परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका महिलेला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले होते .....तिला संसर्गजन्य आजार झाल्याचेही अहवालात म्हटले होते......... तसेच तिला कॅन्सर काही आजार होता असेही वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले की ही महिला कॅन्सर आजाराने ग्रासली होती......
नांदेड येथील जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत
गुरुवारी रात्री उशिरा तिचे निधन झाल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे ......... गुरुवारी रात्री उशिरा या निधनाचे वृत्त आले आहे....नांदेड जिल्हा परिषद सणाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले की गुरुवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचे निधन झाले आहे उपचाराच्या दरम्यान तिने प्राण सोडला आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सर्व योजना केल्या आहेत
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने उशिरा सांगितले
यासंदर्भात अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील एक महिला अत्यंत आजारी असल्यामुळे औरंगाबाद येथे गेली होती सेलू येथे वास्तव्याला असलेली ही महिला औरंगाबाद येथील उपचारादरम्यान सेलू येथे आली होती आणि सेलू वरून परभणी मार्गे नांदेड येथे गेली होती नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे
सेलूतील त्या कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू
नांदेडच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान करोना पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या सेलूतील त्या महिलेचा गुरवारी राञी नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.चार महिन्यांपूर्वीच ती महिला औरंगाबादमध्येच एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती. 27 एप्रिल रोजी सेलूस आल्यानंतर त्या महिलेस अस्वस्थ वाटल्याने कुटूंबियांनी महिलेस 28एप्रिल रोजी परभणीत आणल्यानंतर मोंढा भागातील एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले.तेथून त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले.त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतले,तेव्हा ती महिला करोना पाॅझिटिव्ह आढळून आली.
दरम्यान नांदेड आरोग्य विभागाने त्या महिलेच्या सोबतच्या दोन मुलांना लगेच क्वाॅरंटांईन केले आहे.नांदेड जिल्हा प्रसासनाने कळवल्यानंतर सेलूतील कुटूंबातील आठ व अन्य तविस जणांनाही क्वाॅरंटाईन करण्यात आले त्याचेही स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीसाठी औरंगाबादमध्ये पाठवण्यात आले आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा