शुक्रवार, २७ मार्च, २०२०

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव,कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

*Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव,कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर*
नवी दिल्ली – देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. नागरिकांनी गरज नसल्यास घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असंही मोदींनी सांगितले. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशात गुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे. कोरोनाने जवळपास 198 देशांना विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. भारतातील अनेकांची चाचणी निगेटिव्ह आली असून काहींना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी देशात सर्वात मोठं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. ओडिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांसाठी सर्वात मोठं रुग्णालय उभारणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. कोरोनाग्रस्तांसाठी हे रुग्णालयात उभारण्यात येत असून यामध्ये तब्बल एक हजार बेडची व्यवस्था असणार आहे. ओडिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. गुरुवारी (26 मार्च) एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मुख्‍यमंत्री नवीन पटनायक यांनी याबाबत आदेश दिले आहे. सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे.
कोरोनामुळे इटलीत 8200 जणांना जीव गमवावा लागला आहे. चीनच्या पाठोपाठ कोरोना व्हायरसनं इटली आणि स्पेनमध्ये धुमाकूळ घातला आहे. इटलीमध्ये नवीन 6153 संक्रमित झालेले रुग्ण समोर आले आहेत. तर हीच संख्या जागतिक स्तरावर 5 लाखांच्या पार गेली आहे. वॉशिंग्टनच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, इटलीत 6153 नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. इटलीच्या सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सी रिपोर्टनुसार, गुरुवारी दिवसभरात 662 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील मृतांची संख्या 8 हजारांच्या पार गेली असून, कोरोना संक्रमितांची संख्या  80589 पर्यंत पोहोचली आहे. इटलीसारखंच स्पेनमध्येही कोरोनानं थैमान घातलेलं आहे. स्पेनमध्ये झालेले मृत्यूंच्या आकड्यांनी चीनमधल्या मृतांच्या आकड्यालाही मागे टाकले होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...