परभणी जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रश्न सोडववण्यास मी कटीबद्द राहील:- प्रेरणा ताई वरपूडकर
पाथरी प्रतिनिधी:-तालुक्यातील एकल महिलांचा मेळावा दि 13 मार्च 2020 रोजी संपन्न झाला या एकल महिला मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी प्रेरणा ताई बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या कि राजकीय क्षेत्रात काम करीत असताना एकल महिलांचे प्रश्न त्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत काम करील व सोबत राहील.
यावेळी जी प सदस्य भावना ताई नखाते म्हणाल्या की तालुक्यातील एकल महिलांचे प्रश्न व त्याच्या साठीच्या ज्या विकास योजना आहेत त्या आम्ही निश्चित पणे राबवून त्यांना समाजामध्ये सन्मानाने जीवन जगण्यासाठी महिला मेळाव्याच्या माध्यमातून प्रश्न निश्चित सोडवू
यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती सौ,कल्पना ताई थोरात, नगरपरिषद पाथरी च्या नगराध्यक्ष सौ मीनाताई भोरे , coro मुंबई चे मराठवाडा समन्वयक गणेश भाऊ सोनवणे,शेकाप बीड जिल्हा नेते भाई मोहन गुंड , श्रमिक क्रांती लातूर चे लातूर चे मारोती गुंडीले, पाथरीचे नगरसेवक अजयसिह पाथरीकर ,गोविंद शिंदे लातूर आदी मान्यवर यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाला कानसुर, मसला, डोंगरगाव, देवगाव, रेनाखळी जवळा झूटा पाथरी या गावातील 270 महिला उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत हिवाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ कसबे यांनी केले आभार विकास क्षीरसागर यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा