*सतर्क ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा आणला उघडकीस; महसूल विभागाकडून पंचनामा*
पाथरी (लक्ष्मण उजागरे):-कोरोनाव्हायरस संसर्ग थांबवण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संचारबंदी चालू आहे. सध्या प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना संसर्ग थांबवण्याकडे असल्याचा फायदा घेत अवैध वाळू उपसा करणार्या वाळूमाफियांनी पुन्हा गोदावरी पोखरण्यास सुरुवात केली आहे.पाथरी तालुक्यातील सर्तक ग्रामस्थांनी अशाच प्रकारे होणारी वाळूचोरी महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण व कानसुर दरम्यान नदीपात्रात वाळूचा मोठा साठा आहे. मागील अनेक वर्षापासून कानसुर ग्रामस्थांच्या विरोधामुळे नदीपात्रातील ही वाळू प्रशासनाला लिलावात काढता आली नाही. आता यावर वाळूमाफियांची नजर आहे अधून-मधून ही वाळू चोरण्याचा प्रयत्न केला जातो. मागील सहा दिवसांपासून संचारबंदी असल्याचा फायदा घेत, काही वाळू चोरट्यांकडून नदीपात्रापर्यंत रस्ता करत वाळूचोरी करण्यात येत होती. सदरील वाळूचा साठा एका शेतात करण्यात आला होता.
दरम्यान, ही बाब कानसुर येथील सर्तक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती महसूल प्रशासनाला दिली. रविवारी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पथकाने वाळूसाठा ठिकाणी पंचनामा करत ही वाळू ताब्यात घेतली. यावेळी नदीपात्रातून तयार करण्यात आलेला रस्ताही जेसीबीच्या साह्याने काढून टाकण्यात आला आहे.जप्त केलेली वाळू आता घरकुल लाभार्थ्यांना वितरित केली जाणार असल्याचे मंडळाधिकारी यांनी सांगितल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा