शुक्रवार, ८ मे, २०२०
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
आरोग्य सेतू मोबाईलसह आता दूरध्वनीवर उपलब्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना नोंदणीचे आवाहन
पाथरी येथे कोरोणाच्या पार्श्वभुमीवर शांतीदुत तथागत गौत्तम बुध्द यांची जयंती घरोघरीच साजरी
सविस्थर वृत आसे कि जगावर कोरोणा या संसर्गजन्ये आजाराने थैमान घातला आहे हजारो नागरीक या मध्ये मृत्युपावत आहेत
सोमवार, ४ मे, २०२०
पाथरीत आ.दुर्राणी यांचे हस्ते कापुस खरेदीस प्रारंभ,प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव.
शुक्रवार, १ मे, २०२०
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे ला निवडणूक.
मुंबई –: महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीची आज घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ मेपूर्वी आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
विधानपरिषदेचे २४ एप्रिलला ८ सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा २४ एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. लवकरच या निवडणुकीची अधिसूचना निघून पूर्ण कार्यक्रमाचा घोषित होणार आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा किंवा विधान परिषद या दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. मात्र विधानपरिषदेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून विधानसभेवर घेण्याबाबत मंत्रिमंडळाने ठराव करून दोनवेळा राज्यपालांना पाठविला होता, मात्र तो प्रस्ताव राज्यपाल मान्य करत नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता.
अखेर त्यावर तोडगा काढण्यात यश मिळाले आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी देण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यानंतर पुढील हालचाली झाल्या.
विधानसभेत २८८ आमदार आहेत. विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून जायला २९ मतांचा कोटा आहे. आकडेवारी पाहता महाविकास आघाडीच्या पाच तर भाजपच्या तीन जागा जवळपास निश्चित आहेत. नवव्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडे १७० मते आहेत.
सहा जागांसाठी त्यांना १७४ मतांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे १०५ स्वत:ची तर ६ ते ७ मित्रपक्षांची मते असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीला ५ आणि भाजपला ३ जागा निश्चित मानल्या जात आहेत. नववी जागा कुणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.विधानसभेतील बहुमत चाचणीच्या वेळी महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६९ मते मिळाली होती. मात्र विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे.
महाविकासआघाडीने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर निवडणूक नक्कीच रंगतदार होईल. पण मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असताना हा धोका आघाडी पत्करण्याची शक्यता नाही व निवडणूक बिनविरोध करण्याकडेच सत्तारूढ आघाडीचा प्रयत्न राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न
यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
सेलूच्या त्या महिलेने नांदेडला प्राण सोडला; जिल्हा प्रशासन पुढील कारवाई करणार!!
सेलूच्या त्या महिलेने नांदेडला प्राण सोडला; जिल्हा प्रशासन पुढील कारवाई करणार!!
शेतकर्यांना खते,बियाणे वेळेव उपलब्ध करून द्या-पालकमंत्री नवाब मलीक
मदतीचा_हात* *दुर्धर आजाराने त्रस्त विद्यार्थिनीच्या आर्थिक मदतीसाठी कृषी सभापती आल्या पुढे* *सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी केली वयक्तिक 5000रु.यांची आर्थिक मदत व एवढयावर न थांबता सर्कल मधील दानशूर लोकांकडून मदत घेऊन शिक्षणाधिकारी यांच्या कडे सुपूर्द केली
कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
सेलूत परिसरात तीन दिवस कर्फ्यू; कलेक्टर मुगळीकर यांचे आदेश जारी ;ती महिला पॉझिटिव्ह
मिळालेल्या वृत्तानुसार नांदेड येथे पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला औरंगाबाद येथून सेलू येथे आली होती.औरंगाबाद येथील नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी परभणीच्या एका खाजगी दवाखान्याकडे रेफर केले होते परंतु त्या ठिकाणी उपचार न झाल्यामुळे तिला नांदेडला हलविण्यात आले त्यामुळे ही महिला नेमकी कुणाकुणाशी संपर्कात आली यासंदर्भात माहिती घेण्यात येत असून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशान्वये सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून सेलु परिसरात तीन दिवस कर्फ्यू जारी करण्यात आला.सेलू येथील या महिलेच्या सोळा नातेवाईकांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले असून संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात येत असल्याचे बालाजी शेवाळे यांनी सांगितले आहे. ही महिला सेलू ची रहिवाशी असून ती नांदेडला उपचारासाठी गेली होती आणि त्याठिकाणी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय केली असून सेलू शहर आणि परिसरात तीन दिवस जारी करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
Covid -19, काळात स्थलांतरावरून परत आलेल्या कुटुंबियांना तहसील कार्यालय पाथरी व संकल्प मानव विकास संस्थाच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप....
त्यानुसार दिनांक 28 एप्रिल रोजी पाथरी तहसीलदार मा. कांगणे साहेब , पंचायत समिती सभापती सदाशिव थोरात, मंडळ अधिकारी, भरकड साहेब, संकल्प संस्थेचे समन्वयक विठ्ठल साळवे, , राजू साठे, यांनी मरडसगाव येथे जाऊन स्थलारावरून 28 कुटूंबातील लोकांची विचारपूस करून संकल्प संस्थेच्या वतीने आपणास हे जीवनावश्यक वस्तू चे वाटप करीत आहोत, आपण स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी आणि पाथरी तालुका करोना मुक्तीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली , प्रसंगी 30 लोकांना जीवनाआवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
शनिवार, २५ एप्रिल, २०२०
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात;दोन दिवसीय संचारबंदी लागू
.
जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक उतरले मैदानात
... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे..
मंगळवार, २१ एप्रिल, २०२०
जिल्हयात 1 लाख 41 हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप - जिल्हाधिकारी
पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन *मुस्लिम बांधवांनी एकत्र न येता घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे-जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर*
कोरोनाच्या माहितीसाठी मोबाईलधारकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा
*कोरोनाच्या माहितीसाठी मोबाईलधारकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे*
परभणी, दि.21:- जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांनी केंद्र सरकारकडून एकुण ११ भाषेत विकसित करण्यात आलेले 'आरोग्य सेतू ' हे अॅप प्लेस्टोअर व अॅपस्टोअर वरून विनामूल्य डाऊनलोड करुन या अॅपचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करून आपल्या आरोग्य सुरक्षेविषयी माहिती वेळोवेळी जाणून घ्यावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
भारत सरकारने कोरोना (कोव्हीड- १९ ) या विषाणू प्रादुर्भावाची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी अँड्रॉइड व आयओएस प्रणाली धारक मोबाईल धारकांसाठी 'आरोग्य सेतू ' अॅप विकसीत केलेले आहे. हे अॅप ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानावर आधारित असल्याने याद्वारे कोव्हीड - १९ बाधित रुग्णांच्या मोबाईल क्रमांकाच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. तंत्रज्ञाद्वारे कोव्हीड बाधित रुग्ण जवळपास आल्यास ( साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर ) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. तसेच कोविड - १९ बाधेची स्व:चाचणी , प्रतिबंधात्मक उपाययोजना , आपल्या नजीकचे कोव्हीड तपासणी केंद्र क्रमांक, कोव्हीड -१९ बाधेच्या अनुषंगाने सर्व साधारण प्रश्नांची उत्तरे , राज्यातील विविध हेल्पलाईन क्रमांक तसेच अपरिहार्य स्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ई - पासेस , सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे व काय करू नये, आदी वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल मधील ब्लूटूथ नेहमी सुरु ठेवणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-
सोमवार, २० एप्रिल, २०२०
सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा -जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर
गुरुवार, १६ एप्रिल, २०२०
परभणी जिल्ह्यात गावठी दारुच्या व्यवसायाला आला ऊत
दारुविक्रेतही चढ्या दराने पाहिजे ती दारु उपलब्ध करुन देत आहे. मात्र दामदुप्पट दारु पिणे अनेकांना शक्य होत नसल्याने अनेकांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. गावातील गावठी दारुच्या भट्ट्या आणि पारधी बेड्यावर मद्यपींची गर्दी वाढत आहे. देशीविदेशी दारु ऐवजी तळीमारांनी आता हातभट्टीच्या दारुला पसंती दिल्याने गावठी दारुची मागणी वाढली आहे. त्यामुळे संचारबंदी झुगारुन ग्रामीण भागात व जंगल परिसरात अवैधरित्या दारुच्या भट्टया लावल्या आहे.
स्वस्त धान्य वाटपात अनियमितता करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई-जिल्हाधिकारी
त्यानुसार फुलेरवाडी येथील रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबीत करण्यात आले आहे तर सावंगी पीसी रास्तभाव दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिली आहे.
परभणीत 3 दिवस संचारबंदी; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव
परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला;शहरात मोठी अस्वस्थताः प्रशासन हायअर्लट
रविवार, १२ एप्रिल, २०२०
आज माफी नाही!..!कलेक्टर मुगळीकर यांचे आजच तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश!! एकही बळी नाही!.
जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी पाथरी व मानवत येथील ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन आयसोलेशन व क्वारंटाईन रुग्णांची व्यक्तीशः विचारपुस केली,जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३२० संशयितांची नोंद,जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नाही
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथिल गावकर्यांनी केली गावबंदी बंदी
कारण इतर ठिकानहुन लोक गावात ये-जा करीत असल्याने त्यांच्यापासून गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे, असे समजावुन सांगुन गावात प्रवेश करता येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर माती दगड आणी काट्या टाकून वाहतूक तात्पुरती बंद केली आहे.
शनिवार, ११ एप्रिल, २०२०
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन - मुख्यमंत्री;तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
बुधवार, ८ एप्रिल, २०२०
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध
पराभवाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि जगावर राज्य निर्माण करण्यासाठी जर्मनीचा हुकूमशहा अडालफ हिटलरने जगावर दुसरे महायुद्ध लादले.
शनिवार, ४ एप्रिल, २०२०
5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता फ्रिज, एसी, टीव्ही व इतर विद्युत उपकरणे नेहमीप्रमाणे चालू ठेवावीत-जिल्हादंडाधिकारी श्री. मुगळीकर
कुवेतहून परतलेली एकाच कुटुंबातील ४ जण होम क्वारंटाईन
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा
दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा
गुरुवार, २ एप्रिल, २०२०
कोरोणा आणी जागतिकीकरणाची दिशा.
त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...