महाराष्ट्रात करोनाचे पाच रूग्ण, आरोग्यमंत्र्याची माहिती
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. सर्वप्रथम काल पुण्यात दोन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सायंकाळपर्यंत या विषाणुची लागण झालेले आणखी तीन जण आढळून आले. महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेले आजपर्यंत पाच रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत एकूण ३०४ नमुने संकलित करण्यात आले आहेत, या पैकी २८९ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह व पाच पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी दहा नमुन्यांच्या तपासणीचा निकाल यायचा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
चीनसह जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणुची पुण्यातील पाच जणांना लागणं झाली आहे. सुरुवातील दोघांना लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. करोनाचा संसर्ग झालेल्या या दाम्पत्यासोबत बीडमधील तीन जण दुबईला गेले होते. सध्या आरोग्य विभाग त्यांच्यावर नजर ठेवून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा