेत. एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1075 देखील आहे. आपण ईमेलद्वारे कोरोना विषाणूशी संबंधित माहिती किंवा सूचना देखील सरकारला विचारू शकता. यासाठी ncov2019@gov.in हा ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे.

राज्यांचे हेल्पलाईन क्रमांक

महाराष्ट्र 020-26127394

उत्तर प्रदेश 18001805145

आंध्र प्रदेश 0866-2410978

अरुणाचल प्रदेश 9436055743

आसाम 6913347770

बिहार 104

छत्तीसगड 104

गोवा 104

गुजरात 104

हरियाणा 8558893911

हिमाचल प्रदेश 104

झारखंड 104

कर्नाटक 104

केरळ 0471-2552056

मध्य प्रदेश 0755-2527177

मणिपूर 3852411668

मेघालय 108

मिझोरम 102

नागालँड 7005539653

ओडिशा 9439994859

पंजाब 104

राजस्थान 0141-2225624

सिक्किम 104

तामिळनाडू 044-29510500

तेलंगाना 104

त्रिपुरा 0381-2315879

उत्तराखंड 104

पश्चिम बंगाल 1800313444222, 03323412600

केंद्र शासित प्रदेश हेल्पलाइन क्रमांक

अंदमान आणि निकोबार 03192-232102

चंदीगड 9779558282

दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 104

दिल्ली 011-22307145

जम्मू-काश्मीर 01912520982, 0194-2440283

लडाख 01982256462

लक्षद्वीप 104

पुडुचेरी 108

महाराष्ट्रात संचारबंदी लागु

महाराष्ट्रात संचारबंदी लागु

राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही राज्यातील बेजबाबदार नागरिकांना कळकळीचे आवाहन केले होते. त्यानतर, सायंकाळी ५ वाजता उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू केल्याचं जाहीर केलं. 

"कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर, आता राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.  काल टाळया, थाळी वाजलं म्हणजे हा सायरन असून तो युद्धातील भोंग्याप्रमाणे आहे. राज्यभरात १४४ कलम लागू केलंय. पण, मला आजपासून संचारबंदी लागू करावी लागतेय. ही मौजमजा करण्याची वेळ नाही. म्हणून मी राज्यभरात संचारबंदी जाहीर करत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. आजपासून आंतरजिल्हा सीमा सील करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यात हा विषाणू पोहोचला नाही, त्या जिल्ह्यात हा विषाणू पोहचू नये, हा यामागचा उद्देश आहे, असेही ठाकरेंनी सांगितले. संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, हा काळ महत्वाचा असून ही वेळ निघून जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

रविवार, २२ मार्च, २०२०

आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू *घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू

*घाबरून जाऊ नका, काळजी घेण्यासाठी उचलली पाऊले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

*     जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा

*       शासकीय कार्यालयात 5 टक्के कर्मचारी, बँका, वित्तीय संस्था सुरु   


मुंबई दि 22 : कोरोनाशी मुकाबला करतांना आपण आता अधिक खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात 144 कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या लाईव्ह प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने याचा मुकाबला करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


       रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे, याची ग्वाही दिली.

*अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर*
राज्यात 144 कलम लागू करण्यात येत आहे. रेल्वे , खाजगी आणि एस. टी. बसेस बंद करण्यात येत आहेत, लोकल सेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांना प्रवास करता यावा म्हणून शहरांतर्गत बस सेवा सध्या सुरु राहील. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधी, वीजपुरवठा करणारी केंद्रे सुरुच राहतील, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, वित्तीय सेवा देणाऱ्या शेअर बाजार आणि बँकासारख्या संस्थाही सुरुच राहतील. तसेच शासकीय कार्यालयात आता 25 टक्के उपस्थिती होती. ती आता केवळ 5 टक्के करण्यात येत आहे.

*जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा*
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका. अजिबात घाबरून जाऊ नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वयंशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

*रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका*
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोना विषाणुमुळे आपण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्यातरी सर्वांच्या परीक्षेचा कठीण काळ आता सुरु झाला आहे. सर्वांनी स्वंयशिस्तीने, सांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढे ही ते कायम राहू द्या, असेही ते म्हणाले. यातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. या प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही, तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आज जनता कर्फ्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या दोन दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतांना दिसते आहे. ही संख्या कमी नाही, तर थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर बाहेर न पडणे यासारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

*घराल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये*
आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिक, आपले कुटुंबिय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही, त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे. परंतू परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे, त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबियांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. त्यांनी बाहेर समाजात किंवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान 15 दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत, याची जाणीव करून देतांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला 31 तारखेपर्यंत ठेवायची आहे, असेही त्यांनी सांगितले.

*विषाणू जातपात पाहत नाही*
आपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद केली. कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपात, धर्म पहात नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही. म्हणूनच आपण अनेक खाजगी कार्यालये, आस्थापना यांना कामगारांची, कर्मचाऱ्यांची उप‍स्थितीची संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले, पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यांना जपा, माणुसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
             -*-*-*-*-

शनिवार, २१ मार्च, २०२०

घरातल्या घरात केले ‘साधू साधू साधू’ ; कल्याणातील नव वधू-वरांचा समाजासमोर आदर्श

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असतानाही काही जण सर्रासपणे या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणातील एका जोडप्याचे करावे तितके कौतूक कमीच आहे.
घरातल्या घरात विवाह सोहळा पार पाडत या जोडप्याने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
रुपेश भास्कर जाधव आणि प्रियांका जाधव अशी या नववधू वरांची नावं आहेत. रुपेश कल्याण कोर्टात वकिली करत आहे तर प्रियांका एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रात त्याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी गर्दी जमा होईल अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची किंवा विवाह समारंभ पुढे ढकलण्याची किंवा अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे शासनातर्फे आवाहन केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी या आवाहनाला लोकांकडूनच हरताळ फासत भव्य-दिव्यतेने विवाह सोहळे साजरे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुपेश आणि प्रियांका या दोघांनी मिळून त्यांच्या विवाहाबाबत घेतलेल्या निर्णयाचे इतरांनीही अनुकरण केले पाहिजे. घरच्या मंडळींसोबत विवाह करण्यासोबतच या दोघांनी विवाहाच्या विधीदरम्यान तोंडाला मास्क बांधून आणि सॅनिटायजरने आपले हात स्वच्छ धुवून लोकांना स्वच्छतेचा संदेशही दिला आहे. सामाजिक भान जपत संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याबद्दल दोघांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल.

शुक्रवार, २० मार्च, २०२०

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून दोन दिवसीय दुकाने व आस्थापना बंदचे आदेश

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून
 दोन दिवसीय दुकाने व आस्थापना बंदचे आदेश

परभणी दि.20:- जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी परभणी जिल्हयातील  शासकीय- निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना, सर्व बँका , दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना , रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न , भाजीपाला व किराणा पुरविणा-या आस्थापना, दवाखाने , वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विदयुत पुरवठा , ऑईल व पेट्रोलीयम व उर्जा संसाधने, प्रसार माध्यमे , मिडिया , अत्यावश्यक सेवा देणा-या आयटी आस्थापना आदी  अत्यावश्यक सेवा वगळून जिल्हयातील सर्व आस्थापना व दुकाने दि. २१ व २२ मार्च २०२० रोजी बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
        आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 
पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक, परभणी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व सबंधित नगरपालिका व नगरपंचायत मुख्याधिकारी, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असेल. तसेच आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समूह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. असेही परभणीचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी . म . मुगळीकर यांनी आदेशात नमुद केले आहे.
                                -*-*-*-*-

मंगळवार, १७ मार्च, २०२०

परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पी.एम.किसान कार्ड चा लाभ घ्यावा-सभापती सौ.मीराताई दादासाहेब टेंगसे

*परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पी.एम.किसान कार्ड चा लाभ घ्यावा-सभापती सौ.मीराताई दादासाहेब टेंगसे*
   परभणी जिल्ह्यातील पशुपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पी.एम.किसान कार्ड द्वारे सर्वात कमी 7% व्याजदराने 2 लक्ष रु.पर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे.व ते कर्ज वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात 4% टक्के सूट मिळणार आहे.
 या योजनेमुळे पशुपालन,दुग्धव्यवसाय,शेळीपालन,मेंढीपालन,कुकुटपालन,वराहपालन करून शेतीला जोडधंदा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी पी.एम.किसान कार्ड ची नोंदणी करून बँकेद्वारे प्रस्ताव दाखल करावेत व ज्या शेतकरी बांधवांना बँका सहकार्य करणार नाहीत त्या सर्व शेतकरी बांधवांनी या प्रस्तावा सह सभापती सौ.मिराताई टेंगसे यांच्यासी संपर्क करावा असे आवाहन पशुसंवर्धन विभाग परभणी करत आहे.सर्व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे प्रयत्न करणार आहेत तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व शेतीला जोडधंदा निर्माण करावा.

कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला, सरकारी कार्यालये सुरूच राहणार

कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला, सरकारी कार्यालये सुरूच राहणार


मुंबई:-कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पुढील 7 दिवस सरकारी  कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, सरकारी कार्यालय 7 दिवस बंद राहणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच, फिफ्टी-50 बेसेसवर काही प्रमाणात कामकाज करता येईल का? याबाबात विचार सुरू असल्याचंही उद्धव ठाकरेंनी  सांगितलंय.    
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 दिवस सरकारी कार्यालयं आणि आस्थापनं बंद असतील, असा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियात आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. कारण, 7 दिवस सरकारी कार्यालय बंद या अफवेने सरकारी कर्मचाऱ्या्ंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. तर, आता सुट्ट्या म्हटल्यावर गावी जाऊ.. असेही अनेकांना वाटत होते. रेल्वे किंवा बसच्या रिझर्व्हेशनचेही बुकींग पाहण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद क्षणिक ठरला. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये, लोकलसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, पब्लीक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे बंद करण्याचे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. हातावर पोट असलेल्या गरिबांसाठी या सेवा महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

Coronavirus Impact : सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद

Coronavirus Impact : सरकारचा मोठा निर्णय ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद


 
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून राज्य मंत्रिमंडळाने आगामी 7 दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत.
त्यांच्यावर उपचार चालू असून आजच (मंगळवार) कोरोनाचा देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिला बळी मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात झाला आहे. एका 64 वर्षीय रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वांना काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक चालु असून आत्तापर्यंत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजेच आगामी 7 दिवस राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा देणारी कार्यालये चालु असणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

शनिवार, १४ मार्च, २०२०

वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला; ट्रॅक्टर पळवले

*वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला; ट्रॅक्टर पळवले*

*वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर हल्ला करुन वाहने पळवून नेल्याची घटना गुंज(खु)पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.तहसीलदार तु.एन.कांगने यांच्या तक्रारीवरुन पाथरी पोलिस ठाण्यात चार  वाळूतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी सकाळी तहसीलदारासह ए.व्ही.निरडे तलाठी,एन.एस.पवार शिपाई,शासकीय वाहनचालक अतुल जोशी यांना वाळु तस्करांनी धक्काबुक्की केली.*

परभणी- वाळूत स्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर हल्ला करुन वाहने पळवून नेल्याची घटना गुंज(खुर्द) पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.तहसीलदार तु.एन.कांगने यांच्या तक्रारीवरुन पाथरी पोलिस ठाण्यात चार वाळूतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी तहसीलदारांनादेखील तस्करांनी धक्काबुक्की केली.
  तालुक्यातील गुंज(खुर्द)येथिल वाळु घाट भागात समावेश असलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होतो. वाळूउपशासाठी जेसीबी, पोकलंडचा वापर तस्कर करत असतात. तहसीलदार .यु.एन.कांगने कांगने यांना भ्रमनध्वनिवरुन माहीती मिळताच    स्वत: तहसीलदार कांगने यांच्यासमवेत तहसिल कार्यालयातील एन.व्ही.निरडे तलाठी सज्जा गुंज(खुर्द) शिपाई एन.एस.पवार, वाहनचालक अतुल जोशी यांचा समावेश होता.
 पथकाने शनिवारी सकाळी ९:३० सुमारास गुंज खुर्द येथे असलेल्या गोदावरी पात्रात गेले असता त्याच्या निदर्शनास एक ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. तस्करांकडून वापरला जाणारा ट्रॅक्टरदेखील विनाक्रमांकाचे होते. यादरम्यान वाळूतस्करी करणारे पसार झाले. पथकाने ट्रॅक्टरमधील वाळूची तपासणी केली असता प्रत्येक ट्रॉलीत एक ब्रास वाळू आढळून आली. पथकाने लगेचच वाळू वाहणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. पकडलेली वाहने घेऊन पथक पात्राच्या बाहेर निघण्याच्या तयारीत असताना  हीरामण बालासाहेब गायकवाड, युवराज अशोक गायकवाड,भारत अशोक गायकवाड,सोनु प्रल्हाद गायकवाड व ईत्तर नातेवाईक यांनी ही वाहने आणि पथकाला गोदावरी पात्रातच आडवत दमदाटी व धक्कबुक्की केली.
 पथकातील अधिकाऱ्यांवर हल्ला करत त्यांनी शिविगाळ, धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वाहने सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकारी वाहने सोडत नसल्याचे दिसताच आरोपींनी थेट अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेले.तुम्हाला काय कारवाई करायची आहे तर करा आम्ही तुम्हाला पाहुन घेवु अशी धमकी देत तेथून गायब झाले.
 तहसीलदार कांगने यांनी प्राधिक्रत केल्यावरुन मंडळ अधिकारी पी.एन.गोवंदे यांच्या फीर्यादीवरुन यासंदर्भात शनिवारी गुंज खुर्द येथुन आल्यावर पाथरी पोलिस ठाण्यात चार व ईतर आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा, शासकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बि.आर.तिप्पलवाड पुढील तपास करत आहेत.

*सम्यक संगर वृत्तपत्राच्या बातमीची जिल्हाधिकारी यांच्याकडून दखल,रोड लगतच्या वीटभट्ट्या तीन दिवसात हटवण्याचे आदेश,पाथरीच्या तहसीलदाराच्या उलट्या बोंबा*

सम्यक संगर वृत्तपत्राच्या बातमीची जिल्हाधिकारी यांच्याकडून दखल,रोड लगतच्या वीटभट्ट्या तीन दिवसात हटवण्याचे आदेश,पाथरीच्या तहसीलदाराच्या उलट्या बोंबा

परभणी:-तालुक्यातील राज्य आणि रस्ते महामार्गालगत मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या थाटल्या गेल्या असून वीट भट्टीच्या धुरामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत सम्यक संगरन रोखठोक सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून अनाधिकृत वीटभट्ट्याचा हा प्रकार उघडकीस आणला आहे या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पाथरी तहसीलदार यू.एन कांगणे यांना 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या अनधिकृत वीटभट्ट्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानंतर तहसीलदार यू.एन. कांगणे यांनी संबंधित वीट भट्टी धारकांना नोटिसा काढल्या खऱ्या पण कर्तव्यात कसूर करत आत्तापर्यंत एकाही वीटभट्टी धारकांवर कायदेशीर कार्यवाही तर केली नाहीच पण संबंधित विट भट्ट्या बाबत व यांच्यामुळे जनतेच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत सडेतोड लिखाण करणाऱ्या सम्यक संगर या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीस अप्रत्यक्षरीत्या धमकावण्याचा प्रयत्न केला या घटनेचा पाथरी तालुका पत्रकार संघाने तातडीने निषेध नोंदवला.यापुढे पुराव्यानिशी सत्य वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारांना तहसीलदारांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचे पालन करून वीटभट्ट्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात एवजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला बगल देत पत्रकारांवर दबाव आणण्याचे तंत्र पाथरी तहसील चे तहसीलदार यु.एन. कांगणे यांनी वापरून उलट्या बोंबा मारायला सुरू केले आहे.

शुक्रवार, १३ मार्च, २०२०

कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू; खबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू; खबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्या टिप्प्प्प्प


मुंबईदि. 13 : राज्यात कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई,नवी मुंबईपुणेपिंपरी-चिंचवड,ठाणेनागपूर येथील व्यायामशाळा,चित्रपट आणि नाट्यगृहेजलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळामहाविद्यालये देखील बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावीअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले.

विधानसभेत निवेदनानंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे,शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड,राज्यमंत्री संजय बनसोडेआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यासमाजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले,राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. राज्यात 17 रुग्णांमध्ये मुंबई येथे 3ठाणे येथे 1पुणे 10 आणि नागपूर येथे 3 रुग्ण आढळून आले आहे. या 17 व्यक्तींमध्ये 15 जण दुबईफ्रान्सअमेरिका येथे प्रवास करुन आले आहेत. यातील चौघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात10 जणांना पुणे येथे नायडू रुग्णालयात तर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये,महापालिका रुग्णालयेवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारीनंतर चीनइराण,इटलीद.कोरियाफ्रान्सस्पेन आणि जर्मनी या सात देशातून प्रवास केलेल्या प्रवाशांना पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. मात्र,राज्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अमेरिका आणि दुबई येथून प्रवास केलेल्या व्यक्ती असून या दोन देशांचा देखील पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या यादीतील देशांमध्ये समावेश करण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनाने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा 1897 (2) या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवार दि. 13 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलउपाहारगृहेमॉल्स बंद करण्यात येणार नाही. त्याचबरोबर रेल्वेबससेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद करण्यात येणार नाही. मात्र नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात ज्या संस्थांना धार्मिक,सांस्कृतिकव्यावसायिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहेती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही. असेही त्यांनी सांगितले. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची परवानगी द्यावीअशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

पुणेपिंपरी-चिंचवड येथील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात येणार आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु राहतील. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रयोगशाळांमध्ये उपकरणांची आवश्यकता असून प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. किट्स वाढविण्याबाबत प्रधानमंत्र्यांना पत्रदेखील पाठविण्यात आले आहे,असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना आणि व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी घाबरुन न जाता सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करुयाअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

युवानेत्या प्रेरणाताई वरपुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ढालेगाव येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप

युवानेत्या प्रेरणाताई वरपुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ढालेगाव येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप.
आज ढालेगाव येथे पाथरी  मतदारसंघाच्या युवानेत्या आदरणीय प्रेरणाताई वरपुडकर यांचा वाढदिवसा निमित्त जि.प.प्रा शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले या वेळी  उपस्थित राष्ट्रवादी उपजिल्हा अध्यक्ष  उत्तमराव शिदे शालेय समिती अध्यक्ष बाबासाहेब शिदे काँग्रेस उप अध्यक्ष बंटी शिदे ग्रमापचायत सदस्य नितीन भदर्ग बळीराम शिदे भाजपा नेते सतोष चव्हाण भागवत शिदे पप्पु शिदे राम मोरे साई शिदे भैया शिदे गणेश शिदे व सर्व  प्रेरणाताई वरपुडकर मिञ मडळ उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रश्न सोडववण्यास मी कटीबद्द राहील:- प्रेरणा ताई वरपूडकर

परभणी जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रश्न सोडववण्यास मी कटीबद्द राहील:-  प्रेरणा ताई वरपूडकर 
पाथरी प्रतिनिधी:-तालुक्यातील एकल महिलांचा मेळावा दि 13 मार्च 2020 रोजी संपन्न झाला या एकल महिला मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी प्रेरणा ताई बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या कि राजकीय क्षेत्रात काम करीत असताना एकल महिलांचे प्रश्न त्याच्या समस्या  सोडवण्यासाठी मी सतत काम करील व सोबत राहील.
   यावेळी जी प सदस्य भावना ताई नखाते म्हणाल्या की तालुक्यातील एकल महिलांचे प्रश्न व त्याच्या साठीच्या  ज्या विकास योजना आहेत त्या आम्ही निश्चित पणे राबवून त्यांना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगण्यासाठी महिला मेळाव्याच्या माध्यमातून प्रश्न निश्चित सोडवू 
यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती सौ,कल्पना ताई थोरात, नगरपरिषद पाथरी च्या नगराध्यक्ष सौ मीनाताई भोरे ,  coro मुंबई चे मराठवाडा समन्वयक गणेश भाऊ सोनवणे,शेकाप बीड जिल्हा नेते भाई मोहन गुंड , श्रमिक क्रांती लातूर चे लातूर चे मारोती गुंडीले, पाथरीचे नगरसेवक अजयसिह पाथरीकर ,गोविंद शिंदे लातूर आदी मान्यवर यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाला कानसुर, मसला, डोंगरगाव, देवगाव, रेनाखळी जवळा झूटा पाथरी या गावातील 270 महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत हिवाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कसबे यांनी केले आभार विकास क्षीरसागर यांनी मानले

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...