शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा

*दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा!!*
 
परभणी:-कोरोना विषाणू व्हायरसचे गांभीर्य पाथरी तालुक्यातील प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कळले आहे किंवा नाही याची माहिती नसली तरी  दोन महिन्यांच्या दिल्लीतील वास्तव्यानंतर देखील पाथरीत आलेल्या व्यक्तीला त्याच्याच घरी ठेवण्यात आले मात्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भात अतिशय गंभीरपणे दखल घेतली असून त्यांनी या व्यक्तीला परभणी ला शिफ्ट करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती मिळते.पाथरी येथून दिल्लीत दोन महिन्यांसाठी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीला पाथरी येथेच त्याच्या घरी तालुका प्रशासनाने ठेवले चौदा दिवस घरी राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या.मात्र सध्याचे बदलते वातावरण आणि गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या व्यक्तीस तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात चालवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.परिस्थितीचे अतिशय गांभीर्य लक्षात घेऊन पाथरी येथील एका गल्लीत ठेवणार्या या इसमास तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शिफ्ट करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी तालुका प्रशासनास दिले असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या दोन महिन्यात ही व्यक्ती पाथरी हून दिल्लीला गेली होती.आणि दिल्लीमध्ये दोन महिने वास्तव्याला होती परभणीच्या पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला परंतु तालुका प्रशासनाने मात्र त्याची वैद्यकीय तपासणी केली तरी त्याची रवानगी मात्र परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केली नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे असताना तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही‌.त्यामुळे या व्यक्तीला पाथरी येथील त्याच्या घरात ठेवण्यात आले.याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या व्यक्तीला तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठीचे आदेश दिले असल्याची माहिती मिळालीय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...