*महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण*
परभणी दि.25 :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आला असून अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे उपस्थित राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहु नये. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. शासनाच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय , परभणी वगळता जिल्हयात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवु नये. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा