जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन;
जीवनावश्यक वस्तूचा साठा मुबलक असल्याने गर्दी टाळावी
*आज 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले
* कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी
परभणी दि.25:- जिल्ह्यातील सर्व नागरीकांना
२१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न - धान्याचा साठा मुबलक असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे.
तरी जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य , भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तरी जीवनावश्यक वस्तू , औषधी आणि अन्नधान्य , भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरीकांनी काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२६२४४ व्हॉटसअप क्रमांक - ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२४५२ - २२६४०० येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालयात एकूण 121 रुग्णांची नोंद झाली असून 74 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 15 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण 15 स्वॅबबाबत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
जिल्ह्यात परदेशातून आलेले व त्यांच्या सहवासातील एकूण 54 नागरिक निगराणीखाली असून यापैकी 14 नागरिक रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले आहेत. 107 नागरीकांचे त्यांच्या घरी विलगीकरण करण्यात आले आहेत. त्यांची वैद्यकीय पथकामार्फत फेरतपासणी करण्यात येत असून या 107 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आज नवीन 8 संशयीत नागरिकांची जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्थेत नोंद झाली. तर कोरोना बाह्यरुग्ण विभागात 137 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. आज रोजी 9 रुग्णांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दि. २५ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु बाधीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगु नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये. असे जिल्हाधिकारी दी म . मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा