बुधवार, २९ एप्रिल, २०२०

सेलूत परिसरात तीन दिवस कर्फ्यू; कलेक्टर मुगळीकर यांचे आदेश जारी ;ती महिला पॉझिटिव्ह

सेलूत परिसरात तीन दिवस कर्फ्यू; कलेक्टर मुगळीकर यांचे आदेश जारी ;ती महिला पॉझिटिव्ह
 
सेलूची महिला नांदेडला कोरोनाग्रस्त



परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सेलू शहर परिसरात तीन दिवस कर्फ्यू जारी केला आहे आज सायंकाळी उशिरा त्यांनी हा कर्फ्यू जारी केला.

परभणी-सेलू जिल्हा परभणी येथील एक महिला नांदेडच्या रूग्णालयात पॉझिटिव आढळल्यामुळे सेलु शहरात तीन दिवस कर्फ्यू जारी करण्यात आला आहे या कर्फ्यू मध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कोणालाही सूट राहणार नसल्याची माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.
मिळालेल्या वृत्तानुसार नांदेड येथे पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला औरंगाबाद येथून सेलू येथे आली होती.औरंगाबाद येथील नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी परभणीच्या एका खाजगी दवाखान्याकडे रेफर केले होते परंतु त्या ठिकाणी उपचार न झाल्यामुळे तिला नांदेडला हलविण्यात आले त्यामुळे ही महिला नेमकी कुणाकुणाशी संपर्कात आली यासंदर्भात माहिती घेण्यात येत असून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशान्वये सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून सेलु परिसरात तीन दिवस कर्फ्यू जारी करण्यात आला.सेलू येथील या महिलेच्या सोळा नातेवाईकांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले असून संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात येत असल्याचे बालाजी शेवाळे यांनी सांगितले आहे. ही महिला सेलू ची रहिवाशी असून ती नांदेडला उपचारासाठी गेली होती आणि त्याठिकाणी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय केली असून सेलू शहर आणि परिसरात तीन दिवस जारी करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.
 परभणी जिल्हा प्रशासनाद्वारे संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु होणार गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला असतांना बुधवारी (दि.29) सेलू येथील रहिवाशी महिला नांदेडला उपचारादरम्यान कोरानाबाधित झाली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनास कोरोनाग्रस्त  त्या महिले संदर्भात माहिती प्राप्त झाली असून त्या आधारेच प्रशासनाद्वारे आता त्या महिलेच्या संपर्कात सेलूतील कोणी कुटूंबिय किंवा अन्य व्यक्ती आल्या का, या संदर्भात तपासणी केली जाणार आहे.
 सेलू येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 28 तारखेस ती महिला सेलूत आली. तेथून उपचारानिमित्त पुन्हा नांदेडला रवाना झाली. तेथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटूबियांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती कळविली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...