सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा -जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर
परभणी दि.20:- शासकीय कापूस खरेदी व बाजार समित्याच्या आवारातील दैनंदिन व्यवहार सुरु करणेसाठी शासनाने सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी https : / / forms . gle VUASetva7aDqkGn3A या लिंकवर ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा. शेतमाल विक्रीसाठी आणण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समित्या मधील सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार सुरु ठेवणेबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी सस्था , परभणी / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था / प्र . विभागीय व्यवस्थापक , महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ म . विभागीय कार्यालय परभणी / जिल्हा मार्केटिंग अधिकारी , परभणी / सभापती व सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती / भारतीय कपास निगम यांचे प्रतिनिधी / बाजार समिती चे व्यापारी संचालक / जिनिंग प्रेसिंग युनियनचे पदाधिकारी यांची सभा आज दि . 20 एप्रिल 2020 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.
नोंदणी फॉर्म भरताना शेतकऱ्याजवळील कापसासोबत शेतकऱ्याचा अॅपद्वारे काढलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य असणार आहे . त्या शिवाय शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही . सदरची खरेदी व नोंदणी फक्त परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकन्याकरिता कापूस खरेदीसाठीच राहील . सदरील नोंदणी ही ऑनलाईन अर्जाद्वारे केलेल्या नोंदणीचा डाटा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , परभणी या कार्यालयाकडून संबंधीत बाजार समितीला दिला जाईल व त्याप्रमाणेच बाजार समितीने शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे / SMS वरून कापूस खरेदीस बोलवावे. इतर शेतमाल खरेदी संदर्भात बाजार समितीने दोन WhatsApp क्रमांक मेल आयडी वर्तमान पत्रामध्ये , आकाशवाणी इत्यादी द्वारे जाहीर करावेत . संबंधित शेतकरी त्यांचा 7 / 12 , आधार कार्ड व कापसाचा फोटो नोट कॅम अॅपद्वारे घेऊन उपरोक्त नमूद WhatsApp वर - मेलवर पाठवतील . त्यानंतर फोन करून टोकन क्रमांक प्राप्त करुन घेतील. संबंधीत बाजार समितीने वरील प्रमाणे प्रथमत : विवस नोंदणी केलेनतर चौथ्या दिवसापासून कापूस तर सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी - विक्री साठी आडते , जिनिंग , खरेदीवारांची संख्या पाहून शासन निर्देशाप्रमाणे कापसासाठी एका दिवशी कमाल 20 वाहने किंवा बाजार समिती व खरेदी केंद्राच्या क्षमतेप्रमाणे टोकन देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा . इतर शेतमालासाठी कमाल ( 10 ) वाहनांना टोकन देण्यात यावे . तथापि कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्व भूमीवर सोशल डिस्टन्स तर नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी . विक्रिसाठी कापूस आणताना शेतकन्याने त्यांचे मोबत 7 / 12 , आधार कार्ड बैंक पासबुक सोचत आणावे वरीलप्रमाणे गावाणी कलम टोकन क्रमांक घेतला आहे . अशा शेतकन्यानेच फक्त ज्या दिवशी बाजार समितीने बोलावले त्या दिवशी शेतमाल घेऊन बाजार समिती मध्ये, ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी शेतमाल का पाल त्यावेळस बाजार समिती गेटवर वर संबंधित शेतकऱ्यासबाजार समितीचा शिक्का असलेले टोकन क्रमांकाची पावती यावी . ज्याच्या टोकन क्रमांकाची पावती शेतकरी बाजार समिती आवारात प्रवेश दोन वाहनातील अंतर किमान 10 से 15 फूट राहील याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील शासकीय खरेदी व बाजार समितीचे कामकाज तूर , भूसार माल , व कापूस खरेदी केंद्र दि . 20 एप्रिल 2020 पासून पूर्ववत सुरु ठेवणे बाबत आदेशित केले आहे . कोवीड - 19 या विषाणूच्या संक्रमणामुळे जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समित्या मधील व्यवहारावर परिणाम होऊन प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत शेतकन्यांनी शेतमाल विक्रीस आणने कमी केले आहे . मा . प्रधान सचिव ( पणन ) मंत्रालय मुंबई यांचे दि . 17 / 04 / 2020 रोजीचे पत्र व मा . पणन संचालक , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे दि . 17 / 04 / 2020 रोजीचे परिपत्रकाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार शासकीय कापूस खरेदी व बाजार समित्याचे आवरातील दैनंदिन व्यवहार सुरु करणेसाठी खालील प्रमाणे सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. कोरोना रोगासंबंधी जनजागृती होण्यासाठी बाजार क्षेत्रात लोकांना, शेतकन्यांना, व्यापान्यांना, हमालांना कोरोना रोगांपासून काळजी घेणेबाबत फलक, उद्घोषणा याद्वारे आवाहन करावे व आवश्यक ती माहिती द्यावी . तसेच बाजार समितीमध्ये येणान्या शेतकन्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती पत्रक छापून शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावेत . बाजार समिती कार्यक्षेत्रातील बाजार व उपबाजार क्षेत्रातील परिसरामध्ये ठिकठिकाणी कोराना रोगासंबंधीच्य माहितीबाबतचे मार्गदर्शक फलक लावण्यात यावेत. बाजार आवारातील सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याकडे संपूर्णपणे लक्ष ठेवण्यात यावे . बाजार संपल्यानंतर तसेच रात्रीच्या वेळी बाजार आवारात स्वच्छता , औषध फवारणी करुन बाजार आवार जास्तीत जास्त निर्जतुक राहील याची दक्षता घेण्यात यावी . फवारणीसाठी शक्य असल्यास सोडीयम हायपोक्लोराईट स्प्रेचा किंवा अन्य रसायनांचा वापर करावा . याबाबत अधिक माहिती स्थानिक महानगरपालिका / नगरपालिका यांचेकडून घ्यावी. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करता यावा यासाठी जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेतमाल व कापूस खरेदी केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी मजूर कामगार यांना जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी वर निवासस्थानी जाण्या येण्याकरिता ओळखपत्राची सोय करण्यात यावी व सोशल डिस्टन्स इन च्या नियमांचे पालन करावे. शासकीय कापूस खरेदी साठी नोंदणीचा अंतिम दिनांक 27 एप्रिल 2020 आहे.
इतर शेतमालाची नोंदणी व्हाट्सअप वर होणार आहे कापसाची नोंदणी व्हाट्सअप वर होणार नाही. तसेच कापसाची नोंदणीचा अंतिम दिनांक 27 एप्रिल 2020 राहील असे मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक परभणी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा