बुधवार, ११ मार्च, २०२०

नागरिकांनी कोरोना विषाणू बाबत घाबरून न जाता खबरदारी घ्यावी जिल्हाधिकारी- दी.प. मुगळीकर

नागरिकांनी कोरोना विषाणू बाबत घाबरून न जाता खबरदारी घ्यावी जिल्हाधिकारी- दी.प. मुगळीकर
परभणी-कोरोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने चिन देशातून झाला असूनजिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही कोरणा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी वारंवार हात धुवावेत शिंकताना खोकताना रुमाल वापरावा तसेच परिसरात स्वच्छता ठेवावी आणि हस्तांदोलन व यात्रा महोत्सव आदी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कुरणा विषाणू बाबत घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दी.प.मुगळीकर यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा संसर्ग बाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बि पी पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंकुश पिनाटे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागरगोजे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले की कोरोना बाबतच्या जनजागृतीसाठी शहरात फलक लावून तसेच रेल्वेस्थानक आकाशवाणी केंद्र व बसस्थानकातून नागरिकांना खबरदारी घेण्याचे निर्देश द्यावेत असे सांगितले जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रम यात्रा महोत्सव याचबरोबर पालिका हद्दीतील बाजार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिली जिल्ह्यातील एकूण पाच व्यक्ती दुबईहून आले असून त्यांचे प्राथमिक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून विशेष कक्ष म्हणून महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एरंडेश्वर येथील आरोग्य केंद्र ही यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारी म्हणून जिल्ह्यातील तील बायोमेट्रिक उपस्थिति प्रणाली ही तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवणार आहे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे पत्ती ची पूर्वतयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍याचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे आपत्तीची पूर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी इन्सिडेंट कमांडर म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागरगोजे मोबाईल नंबर (9422 744850) आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खंदारे मोबाईल नंबर( 976719 1075) यांना सनियंत्रण म्हणून आदेशित करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी (9975013726)या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे या बैठकीस महापालिका आरोग्य विभाग, शिक्षण, रेल्वे, एसटी महामंडळ आदी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...