गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

परभणीत 3 दिवस संचारबंदी; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव

परभणीत 3 दिवस संचारबंदी; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव

 
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात प्रशासनाने अतिशय योग्य नियोजन करून कोरोनाचा शिरकाव होण्यापासून रोखले होते. परंतु आज सकाळी पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परभणी शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून दि. 16 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत परभणी शहरासह परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिली आहे.
परभणी शहरात कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. परभणी शहर महानगरपालिका हद्द व हद्दीबाहेरील 3 किलोमीटरचा परिसर तीन दिवस संपूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

…यांना मिळणार सवलत
या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– शासकीय दुध संकलन व त्यांची वाहने
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.

सर्व खाजगी व सरकारी बँका बंद
परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील व हद्दीबाहेरील 3 किमी परिसरातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी, नागरी सहकारी बँका व इतर वित्तीय सेवा देणार्‍या आस्थापना व एटीएम केंद्र दि. 17/4/2020 ते दि. 19/4/2020 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी परभणी यांनी दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...