*आग्रलेख-राज्यात लॉक डाऊन*
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा, भारतीय नवीन वर्षाच्या शुभारंभाचा पहिला दिवस. नववर्षाची सुरुवात म्हणून आपण गुढीपाडवा पारंपारिक उत्साहाने आणि आनंदाने थाटात साजरा करतो. रावणावर विजय मिळवत मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र 14वर्षाच्या वनवास नंतर आयोध्या मध्ये परतले . तो गुढीपाडव्याचा दिवस , आयोध्यावासी यांनी प्रभू रामचंद्राचे सीतामाता व लक्ष्मण यांचे घरोघरी गुढ्या उभारून तोरणे लावून उत्साहाने स्वागत केले.तेव्हा पासून गुढीपाडवा नववर्षारंभ दिन पारंपारिक पद्धतीने साजरा करावयाचा प्रघात रूढ झाला. गुढीपाडव्याच्या आणि नव वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना कोरोना च्या प्रादुर्भावला रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते .22 मार्च सकाळी सातपासून रात्री नऊ पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन होते. देशभरातून कोरोना रोगाला हद्दपार करण्याकरिता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व भारतीय देशवासीय बंधू-भगिनी यांनी या आव्हानाला उस्फुर्तप्रतिसाद दिला आणि जनता कर्फ्यू चे पालन केले. त्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले. कोरोनाहद्दपार करण्यासाठी ही कोरोना विरुद्ध लढाईची सुरुवात आहे, यापुढेही मला जनतेच्या अशाच सहकार्याची आणि साथीची गरज आहे असे मोदी यांनी नमूद केले . पंतप्रधान मोदी यांनी जे संबंधित कोरोणा विरुद्ध लढताहेत आणि त्याला आटोक्यात आणण्याकरिता प्रयत्नशील आहेत, अशा नर्स डॉक्टर्स आणि संबंधितांना प्रोत्साहन देण्याकरिता पाच वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवत घंटानाद करीत त्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन केले होते, या आवाहनाला देखील जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .
जनता कर्फ्यू संपता च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात बंद म्हणजे टोटल बंद करिता 22 मार्च मध्यरात्रीपासून राज्यात सर्वत्र लॉक डाऊन घोषित केले. संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश कलम 144 लागू करण्यात आले आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तीने एकत्र येऊ नये, आणि गर्दी करू नये याकरिता जमा बदली आदेश लागू करण्यात आला आहे कोरोना रोगाच्या. विषाणूचा प्रादुर्भाव राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना गस्त रोग्यांच्या संकेत भर पडत आहे रुग्ण वाढत आहे त, त्याकरिता आवश्यक ती खबरदारी आणि काळजी घेण्याकरिता हे उपाय योजनेत आली आहे त. 31 मार्च ही तारीख पहिला टप्पा म्हणून ठरवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. गरजपडली तर, ती तारीख पुढेही वाढविण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. जमावबंदी आदेश आणि कलम 144 मधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आली आहे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू ची दुकाने सुरू राहतील मात्र, बाकीची सर्व दुकाने व्यवस्था आणि वाहतूक बंद राहील ते स्पष्टकरण्यात आली आहे. जनतेने अनावश्यक गर्दी करणे टाळावे, आणि कोरोना रोगाला आटोक्यात आणण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला केले आहे. वाहतूक बंद करावयाची वेळ येऊ देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणत होते, परंतु नाईलाजाने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. नाईलाजाने वाहतूक बंद केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या सीमा बंद कराव्या लागल्या तर तसा निर्णय घ्यावा लागेल. असेही मुख्यमंत्री म्हणाले. परदेशातून राज्यात आणि मुंबई मध्ये येणारी विमाने बंद करण्यात आली आहेत. विमानाची फ्लाईट बंद ठेवून विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस सेवा, ट्रॅव्हल्स रेल्वे, देखील बंद करण्यात आले आहेत . शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या अधि च पुढे ढकलण्यात आल्याआहेत. परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावला रोखण्यासाठी ही तुम्हा आम्हा सर्वांची परीक्षा आहे, असे निदर्शनास आणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपले सरकार योजत असलेल्या उपायांना आणि घेत असलेल्या काळजी व खबरदारीला सहकार्य करावे साथ द्यावी, आणि आपण सर्वांनी मिळून कोरोना ला हद्दपार करू असे आवाहन केले.
जगामधील बहुतांशी देश कोरोना रोगाच्या विषाणूचा प्रसार आणि प्रचार रोखण्यासाठी आणि त्याला आटोक्यात आणण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करीत लढा देत आहेत .भारत देशात कोरोना ने शिरकाव केला आहे .बाधा झालेल्या रोग्यांच्या संख्येमध्ये भर पडत आहे आणि आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातील काही शहरे आणि भागांमधून कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगाचे विषाणू पसरण्याची आणि प्रसार वाढण्याची जी साखळी आहे, ती साखळी तोडणे महत्वाची आणि गरजेचे आहे जनता कर्फ्यू पालन करून आपण त्याविरुद्ध सज्ज असल्याचे दाखवली आहे. गर्दी टाळत. आणि स्वतःची आणि स्वतः बरोबर इतरांची काळजी घेत आपण निकराने आणि हिंमतीने संघटितपणे लढा देत, कोरोना ला हद्दपार करावयास हवे. राज्यामध्ये सर्वत्र लाक आऊट घोषित असताना, आज गुढीपाडवा साजरा होत आहे, जमावबंदी आदेश आणि संचारबंदी लागू असल्यामुळे पाडवा साजरा करावयास मर्यादा आहेत. मर्यादा पाळावयास हि हव्या, तरच कोरूना विरुद्ध लढण्याचा आपला संकल्प पूर्ण होईल. !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा