गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न

*महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न*

  परभणी दि.1 :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
         
 यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
                        -*-*-*-*-

सेलूच्या त्या महिलेने नांदेडला प्राण सोडला; जिल्हा प्रशासन पुढील कारवाई करणार!!


परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका महिलेला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले होते .....तिला संसर्गजन्य आजार झाल्याचेही अहवालात म्हटले होते......... तसेच तिला कॅन्सर काही आजार होता असेही वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले की ही महिला कॅन्सर आजाराने ग्रासली होती......
नांदेड येथील जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत.गुरुवारी रात्री उशिरा तिचे निधन झाल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे ......... गुरुवारी रात्री उशिरा या निधनाचे वृत्त आले आहे.‌...नांदेड जिल्हा परिषद सणाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले की गुरुवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचे निधन झाले आहे उपचाराच्या दरम्यान तिने प्राण सोडला आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सर्व योजना केल्या आहेत

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने उशिरा सांगितले 


यासंदर्भात अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील एक महिला अत्यंत आजारी असल्यामुळे औरंगाबाद येथे गेली होती सेलू येथे वास्तव्याला असलेली ही महिला औरंगाबाद येथील उपचारादरम्यान सेलू येथे आली होती आणि सेलू वरून परभणी मार्गे नांदेड येथे गेली होती नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे


सेलूतील त्या कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू

नांदेडच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान करोना पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या सेलूतील त्या महिलेचा गुरवारी राञी नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.चार महिन्यांपूर्वीच ती महिला औरंगाबादमध्येच एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती. 27 एप्रिल रोजी  सेलूस आल्यानंतर त्या महिलेस अस्वस्थ वाटल्याने कुटूंबियांनी महिलेस 28एप्रिल रोजी परभणीत आणल्यानंतर मोंढा भागातील एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले.तेथून त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले.त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतले,तेव्हा ती महिला करोना पाॅझिटिव्ह आढळून आली.  
दरम्यान नांदेड आरोग्य विभागाने त्या महिलेच्या सोबतच्या दोन मुलांना लगेच क्वाॅरंटांईन केले आहे.नांदेड जिल्हा प्रसासनाने  कळवल्यानंतर सेलूतील कुटूंबातील आठ व अन्य तविस जणांनाही क्वाॅरंटाईन करण्यात आले त्याचेही स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीसाठी औरंगाबादमध्ये पाठवण्यात आले आहेत

सेलूच्या त्या महिलेने नांदेडला प्राण सोडला; जिल्हा प्रशासन पुढील कारवाई करणार!!


परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका महिलेला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले होते .....तिला संसर्गजन्य आजार झाल्याचेही अहवालात म्हटले होते......... तसेच तिला कॅन्सर काही आजार होता असेही वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले की ही महिला कॅन्सर आजाराने ग्रासली होती......
नांदेड येथील जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत
 गुरुवारी रात्री उशिरा तिचे निधन झाल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे ......... गुरुवारी रात्री उशिरा या निधनाचे वृत्त आले आहे.‌...नांदेड जिल्हा परिषद सणाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले की गुरुवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचे निधन झाले आहे उपचाराच्या दरम्यान तिने प्राण सोडला आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सर्व योजना केल्या आहेत

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने उशिरा सांगितले 


यासंदर्भात अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील एक महिला अत्यंत आजारी असल्यामुळे औरंगाबाद येथे गेली होती सेलू येथे वास्तव्याला असलेली ही महिला औरंगाबाद येथील उपचारादरम्यान सेलू येथे आली होती आणि सेलू वरून परभणी मार्गे नांदेड येथे गेली होती नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे


सेलूतील त्या कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू

नांदेडच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान करोना पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या सेलूतील त्या महिलेचा गुरवारी राञी नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.चार महिन्यांपूर्वीच ती महिला औरंगाबादमध्येच एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती. 27 एप्रिल रोजी  सेलूस आल्यानंतर त्या महिलेस अस्वस्थ वाटल्याने कुटूंबियांनी महिलेस 28एप्रिल रोजी परभणीत आणल्यानंतर मोंढा भागातील एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले.तेथून त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले.त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतले,तेव्हा ती महिला करोना पाॅझिटिव्ह आढळून आली.  
दरम्यान नांदेड आरोग्य विभागाने त्या महिलेच्या सोबतच्या दोन मुलांना लगेच क्वाॅरंटांईन केले आहे.नांदेड जिल्हा प्रसासनाने  कळवल्यानंतर सेलूतील कुटूंबातील आठ व अन्य तविस जणांनाही क्वाॅरंटाईन करण्यात आले त्याचेही स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीसाठी औरंगाबादमध्ये पाठवण्यात आले आहेत

शेतकर्‍यांना खते,बियाणे वेळेव उपलब्ध करून द्या-पालकमंत्री नवाब मलीक

शेतकर्‍यांना खते,बियाणे वेळेव उपलब्ध करून द्या-पालकमंत्री नवाब मलीक
परभणी, (प्रतिनिधी)- परभणी येथ्लृील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक विकास व औकाङ्ग कौशल्य विकास व उद्योजकता तथ्लृा परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंगाम 2020 पूर्वतयारीची आढावा बैठक गुरुवार, 30 एप्रिल रोजी घेतली. यावेळी त्यांनी संबंधीत यंत्रणेस खते, बियाणे शेतकर्‍यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. तसेच महावितरणच्या ट्रान्सङ्गार्मरबाबत बर्‍याच तक्रारी असून या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी अशा सूचना दिल्या.
परभणी येथ्लृील खरीप हंगाम 2020 पूर्व आढावा बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीस खा.संजय जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ.राहूल पाटील, आ.मेघना बोर्डीकर साकोरे, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थ्लिृत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ङ्गिजीकल डिस्टन्स ठेवून तसेच तोंडाला मास्क बांधून या आढावा बैठकीत सर्वांनी हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंंगाम 2019-20 मध्ये शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. बियाणे व खतांचा तुटवडा होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. अनुदानावर वाटप करण्यात येणार्‍या बियाणे योग्य शेतकरी व लाभार्थ्यांना कसा लाभ होईल, याची काळजी घ्यावी असे सूचविले. तसेच जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पिककर्ज वाटपा संदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळे घ्यावेत. तसेच वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा. खा.संजय जाधव, आ.डॉ.राहूल पाटील यांनीही पालकमंत्र्यांकडे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तसेच कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी महावितरणच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेत शेतकर्‍यांचे ट्रान्सङ्गार्मर जळण्याचे मोठे प्रमाण आहे. संबंधीत ठेकेदार वेळेवर काम करीत नसतील तर शेतकर्‍यांना अडचणीस सामोरे जावे लागेल. यामुळे संबंधीत ठेकेदार कामात कसूर करीत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बालासाहेब नागरगोजे, महावितरणचे अभियंता जायभाये आदींची उपस्थ्लिृती होती.

मदतीचा_हात* *दुर्धर आजाराने त्रस्त विद्यार्थिनीच्या आर्थिक मदतीसाठी कृषी सभापती आल्या पुढे* *सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी केली वयक्तिक 5000रु.यांची आर्थिक मदत व एवढयावर न थांबता सर्कल मधील दानशूर लोकांकडून मदत घेऊन शिक्षणाधिकारी यांच्या कडे सुपूर्द केली

*मदतीचा_हात*
*दुर्धर आजाराने त्रस्त विद्यार्थिनीच्या आर्थिक मदतीसाठी कृषी सभापती आल्या पुढे*
    *सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी केली वयक्तिक 5000रु.यांची आर्थिक मदत व एवढयावर न थांबता सर्कल मधील दानशूर लोकांकडून मदत घेऊन शिक्षणाधिकारी यांच्या कडे सुपूर्द केली*
      परभणी तालुक्यातील उमरी येथील जिल्हा परिषद प्रा.शाळेतील विद्यार्थीनी *कु.गिता श्याम गोरे* ही दुर्धर आजाराने त्रस्त असून तिच्या कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला औषधउपचार घेणे कठीण असल्याने परभणी जिल्हा परिषद च्या शिक्षणाधिकारी (प्रा.)श्रीमती सुचिता पाटेकर यांनी जिल्ह्यातील दानशूर लोकांना सदरील विद्यार्थिनीस आर्थिक मदत करण्याबाबत आवाहन केले होते.
       सदरील आवाहनास प्रतिसाद देऊन *परभणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.टेंगसे* यांनी पुढाकार घेतला असून स्वतः 5000 रु. ची आर्थिक मदत सदरील विद्यार्थिनीस केली व त्याच बरोबर माजी जि.प.अध्यक्ष राजेश दादा विटेकर यांनी 10,000 रु. व पाथरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून स्वखुशीने 19000 रु.ची आर्थिक मदत गोळा करून एकूण रक्कम 34000 रु.मा.शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीमती पाटेकर यांच्या कडे सुपूर्द केली.या आधीही सौ.टेंगसे यांनी खूप विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदतीचा हात दिला आहे.
      श्रीमती पाटेकर आणि आजारी विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांनी सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांचे आभार व्यक्त केले.

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले

*कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या सहवासातील 51 संशयितांचे स्वॅब घेतले*


         परभणी, दि.30 :- जिल्हयातील सेलु शहरातील राज मोहल्ला येथील रहिवाशी असलेली ५५ वर्षीय महिला दुर्धर आजारावरील उपचारासाठी औरंगाबाद येथे मागील काही दिवसापासुन दाखल होती.  ही  महिला दि.२७ एप्रिल २०२० रोजी सकाळी ४ . ३० वाजता खाजगी वाहनाने सेलू येथे परत आली होती. त्यानंतर दि . २८ एप्रिल २०२० रोजी ही महिला रुग्ण सेलु येथुन परभणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेवुन दुर्धर रोगाच्या उपचारासाठी नांदेड येथे गेली होती. नांदेड येथील वैद्यकीय पथकाने महिलेचे स्वॅब घेतले असता परिक्षणाअंती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आली असुन सदर महिला रुग्णावर नांदेड येथे औषधोपचार चालू आहेत. संबधित रुग्णाच्या सहवासातील सेलू येथील २७ व परभणी खाजगी रुग्णालयातील २४ असे एकुण ५१ संशयितांचे स्वॅब घेण्यात येऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालय सेलु व जिल्हा रुग्णालय परभणी येथे दाखल करुन घेण्यात आले आहे.  अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
           राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू (कोव्हिड १९) संदर्भात आढावा बैठक घेवुन संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या व कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.  
            गुरुवार दि. ३० एप्रिल २०२० रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे ७३२ व आज रोजी दाखल झालेले  ७१ असे एकुण ८०३ संशयितांची नोंद झाली आहे. तर परभणी जिल्हयात आज रोजी कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
           -*-*-*-*-

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

सेलूत परिसरात तीन दिवस कर्फ्यू; कलेक्टर मुगळीकर यांचे आदेश जारी ;ती महिला पॉझिटिव्ह

सेलूत परिसरात तीन दिवस कर्फ्यू; कलेक्टर मुगळीकर यांचे आदेश जारी ;ती महिला पॉझिटिव्ह
 
सेलूची महिला नांदेडला कोरोनाग्रस्त



परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सेलू शहर परिसरात तीन दिवस कर्फ्यू जारी केला आहे आज सायंकाळी उशिरा त्यांनी हा कर्फ्यू जारी केला.

परभणी-सेलू जिल्हा परभणी येथील एक महिला नांदेडच्या रूग्णालयात पॉझिटिव आढळल्यामुळे सेलु शहरात तीन दिवस कर्फ्यू जारी करण्यात आला आहे या कर्फ्यू मध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कोणालाही सूट राहणार नसल्याची माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.
मिळालेल्या वृत्तानुसार नांदेड येथे पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला औरंगाबाद येथून सेलू येथे आली होती.औरंगाबाद येथील नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी परभणीच्या एका खाजगी दवाखान्याकडे रेफर केले होते परंतु त्या ठिकाणी उपचार न झाल्यामुळे तिला नांदेडला हलविण्यात आले त्यामुळे ही महिला नेमकी कुणाकुणाशी संपर्कात आली यासंदर्भात माहिती घेण्यात येत असून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशान्वये सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली असून सेलु परिसरात तीन दिवस कर्फ्यू जारी करण्यात आला.सेलू येथील या महिलेच्या सोळा नातेवाईकांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले असून संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात येत असल्याचे बालाजी शेवाळे यांनी सांगितले आहे. ही महिला सेलू ची रहिवाशी असून ती नांदेडला उपचारासाठी गेली होती आणि त्याठिकाणी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय केली असून सेलू शहर आणि परिसरात तीन दिवस जारी करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.
 परभणी जिल्हा प्रशासनाद्वारे संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु होणार गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला असतांना बुधवारी (दि.29) सेलू येथील रहिवाशी महिला नांदेडला उपचारादरम्यान कोरानाबाधित झाली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनास कोरोनाग्रस्त  त्या महिले संदर्भात माहिती प्राप्त झाली असून त्या आधारेच प्रशासनाद्वारे आता त्या महिलेच्या संपर्कात सेलूतील कोणी कुटूंबिय किंवा अन्य व्यक्ती आल्या का, या संदर्भात तपासणी केली जाणार आहे.
 सेलू येथील महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात  काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 28 तारखेस ती महिला सेलूत आली. तेथून उपचारानिमित्त पुन्हा नांदेडला रवाना झाली. तेथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटूबियांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास माहिती कळविली.

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

Covid -19, काळात स्थलांतरावरून परत आलेल्या कुटुंबियांना तहसील कार्यालय पाथरी व संकल्प मानव विकास संस्थाच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप....

Covid -19, काळात स्थलांतरावरून परत आलेल्या कुटुंबियांना तहसील कार्यालय पाथरी व  संकल्प मानव विकास संस्थाच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वाटप....


पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे राजारामबापू साखर कारखाना जिल्हा सांगली येथून स्थळांतरावरून 48 कुटुंब आले असून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत होम क्वारंटाईन केले आहे त्यांना जीवन आवश्यक वस्तूची आवश्यकता आहे अशी तहसील कार्यालय पाथरी यांना माहिती मिळाली त्यामुळे पंचायत समिती सभापती सदाशिव थोरात आणि तहसीलदार  संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांना जीवनश्यक वस्तू वाटप करण्यात आली त्यावरून  संकल्प संस्थेच्या वतीने 30 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे देण्याचे निर्णय झाला,
त्यानुसार दिनांक 28 एप्रिल रोजी  पाथरी तहसीलदार मा. कांगणे साहेब , पंचायत समिती सभापती सदाशिव थोरात, मंडळ अधिकारी, भरकड साहेब, संकल्प संस्थेचे समन्वयक विठ्ठल साळवे, , राजू साठे, यांनी मरडसगाव येथे जाऊन स्थलारावरून 28 कुटूंबातील  लोकांची विचारपूस करून संकल्प संस्थेच्या वतीने आपणास हे जीवनावश्यक वस्तू चे वाटप करीत आहोत, आपण स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी आणि पाथरी तालुका करोना मुक्तीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली , प्रसंगी 30 लोकांना जीवनाआवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 

पुढील आठवड्यात संकल्प संस्थेच्या वतीने      प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, परभणी जिल्ह्यातील 56  गावातील 2387 आणि जालना जिल्ह्यातील 1868 कुटुंबाना साबण, सॅनिटीझर, मास्क, किशोरी मुलींसाठी सॅनिटरी पॅड, 10 वी च्या 748 मुलांसा ठी work book, खेळण्याचे सहित्य दुसऱ्या टप्यात  वाटप करणार आहोत असे  संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले..

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

*महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण*


             परभणी दि.25 :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले  आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला असून अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
            शासन परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या वेळी पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद हे उपस्थित राहतील. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  उपस्थित राहु नये.  तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालये व तहसील कार्यालये येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये. शासनाच्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय , परभणी वगळता जिल्हयात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येवु नये. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                        -*-*-*-*-

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात;दोन दिवसीय संचारबंदी लागू

*परभणी जिल्ह्यातील नागरी भागासह परिसरात*
*दोन दिवसीय संचारबंदी लागू*

परभणी, दि.22 :- परभणी महानगरपालिका हद्द आणि 5 किमी परीसर तसेच जिल्हयातील सर्व नगर पालिका हद्दीमध्ये व त्यालगतच्या 3 किमी परीसरात कलम 144 नुसार बुधवार दि . 22 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री पासून ते दि. 24 एप्रिल 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत
.
   या संचारबंदीतुन  सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने , सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक , वार्ताहर , प्रतिनिधी , वितरक तसेच  पेट्रोलपंप वितरक , कर्मचारी व त्यांची वाहने  आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी 6  ते 9  या वेळेत दूध विक्री करावी.  खत वाहतूक त्यांची गोदामे व दुकाने तसेच त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार आदी व्यक्ती, समुहाला सुट राहील.
       वैद्यकीय आपातकाल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये , घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक परभणी,  महानगरपालिका आयुक्त , सर्व उपविभागातील  उपविभागीय दंडाधिकारी , अन्न व प्रशासनाचे सहाय्यक, सर्व तालुका दंडाधिकारी यांच्यावर राहील. असेही जिल्हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.
                      -*-*-*-*-

जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक उतरले मैदानात

जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस अधीक्षक उतरले मैदानात        
परभणी, दि. 22:- राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वतः शहरातील विविध भागांमध्ये जाऊन लोकांची होणारी गर्दी यामुळे सोशल डिस्टन्सिंग उडणारा फज्जा लक्षात घेऊन व जिल्ह्यातील सर्व सीमा बंद असून चोर मार्गाने /आडमार्गाने येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांचे पथक नेमून अहोरात्र जनजागृतीची मोहीम राबवत आहेत
... तसेच पोलीस अधीक्षक श्री. उपाध्याय यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 3 मे पर्यंत लॉक डाऊन चे पालन करून घराबाहेर न निघता स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी जनतेस केले आहे..

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

जिल्हयात 1 लाख 41 हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप - जिल्हाधिकारी

*जिल्हयात 1 लाख 41 हजार       शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप  - जिल्हाधिकारी*

         परभणी, दि.21 :-  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपास जिल्ह्यात प्रारंभ झाला असून प्रतिलाभार्थी पाच किलो तांदुळ देण्यात येत आहेत. तरी आजपर्यंत जिल्हयात 1लाख 41हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदळाचे वाटप पूर्ण झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे.
 
           परभणी जिल्हयात अंत्योदय योजनेअंतर्गत 43 हजार 879 पात्र शिधापत्रिकाधारक असुन प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 2 लाख 5 हजार 605 तर एपीएल शेतकरी योजनेत 56 हजार 196 पात्र शिधापत्रिकाधारक आहेत . असे  तीनही योजनांसाठी पात्र कार्डधारकांची एकुण संख्या 3 लाख 5 हजार 680 इतकी असुन त्यावरील लाभार्थी संख्या 14 लाख 52 हजार 932 इतकी आहे. नियमित धान्य वाटप जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असुन 6 हजार 150 मे . टन धान्य पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेले आहे.
            मोफत तांदुळ वाटपास प्रारंभ झाला असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. एका शिधापत्रिकेत पाच नावे असल्यास त्यांना 25 किलो तांदूळ देण्यात येत आहे . मोफत तांदूळ वाटपात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत मोडणाऱ्या कार्डधारकांनाच धान्य देण्यात येत आहे . मोफत तांदूळ योजनेत एपीएल योजनेत मोडणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश नाही , प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत परभणी जिल्हयासाठी 6 हजार मे. टन तांदूळ प्राप्त झाला असून आज पर्यंत सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना मोफत तांदूळ प्राप्त झाला असुन स्वस्त धान्य दुकानदारामार्फत पात्र लाभार्थ्यांना 3 हजार 577 मे . टन ( 59 % ) धान्य वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच  टप्प्याटप्प्याने स्वस्त धान्य दुकानदारांना तांदूळ वाटप करण्यात येत आहे . मोफत तांदूळ वाटप चालू होत असताना प्रत्येक प्रत्येक गावात तशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे . कोणते धान्य नियमित आहे व कोणता तांदूळ मोफत देण्यात येत आहे , याची नागरिकांना सूचना देणे आवश्यक आहे . नाही तर नियमित धान्य वाटप व मोफत तांदूळ वाटपात गोधळ होवू नये यासाठी गावातील ग्राम दक्षता समिती तसेच शासकीय प्रतिनीधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जागरुक युवकांनी व नागरिकांनीसुध्दा याकडे लक्ष दिल्यास वाटपात गैरव्यवहार होणार नाहीत .           
        तालुक्यात अंत्योदय, प्राधान्य व एपीएल शेतकरी योजनेत मोडणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना नियमाप्रमाणेच धान्य वाटप जवळपास पूर्ण झाले असून आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ५ किलो  मोफत तांदूळ वाटप करण्याचे काम चालू आहे.  धान्य वाटपाबाबतचे रास्तभाव दुकानाबाहेर फलक लावण्यात येत आहेत तसेच परभणी जिल्हयातील उर्वरित एपीएल केशरी शिधापत्रिका 78 हजार 119 असुन त्यावरील 3 लाख 36 हजार 771 लाभार्थ्यांसाठी माहे मे व जून , 2020 या दोन महिन्यासाठी प्रतिमाह गहू 1010 मे . टन व तांदूळ 674 मे.टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे.  हे धान्य प्रति लाभार्थी 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो दराने व प्रति लाभार्थी 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने माहे मे व जून , 2020 या दोन महिन्यात रास्तभाव दुकानदारामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. असेही जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन *मुस्लिम बांधवांनी एकत्र न येता घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे-जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर*

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आवाहन 

*मुस्लिम बांधवांनी एकत्र न येता घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे-जिल्‍हाधिकारी श्री. मुगळीकर*


          परभणी दि.21:- मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजान महिना सूरु होत असून रमजान महिन्यात मुस्लिम समाजात मोठया संख्येने मस्जिदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरीत्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थिती  विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने कोरोना (कोव्हीड- 19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तरी मुस्लिम समाज बांधवांनी लॉकडाऊनच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
       जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ( COVID - 19 ) या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य म्हणून घोषीत केला आहे . तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात , महाराष्ट्रातील शहरात गतीने प्रसारीत होत आहे . नुकताच परभणी शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.  पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येत असतात परंतु सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग, संक्रमण मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामधून मोठया प्रमाणावर जिवित हानी होवू शकते. यामुळे सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास रोगाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे. तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या आवाहनास प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.
        जिल्हयातील सर्व मुस्लिम  धर्मीयांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सूरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यात देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमीत नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये.  घराच्या इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येवू नये तसेच मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येवू नये.कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबीक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आला आहे याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्व मुस्लिम बांधवानी त्यांच्या घरात नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक  कार्य पार पाडावेत. लॉकडाऊन विषयी पूढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. असेही जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                      -*-*-*-*-

कोरोनाच्या माहितीसाठी मोबाईलधारकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा

*कोरोनाच्या माहितीसाठी मोबाईलधारकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे*

       परभणी, दि.21:-  जिल्ह्यातील सर्व मोबाईलधारकांनी केंद्र सरकारकडून एकुण ११ भाषेत विकसित करण्यात आलेले 'आरोग्य सेतू ' हे अॅप प्लेस्टोअर व अॅपस्टोअर वरून विनामूल्य डाऊनलोड करुन या अॅपचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करून आपल्या आरोग्य सुरक्षेविषयी माहिती वेळोवेळी जाणून घ्यावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.


             भारत सरकारने कोरोना (कोव्हीड- १९ ) या विषाणू प्रादुर्भावाची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी अँड्रॉइड व आयओएस प्रणाली धारक मोबाईल धारकांसाठी  'आरोग्य सेतू ' अॅप विकसीत केलेले आहे.  हे अॅप ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानावर आधारित असल्याने याद्वारे कोव्हीड - १९ बाधित रुग्णांच्या मोबाईल क्रमांकाच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. तंत्रज्ञाद्वारे कोव्हीड बाधित रुग्ण  जवळपास आल्यास ( साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर ) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. तसेच कोविड - १९ बाधेची स्व:चाचणी , प्रतिबंधात्मक उपाययोजना , आपल्या नजीकचे कोव्हीड तपासणी केंद्र क्रमांक, कोव्हीड -१९ बाधेच्या अनुषंगाने सर्व साधारण प्रश्नांची उत्तरे , राज्यातील विविध हेल्पलाईन क्रमांक तसेच अपरिहार्य स्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ई - पासेस , सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे व काय करू नये, आदी वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल मधील ब्लूटूथ नेहमी सुरु ठेवणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-

सोमवार, २० एप्रिल, २०२०

सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा -जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा -जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

         परभणी दि.20:- शासकीय कापूस खरेदी व बाजार समित्याच्या आवारातील दैनंदिन व्यवहार सुरु करणेसाठी शासनाने सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी https : / / forms . gle VUASetva7aDqkGn3A  या लिंकवर ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा. शेतमाल विक्रीसाठी आणण्यासाठी  ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी केले आहे.
     जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समित्या मधील सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार सुरु ठेवणेबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी सस्था , परभणी / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था / प्र . विभागीय व्यवस्थापक , महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ म . विभागीय कार्यालय परभणी / जिल्हा मार्केटिंग अधिकारी , परभणी / सभापती व सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती / भारतीय कपास निगम यांचे प्रतिनिधी / बाजार समिती चे व्यापारी संचालक / जिनिंग प्रेसिंग युनियनचे पदाधिकारी यांची सभा आज दि . 20 एप्रिल  2020 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.
       नोंदणी फॉर्म भरताना शेतकऱ्याजवळील कापसासोबत शेतकऱ्याचा अॅपद्वारे काढलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य असणार आहे . त्या शिवाय शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही . सदरची खरेदी व नोंदणी फक्त परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकन्याकरिता कापूस खरेदीसाठीच राहील . सदरील नोंदणी ही ऑनलाईन अर्जाद्वारे केलेल्या नोंदणीचा डाटा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , परभणी या कार्यालयाकडून संबंधीत बाजार समितीला दिला जाईल व त्याप्रमाणेच बाजार समितीने शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे / SMS वरून कापूस खरेदीस बोलवावे. इतर शेतमाल खरेदी संदर्भात बाजार समितीने दोन WhatsApp क्रमांक मेल आयडी वर्तमान पत्रामध्ये , आकाशवाणी इत्यादी द्वारे जाहीर करावेत . संबंधित शेतकरी त्यांचा 7 / 12 , आधार कार्ड व कापसाचा फोटो नोट कॅम अॅपद्वारे घेऊन उपरोक्त नमूद WhatsApp वर - मेलवर पाठवतील . त्यानंतर फोन करून टोकन क्रमांक प्राप्त करुन घेतील. संबंधीत बाजार समितीने वरील प्रमाणे प्रथमत : विवस नोंदणी केलेनतर चौथ्या दिवसापासून कापूस तर सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी - विक्री साठी आडते , जिनिंग , खरेदीवारांची संख्या पाहून शासन निर्देशाप्रमाणे कापसासाठी एका दिवशी कमाल 20 वाहने किंवा बाजार समिती व खरेदी केंद्राच्या क्षमतेप्रमाणे टोकन देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा . इतर शेतमालासाठी कमाल ( 10 ) वाहनांना टोकन देण्यात यावे . तथापि कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्व भूमीवर सोशल डिस्टन्स तर नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी .  विक्रिसाठी कापूस आणताना शेतकन्याने त्यांचे मोबत 7 / 12 , आधार कार्ड बैंक पासबुक सोचत आणावे वरीलप्रमाणे गावाणी कलम टोकन क्रमांक घेतला आहे . अशा शेतकन्यानेच फक्त ज्या दिवशी बाजार समितीने बोलावले त्या दिवशी शेतमाल घेऊन बाजार समिती मध्ये, ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी शेतमाल का पाल त्यावेळस बाजार समिती गेटवर वर संबंधित शेतकऱ्यासबाजार  समितीचा शिक्का असलेले टोकन क्रमांकाची पावती यावी . ज्याच्या टोकन क्रमांकाची पावती शेतकरी बाजार समिती आवारात प्रवेश दोन वाहनातील अंतर किमान 10 से 15 फूट राहील याची दक्षता घ्यावी. 
          जिल्ह्यातील शासकीय खरेदी व बाजार समितीचे कामकाज तूर , भूसार माल , व कापूस खरेदी केंद्र दि . 20 एप्रिल 2020 पासून पूर्ववत सुरु ठेवणे बाबत आदेशित केले आहे . कोवीड - 19 या विषाणूच्या संक्रमणामुळे जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समित्या मधील व्यवहारावर परिणाम होऊन प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत शेतकन्यांनी शेतमाल विक्रीस आणने कमी केले आहे . मा . प्रधान सचिव ( पणन ) मंत्रालय मुंबई यांचे दि . 17 / 04 / 2020 रोजीचे पत्र व मा . पणन संचालक , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे दि . 17 / 04 / 2020 रोजीचे परिपत्रकाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार शासकीय कापूस खरेदी व बाजार समित्याचे आवरातील दैनंदिन व्यवहार सुरु करणेसाठी खालील प्रमाणे सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. कोरोना रोगासंबंधी जनजागृती होण्यासाठी बाजार क्षेत्रात लोकांना, शेतकन्यांना, व्यापान्यांना, हमालांना कोरोना रोगांपासून काळजी घेणेबाबत फलक, उद्घोषणा याद्वारे आवाहन करावे व आवश्यक ती माहिती द्यावी . तसेच बाजार समितीमध्ये येणान्या शेतकन्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती पत्रक  छापून शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावेत .  बाजार समिती कार्यक्षेत्रातील बाजार व उपबाजार क्षेत्रातील परिसरामध्ये ठिकठिकाणी कोराना रोगासंबंधीच्य माहितीबाबतचे मार्गदर्शक फलक लावण्यात यावेत. बाजार आवारातील सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याकडे संपूर्णपणे लक्ष ठेवण्यात यावे . बाजार संपल्यानंतर तसेच रात्रीच्या वेळी बाजार आवारात स्वच्छता , औषध फवारणी करुन बाजार आवार जास्तीत जास्त निर्जतुक राहील याची दक्षता घेण्यात यावी . फवारणीसाठी शक्य असल्यास सोडीयम हायपोक्लोराईट स्प्रेचा किंवा अन्य रसायनांचा वापर करावा . याबाबत अधिक माहिती स्थानिक महानगरपालिका / नगरपालिका यांचेकडून घ्यावी.  शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करता यावा यासाठी जिल्हा सूचना अधिकारी सुनील पोटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेतमाल व कापूस खरेदी केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी मजूर कामगार यांना जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी वर निवासस्थानी जाण्या येण्याकरिता ओळखपत्राची सोय करण्यात यावी व सोशल डिस्टन्स इन च्या नियमांचे पालन करावे. शासकीय कापूस खरेदी साठी नोंदणीचा अंतिम दिनांक 27 एप्रिल 2020 आहे. 
इतर शेतमालाची नोंदणी व्हाट्सअप वर होणार आहे कापसाची नोंदणी व्हाट्सअप वर होणार नाही. तसेच कापसाची नोंदणीचा अंतिम दिनांक 27 एप्रिल 2020 राहील असे मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक परभणी यांनी कळविले आहे.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

परभणी जिल्ह्यात गावठी दारुच्या व्यवसायाला आला ऊत

*परभणी जिल्ह्यात गावठी दारुच्या व्यवसायाला आला ऊत*

कोरोना प्रकोपामुळे राज्यभरात संचारबंदी असून जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे.याही परिस्थितीत दारुविक्रीला चांगलेच उधाण आले आहे.


परभणी:-कोरोना प्रकोपामुळे राज्यभरात संचारबंदी असून जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे. याही परिस्थितीत दारुविक्रीला चांगलेच उधाण आले आहे. छुप्या मार्गाने दारु विक्री होत असताना गावठी दारुविक्रीचा व्यवसाय या कालावधीत चांगलाच बहरला आहे. अनेकांनी या काळात अवैधरित्या चढ्या दराने दारुविक्री करुन माया जमविली आहे.
संचारबंदीमुळे दारुची दुकानेही बंद करण्यात आली आहे. तरीही मद्यपी दारुचा शोध घेत सहज दारु मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
दारुविक्रेतही चढ्या दराने पाहिजे ती दारु उपलब्ध करुन देत आहे. मात्र दामदुप्पट दारु पिणे अनेकांना शक्य होत नसल्याने अनेकांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. गावातील गावठी दारुच्या भट्ट्या आणि पारधी बेड्यावर मद्यपींची गर्दी वाढत आहे. देशीविदेशी दारु ऐवजी तळीमारांनी आता हातभट्टीच्या दारुला पसंती दिल्याने गावठी दारुची मागणी वाढली आहे. त्यामुळे संचारबंदी झुगारुन ग्रामीण भागात व जंगल परिसरात अवैधरित्या दारुच्या भट्टया लावल्या आहे.
एकीकडे पोलीस प्रशासन संचारबंदीची अंमल बजावणी करण्यात व्यस्त असताना दारुविक्रेत्यांनी आपला व्यवसाय वाढविला आहे. यातूनच अनेकांनी चांगलीच कमाई केली असून दिवसरात्र गावठी दारु काढण्यासोबत गावागावात माल पोहोचविण्याचेही काम सुरु आहे. त्यामुळे पोलिसांनी या अवैध दारुविक्रीकडेही आपला मोर्चा वळविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

स्वस्त धान्य वाटपात अनियमितता करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई-जिल्हाधिकारी

स्वस्त धान्य वाटपात अनियमितता करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई-जिल्हाधिकारी


            परभणी दि.16:- शासनाकडून गरिबांसाठी व विविध योजनातील लाभार्थ्यांसाठी मुबलक धान्य उपलब्ध करून देण्यात आले असून हे धान्य रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे काम जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे करण्यात येत आहे . मात्र अशा परिस्थितीमध्ये सेलू तालुक्यातील मौजे सावंगी पीसी येथील श्रीमती ज्योती विठ्ठलराव काळे  व पाथरी तालुक्यातील मौजे फुलेरवाडी येथील रानबा जगन्नाथ फुलवरे हे दोन रास्तभाव दुकानदार  लाभाधारकांना धान्य वाटपामध्ये अनियमीतता करीत असल्याची तक्रार जिल्हा पुरवठा कार्यालयास प्राप्त झाली.
त्यानुसार फुलेरवाडी  येथील रास्तभाव दुकानाचे प्राधिकारपत्र निलंबीत करण्यात आले आहे तर सावंगी पीसी  रास्तभाव दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिली आहे.

          कोरोना विषाणूमुळे आपात्कालीन स्थिती ओढवलेली असतांना अशा स्थितीत लाभार्थ्यांना वाटप करावयाचे धान्यामध्ये रास्तभाव दुकानदार यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाची अनियमितता होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी सुचित केले आहे. तसेच लाभार्थ्यांना वाटप करावयाचे धान्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची अनियमीतता होणार नाही यासाठी रास्तभाव दुकानदार यांनी ग्रामदक्षता समिती तसेच शासकीय प्रतिनिधी समक्ष धान्य वाटप करावे. वाटप करण्यात येणाऱ्या धान्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची अनियमीतता झाल्यास संबंधित रास्तभाव दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी दिले आहेत. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे

परभणीत 3 दिवस संचारबंदी; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव

परभणीत 3 दिवस संचारबंदी; गल्लीमध्ये, घराबाहेर फिरण्यासही मज्जाव

 
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात प्रशासनाने अतिशय योग्य नियोजन करून कोरोनाचा शिरकाव होण्यापासून रोखले होते. परंतु आज सकाळी पुण्याहून आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परभणी शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून दि. 16 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत परभणी शहरासह परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी दिली आहे.
परभणी शहरात कोरोनाचा रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. परभणी शहर महानगरपालिका हद्द व हद्दीबाहेरील 3 किलोमीटरचा परिसर तीन दिवस संपूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

…यांना मिळणार सवलत
या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– शासकीय दुध संकलन व त्यांची वाहने
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.

सर्व खाजगी व सरकारी बँका बंद
परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील व हद्दीबाहेरील 3 किमी परिसरातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी, नागरी सहकारी बँका व इतर वित्तीय सेवा देणार्‍या आस्थापना व एटीएम केंद्र दि. 17/4/2020 ते दि. 19/4/2020 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी परभणी यांनी दिले आहेत.

परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला;शहरात मोठी अस्वस्थताः प्रशासन हायअर्लट


परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला
शहरात मोठी अस्वस्थताः प्रशासन हायअर्लट परभणी:-गेल्या 15 दिवसांपुर्वी पुण्यातून परतलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याप्रकाराने जिल्हा प्रशासन अक्षरक्षः खडबडून जागे झाले आहे.
लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात 21 दिवस या जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणारा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासनाने, आरोग्य विभागाने या संदर्भात कमालीची दक्षता बाळगली. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.असे चित्र असतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल गुरूवारी(दि.16) सकाळी ये़वून धडकला. त्यामुळे आरोग्य अधिका-यांसह महसुल व पोलिस प्रशासन कमालीचे हादरले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या त्या युवकाने 15 दिवसांपुर्वीच परभणी गाठली होती. तो कुटुंबिया समवेत राहत होता. सर्दी, खोकलाच्या तक्रारीमुळे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्याबरोबर वैद्यकीय अधिका-यांनी त्या रुग्णांची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून त्यांच्यासह वैद्यकीय निगराणी ठेवून आहेत.
कुटुंबियांची तपासणी होणार त्या 21 वर्षीय युवकांच्या कुटुंबियांची तपासणी होणार असल्याची माहिती हाती आली असून यसंदर्भात आरोग्य विभागाने अधिक तपशील दिला नाही. त्या युवकाचे नाव, त्याचा पत्ता, भाग वगैरे बाबत गुतप्ता बाळगली जाणार आहे.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

आज माफी नाही!..!कलेक्टर मुगळीकर यांचे आजच तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश!! एकही बळी नाही!.

आज माफी नाही!..!कलेक्टर मुगळीकर यांचे आजच तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश!! एकही बळी नाही!.
परभणी/प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोना विषाणू व्हायरसचा एकही रुग्ण अद्याप दगावलेला नाही. किंबहुना कोरोना विषाणू व्हायरसचा एकही रुग्ण जिल्ह्यातील कोणत्याही भागात कोणत्याही रुग्णालयात आढळलेला नाही.तरीदेखील काही व्यक्ती अफवा पसरवून जिल्हा प्रशासनाची बदनामी करीत असल्यामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना केलीय एवढेच नव्हे तर अफवा पसरवणाऱ्या आणि जिल्हा प्रशासनाची बदनामी करणाऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी जारी केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संदर्भात योग्य ती काळजी आणि योग्य त्या दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतल्या आहेत सर्वप्रथम संपूर्ण राज्यात परभणी जिल्ह्याच्या सीमा बंद करून यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केला त्यानंतर परभणीच्या शासकीय रुग्णालयात अनेकांची तपासणी करण्यात आली एवढेच नव्हे तर संशयित व्यक्तींचाही तपासण्या करण्यात आल्यामात्र काही समाजकंटकांनी विविध माध्यमांचा द्वारे अफवा पसरविण्यात आल्या आहेत या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये आजपर्यंत एकही रुग्ण दगावला नाही किंवा एकाही रुग्णाला बाधा झाली नाही असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात आणि संस्थेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे……

जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी पाथरी व मानवत येथील ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन आयसोलेशन व क्वारंटाईन रुग्णांची व्यक्तीशः विचारपुस केली,जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३२० संशयितांची नोंद,जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नाही

*जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी पाथरी व मानवत येथील ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन आयसोलेशन व क्वारंटाईन रुग्णांची व्यक्तीशः विचारपुस केली*

* जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३२० संशयितांची नोंद

*जिल्हयात कोव्हिड- १९ विषाणु बाधित एकही रुग्ण नाही


परभणी दि.12:- परभणीचे जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी आज पाथरी व मानवत येथील ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देवुन संपूर्ण पाहणी केली तसेच आयसोलेशन व क्वारंटाईन रुग्णांची व्यक्तीशः विचारपुस करून संबंधित अधिकाऱ्याकडून औषधी साठा व कोरोनाविषयक लागणारे साहित्य, उपकरणे , मनुष्यबळ या बाबत सविस्तर आढावा घेवुन भविष्यात घ्यावयाच्या खबरदारीबाबत योग्य त्या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांच्या निर्देशानुसार तबलिक जमात दिल्ली प्रकरणातील संशयितांचे पहिले स्वॅब निगेटीव्ह येऊन ७ दिवस पुर्ण झाले आहेत अशा व्यक्तींचे दुसरा स्वॅब पुर्नतपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते त्या पुर्नतपासणीत स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
आज रोजी जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३२० संशयितांची नोंद झाली असून एकुण घेण्यात आलेले नमुने २८४ व त्या पैकी २४४ निगेटिव्ह असुन २३ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत . आजपर्यंत १७ स्वॅब पुणे राष्ट्रीय विषाणु संस्था व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय , औरगाबाद यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे .
आज दि. १२ एप्रिल २०२० रोजी एकुण १८ संशयितांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय , औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे . आज  नव्याने दाखल झालेले संशयीत १४ असून एकुण नोंद झालेले संशयीत ३२० पैकी विलगीकरण केलेले १३०, हॉस्पीटलमध्ये संसर्गजन्य कक्षात २०, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले १७०,  नोंद झालेल्या एकुण ३२० पैकी परदेशातुन आलेले ६२ व त्यांच्या सपंर्कातील ६ असे आहेत. तसेच जिल्हयात कोव्हिड १९ विषाणु बाधीत आज रोजी एकही रुग्ण नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
       -*-*-*-*-

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथिल गावकर्यांनी केली गावबंदी बंदी

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथे गावबंदी
पाथरी:- सध्या देशभरासह संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोणा विषाणू मुळे प्रत्येक माणसाच्या मनात भितीचे वातावरण आहे.हा रोग एका व्यक्तिपासुन दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने माणसे एकमेकांजवळ येण्याचे टाळत आहेत.कोरोना विषाणुचा संसर्ग भारतात अधीक प्रमाणात होऊ नये म्हणून पंतप्रधान,सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासुन ते सरपंचापर्यंत प्रत्येकजण खबरदारी घेण्याच्या सुचना करीत आहेत.याच पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील मौजे-पोहेटाकळी येथे सरपंच भागवत कुल्थे, उपसरपंच विलास गोंगे,राज राम गोंगेे,ग्रामसेवक आजमखाॅ पठाण, पोलीस पाटील राहुल घुगे, ग्रामपंचायत मारोती पोहेकर,पत्रकार लक्ष्मण उजागरे,सुदाम उजगरे सेवक महादेव गायकवाड आदी गावकर्यानीं गावबंदी केली.
कारण इतर ठिकानहुन लोक गावात ये-जा करीत असल्याने त्यांच्यापासून गावातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे, असे समजावुन सांगुन गावात प्रवेश करता येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर माती दगड आणी काट्या टाकून वाहतूक तात्पुरती बंद केली आहे.

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन - मुख्यमंत्री;तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

*महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन - मुख्यमंत्री*

*तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन*

मुंबई, दि. ११ : राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीची माहिती व घेतलेला निर्णय सांगण्यासाठी आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.

*तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो*

परिस्थिती नियंत्रणात असली तरी अजिबात गाफील राहून चालणार नाही, राज्यातील नागरिकांनी स्वत:च  स्वत:चा रक्षक होतांना खबरदारी घ्यावी, आम्ही जबाबदारी घेतो, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी वागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिस्त पाळली तरच ३० तारखेपर्यंत आपण बाजी मारू शकू, असेही ते म्हणाले.

*लॉकडाऊनमध्ये हे सुरुच राहणार*

 या लॉकडाऊनच्या काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता, औषधे  यांची वाहतूक आणि पुरवठा सुरुच राहतील, हेही त्यांनी स्पष्ट केले.

*काय करायचे यावर काम सुरु*

१४ एप्रिलनंतर काय करायचे यावर काम सुरु आहे त्याची माहिती मी आपणा सर्वांना १४ तारखेपर्यंत देईनच, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. धैर्य, संयम आणि वागण्यातील शिस्तच आपल्या सभोवतालच्या शृखला तोडणार असल्याचे ते म्हणाले. शक्यतो घराबाहेर पडू नका, जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी जावे लागले तरी गर्दी करू नका, मास्क लावूनच बाहेर जा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

*परिस्थितीच तशी*

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चर्चा करतांना त्यांच्या-आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता. आतापर्यंत आमच्या तोंडावर पट्टी बांधण्याचे धाडस कुणी केले नाही, परंतू सध्याची वेळच तशी आली आहे असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांची संख्या वाढते आहे, ही लपवण्यासारखी बाब नाही. पण आपण चाचण्याही वाढवल्या आहेत. लोकांनी आपल्याकडे येऊन चाचणी करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊन चाचणी करत आहोत. गेट वे ऑफ इंडिया जसं मुंबईचं प्रवेशद्वार आहे. तसेच मुंबईचे विमानतळही आहे. येथे जगभरातून प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशातून जे लोक आले त्यांची तपासणी झाली नसल्याचे ते म्हणाले. आपण  गुणाकार मंद राखण्यात यश मिळवले असले तरी तो शुन्यावर आणण्याचा, एकही रुग्ण कोरोनाबाधित होणे नको असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

*ज्येष्ठांची काळजी घ्या*

घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत ३३ हजार चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. एकट्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्याची माहिती देतांना त्यांनी १ हजार पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली. बाधित रुग्णांमध्ये ६५ ते ७० टक्के लोकांना अति सौम्य आणि सौम्य लक्षणे असल्याचे ते म्हणाले. बरे होऊन घरी जाणाऱ्या, क्वारंटाईन लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी जाणाऱ्या लोकांचा आकडा मोठा असल्याचे ते म्हणाले. दुर्देवाने राज्यात काही मृत्यू झाल्याचे सांगतांना त्यात हायरिस्क गटातील नागरिकांचा समावेश असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. काही रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

*बाधित क्षेत्र पूर्ण सील*

मुंबईमध्ये ज्या भागात पॉझेटिव्ह रुग्ण आढळले ते विभाग पूर्ण सील केल्याचे सांगतांना येथील नागरिकांना सुरुवातीला अडचणी आल्याचे, गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले. पण तिथेही जीवनावश्यक वस्तु, औषधे, भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पॉझेटिव्ह रुग्ण आलेला भागच एकप्रकारे क्वारंटाईन करत असल्याचे  सांगतांना या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी महानगरपालिका घरोघरी जाऊन करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

*महाराष्ट्र धीरोदत्त, देशाला दिशा दाखवणारा*

आतापर्यंत महाराष्ट्राने धीरोदत्तपणे या संकटाशी सामना केला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवतो या संकटातही महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांना गडबडून, गोंधळून न जाण्याची विनंती केली. ही बंदी किती दिवस हे आपल्याच हातात असल्याचे सांगतांना शिस्त व्यवस्थित पाळली तर विषाणुची साखळी तुटेल याची जाणीवही त्यांनी करून दिली. संपूर्ण देश एकसंघपणे या विषाणुशी लढतोय, यात कोणतेही राजकारण करायचे नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही एकजुट सदासर्वदा अशीच कायम ठेवली तर महाराष्ट्र आणि देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

               ००००

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध

कोरोना
प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध
जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 1921 पर्यंत चालले. जगाची विभागणी दोन गटात झाली.साम्राज्यवाद हे पहिल्या  महायुधदाचे  मूळ कारण. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, आदी  दोस्त  राष्ट्रानी जर्मनीवर  जे जुलमी  प्रतिबंध लादले यातूनच दुसर्‍या  महायुद्धाची  बीजे रोवली गेली.
पराभवाचा  आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि जगावर राज्य  निर्माण करण्यासाठी जर्मनीचा  हुकूमशहा अडालफ हिटलरने जगावर  दुसरे  महायुद्ध लादले. 
  1939  मध्ये  सुरु झालेले  महायुद्ध सर्वात  भीषण होते. अमेरिकेने  जपानच्या हिरोशिमा आणि  नागासकी  या महनगरावर अणुबॉम्ब टाकले.एका क्षणात लाखो लोकांना आपला जीव गमवावा  लागला. लाखो लोक कायमचे अपंग झाले. जपान उध्वस्त झाला. आणि दुसरे महायुद्ध  संपले. ते अनेक दूरगामी परिणाम करुन. 
   या  दोन्ही  महायुद्धात लढले ते  सैनिक. भारतीय त्या वेळेस इंग्रज  सैनिकासोबत होते. आपण  इंग्रजांचे गुलाम  होतो. आधुनिक तंत्रज्ञान, नवनवे शस्त्र, विमाने, युध्दनौका, आणि मानवी  संहारक अणुबॉम्बचा या युद्धात  वापर केला गेला. 
 सध्याही जगात  महायुद्धाची  परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन  मधून कोरोना विषाणूंचा संसर्ग असा  पसरला. बघता बघता या  कोरोना विषाणूने  संपूर्ण जगाला  विळखा  घातला  आहे. 
   ज्यावेळी  चीनमध्ये या  विषाणूने हजारो  लोकांचे  बळी घेतले होते. त्यावेळी कुणालाही वाटले नाही की हा विषाणू जगभर थैमान घालेल. 
  जग या महामारीला  संपविण्यासाठी लढाई लढत आहे. महासत्ता अमेरिका  हतबल  झाली आहे. युरोपातील देश  सर्वाधिक  प्रभावित झाले आहेत. 
जगात  कोरोना  संसर्ग  रुग्णांची  संख्या  14 लाखांहून अधिक  वाढली आहे. अमेरिका,फ्रान्स, इटली, स्पेन येथे  मृतांचा आकडा  दहा हजारांचा  पार पडला आहे. 
  जग  अक्षरश  थांबले  आहे. उद्योग  व्यवसाय  ठप्प झाले  आहेत. बाजारपेठा  बंद करून  लोकांना सुरक्षित कसे करता येईल  याकडे  सरकार कामाला लागले आहेत. आर्थिक  मंदी  निर्माण झाली आहे. 
  भारतातही  या  विषाणू  विरुद्ध युध्द  सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  तातडीने आवश्यक पावले  उचलली. हवाई वाहतूक  बंद करून बाहेरुन  लागण झालेल्या  व्यक्ती  येणार  नाहीत  याची काळजी घेतली. या महामारीवर  विजय  मिळविण्यासाठी संपूर्ण  लाँकडाऊन घोषित केला. 
  लाॅकडाऊन नंतर अनेक  गंभीर  प्रश्न निर्माण झाले आहेत. महानगरे  ओस  पडत आहेत. शहरात पोटाची खळगी  भरण्यासाठी गेलेले गोर गरीब  आपले घर जवळ  करीत आहेत. मुंबई, दिल्ली येथून  लाखो कामगार, हातावर पोट असणारी  माणसं मिळेल त्या  वाहनाने, वाहने  बंद  झाल्यावर शेकडो मैल उपाशी  तापाशी लेकरा  बाळाला घेऊन  घर  गाठत  आहेत. 
  केंद्र सरकारने  तसेच राज्य  सरकारने कोणीही घराबाहेर पडणार नाहीत. घरात  रहा कोरोनाला हरवा. यासाठी  प्रत्येक नागरिकाना  सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी सांगितले की या  महामारी  विरुद्ध  हे  युद्ध  आहे. या  महायुद्धात प्रत्येक नागरिक  एक  सैनिक  म्हणून  लढत  आहे. 
  हे कोरोना विषाणू  विरूद्ध असे  महायुद्ध आहे. ज्या  महायुद्धात जगातील प्रत्येक नागरिक  सहभागी झाला आहे. हातात  कोणतेही  शस्त्र  न  घेता. 
  यासाठी युद्धातील  आघाडीचे  सैनिक  आहेत ते डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, अधिकारी, कर्मचारी, शासन, प्रशासन आणि  शेवटी नागरिक. 
   नागरिक  मग  तो कोणत्याही  जाती धर्माचे  असो. कोणत्याही पंथाचा असो. गरीब  असो किंवा करोडपती असो. कोरोनाने कुणालाही  सोडले  नाही. 
    हा  विनाशकारी  काळही उद्या नक्कीच  संपणार आहे. एक  सैनिक जसे  आपल्या  मातृभूमीसाठी सर्वस्व पणाला लावतो. तशी वेळ आली आहे. आता लोकांनी सोशल  डिसटंसिंगचा नियम पाळावा. घराबाहेर पडू नये. घराबाहेर जाताना मास्क  वापरावा. या युद्धात  विजय  नक्की आपलाच आहे.
    रानबा गायकवाड 
     9420148538

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता फ्रिज, एसी, टीव्ही व इतर विद्युत उपकरणे नेहमीप्रमाणे चालू ठेवावीत-जिल्हादंडाधिकारी श्री. मुगळीकर

*5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता फ्रिज, एसी, टीव्ही व इतर विद्युत उपकरणे नेहमीप्रमाणे चालू ठेवावीत*
- जिल्हादंडाधिकारी श्री. मुगळीकर

परभणी दि.4:- 5 एप्रिल 2020 रोजी रात्री 09 . 00 वाजता 9 मिनिटे स्वेच्छेने घरातील सर्व लाईट्स बंद करून आपल्या दरवाजा किंवा बाल्कनीतून मेणबत्ती , दिवा , टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावावा . हे सर्व करीत असतांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडू नये . हे करताना कोणीही रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये . तसेच घरातील इतर उपकरणे जसे की, फ्रीज , एसी , टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे नेहमी प्रमाणे चालू ठेवावीत. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी दि.म.मुगळीकर यांनी केले आहे.

         कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगात आहे . त्यामुळे या विरोधात स्वविलगीकरण , सामाजिक अंतर राखण्याची कृती करुन निर्धारपूर्वक लढण्याचे आवाहन भारताचे  पंतप्रधान यांनी केले आहे . त्यासाठी त्यांनी 5 एप्रिल या दिवसाची निवड केली आहे . कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटापासून दूर जाण्याचे सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत , त्यासाठी लॉकडाऊनची घोषणा देशात व राज्यात करण्यात आली आहे . या काळात परभणी जिल्हयातील जनतेने मोठे सहकार्य केले आहे . परभणी जिल्हयातील जनतेने 22 मार्चला जनता कर्फ्यूचे 100 टक्के पालन केले . त्यानंतर आता येत्या रविवारी अर्थात 5 एप्रिलला रात्री 09 . 00 वाजता परभणी जिल्हयातील जनतेने स्वेच्छेने 9 मिनिटे द्यायची आहेत . 
       सदर तारखेस रात्री 09 . 00 वाजता घरातील सर्व लाईट्स स्वेच्छेने बंद करून बाल्कनी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती , दिवा , टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅश लाईट लावावा . तथापी हे करत असतांना रस्त्यावरील पथदीवे , घरातील फ्रीज , एसी , टिव्ही व इतर विद्यूत उपकरणे बंद करु नयेत . असेही आवाहन परभणी जिल्हयातील जनतेला करण्यात येत आहे . जनतेने घरातील उपकरणे यांचा वापर चालू ठेवावा व काहीही काळजी करु नये. असेही कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-

कुवेतहून परतलेली एकाच कुटुंबातील ४ जण होम क्वारंटाईन

कुवेतहून परतलेली एकाच कुटुंबातील ४ जण होम क्वारंटाईन

पाथरी - दिल्ली येथून एकास आयसोलेशन कक्षात ठेवल्यानंतर आता प्रशासनाने कुवेत येथून  6 मार्च रोजी पाथरी येथे आलेल्या चार जणांना होम क्वारंटाईन केले आहे. चारही जण एकाच कुटुंबातील असून 3 एप्रिल रोजी  तपासणीकरून  प्रशासनाने होम क्वारंटाईन केले.

 दिल्ली येथील घटनेनंतर प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. कोरोनाच्या  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी पर्यंत केले जात आहे. लॉकडाउनच्या काळात जिल्हा सीमेवर दाखल झालेले मजुरांचे प्रशासनाने होम क्वारंटाईन करून रोज आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन केलेल्या मजुरामध्ये पाथरी तालुक्यातील ही काही मजूर आहेत.
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाल्याचे पहावयास मिळत आहे.  3 एप्रिल रोजी दुपारी दिल्लीहुन आलेल्या एकास पाथरी ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी म्हणून आता  6 मार्च रोजी कुवेत येथून  पाथरीत परतलेल्या पती-पत्नी दोन मुले अशा चार जणांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाईन केले आहे. अशी माहिती तहसीलदार एन यु कागणे यांनी दिली. त्यांची आरोग्य तपासणी नियमित केली जाणार आहे अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुमंत वाघ यांनी दिली.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा

*दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा!!*
 
परभणी:-कोरोना विषाणू व्हायरसचे गांभीर्य पाथरी तालुक्यातील प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कळले आहे किंवा नाही याची माहिती नसली तरी  दोन महिन्यांच्या दिल्लीतील वास्तव्यानंतर देखील पाथरीत आलेल्या व्यक्तीला त्याच्याच घरी ठेवण्यात आले मात्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भात अतिशय गंभीरपणे दखल घेतली असून त्यांनी या व्यक्तीला परभणी ला शिफ्ट करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती मिळते.पाथरी येथून दिल्लीत दोन महिन्यांसाठी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीला पाथरी येथेच त्याच्या घरी तालुका प्रशासनाने ठेवले चौदा दिवस घरी राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या.मात्र सध्याचे बदलते वातावरण आणि गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या व्यक्तीस तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात चालवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.परिस्थितीचे अतिशय गांभीर्य लक्षात घेऊन पाथरी येथील एका गल्लीत ठेवणार्या या इसमास तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शिफ्ट करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी तालुका प्रशासनास दिले असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या दोन महिन्यात ही व्यक्ती पाथरी हून दिल्लीला गेली होती.आणि दिल्लीमध्ये दोन महिने वास्तव्याला होती परभणीच्या पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला परंतु तालुका प्रशासनाने मात्र त्याची वैद्यकीय तपासणी केली तरी त्याची रवानगी मात्र परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केली नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे असताना तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही‌.त्यामुळे या व्यक्तीला पाथरी येथील त्याच्या घरात ठेवण्यात आले.याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या व्यक्तीला तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठीचे आदेश दिले असल्याची माहिती मिळालीय.

दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा

*दिल्लीतून पाथरीत!!तालुका प्रशासन चुकले!! कलेक्टरांनी आदेश दिलाय परभणीला शिफ्ट करा!!*
 
परभणी:-कोरोना विषाणू व्हायरसचे गांभीर्य पाथरी तालुक्यातील प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कळले आहे किंवा नाही याची माहिती नसली तरी  दोन महिन्यांच्या दिल्लीतील वास्तव्यानंतर देखील पाथरीत आलेल्या व्यक्तीला त्याच्याच घरी ठेवण्यात आले मात्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भात अतिशय गंभीरपणे दखल घेतली असून त्यांनी या व्यक्तीला परभणी ला शिफ्ट करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती मिळते.पाथरी येथून दिल्लीत दोन महिन्यांसाठी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या व्यक्तीला पाथरी येथेच त्याच्या घरी तालुका प्रशासनाने ठेवले चौदा दिवस घरी राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या.मात्र सध्याचे बदलते वातावरण आणि गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या व्यक्तीस तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात चालवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.परिस्थितीचे अतिशय गांभीर्य लक्षात घेऊन पाथरी येथील एका गल्लीत ठेवणार्या या इसमास तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शिफ्ट करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी तालुका प्रशासनास दिले असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या दोन महिन्यात ही व्यक्ती पाथरी हून दिल्लीला गेली होती.आणि दिल्लीमध्ये दोन महिने वास्तव्याला होती परभणीच्या पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याचा शोध घेतला परंतु तालुका प्रशासनाने मात्र त्याची वैद्यकीय तपासणी केली तरी त्याची रवानगी मात्र परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात केली नाही.
जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करणे गरजेचे असताना तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही‌.त्यामुळे या व्यक्तीला पाथरी येथील त्याच्या घरात ठेवण्यात आले.याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या व्यक्तीला तातडीने परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठीचे आदेश दिले असल्याची माहिती मिळालीय.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

कोरोणा आणी जागतिकीकरणाची दिशा.

कोरोणा आणि जागतिककरणाची दिशा..

- हर्षवर्धन घाटे, नांदेड

सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल
त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट करावे लागेल तेव्हाच कुठे ह्या शंका संपुष्टात येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा  चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी  पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था  पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या  आर्थिक  नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय  जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी  वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात  अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या  विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार  घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय  अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक  नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था  निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी  भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक  सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच  कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी  शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत  आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.
सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.पाश्चात्य देशही ह्या गंभीर आजारापुढे हतबल झाले आहेत.इटली सारखी आदर्श आणि उत्तम आरोग्यव्यवस्था ह्या विषाणूशी सामना करण्यात अक्षम ठरली आहे.चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात पसरलेल्या  या विषाणूमुळे जग ठप्प झाले आहे.याची तीव्रता लक्षात घेता जागतीक आरोग्य संघटनेने महासाथीची घोषणा केली आहे.एक विषाणू अवघ्या जगाला ठप्प करण्यात यशस्वी होत आहे.ही चिंतेची बाब म्हणावी लागेल.हे एकाएकी घडलेले नाही.मानवाचा स्वतःचा प्रचंड हव्यास त्यापोठी निसर्गाला ओरबाडून स्वतःचे अस्तित्व  अबाधीत ठेवण्याची जीवघेणी स्पर्धा यातून निर्माण झालेल्या जागतीक पर्यावरणबदलाचे हे एक द्योतक म्हणावे लागेल.मला आठवते २००७ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन ह्या ठिकाणी  भरलेल्या जागतीक पर्यावरण परीषदेत जागतीक तापमानवाढीचा धोका स्पष्ट करुन यापुढे साथींच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होईल त्याद्वारे मानवी अस्तीत्वासह संपूर्ण परीसंस्था धोक्यात येईल असा ईशारा शास्त्रज्ञांनी दिला होता.त्याकडे आंधळ्या विकासाचे प्रतीमान स्वीकारुन स्वतःच्या प्रचंड स्वार्थासाठी राजकीय व्यवस्थेत उतरलेल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक  दुर्लक्ष  केले.त्याची परीणीती जागतीक धोके उत्पन्न होण्यात होत आहे.कोरोना हे त्याचे सुक्ष्म रुप म्हणावे लागेल.आज काही मोजके देश वगळता संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे.या विषाणूमूळे भविष्यात नवनवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात आणि त्याचा मुकाबला करणे हे आव्हानास्पद ठरेल त्यातून संपूर्णपणे  मानवी अस्तीत्व नष्ट होऊ शकते ही एकमेव शिकवण लक्षात घेणे महत्वाचे ठरते.केवळ एक सुक्ष्म विषाणू आणि त्याचे परीणाम एवढ्या संकुचीत दृष्टीकोनातून याकडे पाहता येणार नाही.याचे कारण जागतिकीकरण आणि त्यातून जग एक जागतीक खेडे बनल्यामुळे केवळ हव्यास आणि त्यापोठी केवळ धावणे,जिंकणे हा प्रचंड हव्यास महासत्ता होण्याचे अर्थव्यवस्था ट्रिलीयन डाँलरमध्ये नेण्याचे अवाजवी स्वप्न आणि त्याची पूर्तता करण्यासाठी वाटेल तसा निसर्गाचा मानवी क्षमतेचा केलेला पूरेपूर वापर अण्वस्त्रस्पर्धा आणि त्यासाठीची नवनवीन आयुधे यातून निर्माण झालेले शंकेचे मळभ,शहरीकरणामुळे पर्यावरणाचा विनाश याचा एकञीत परीपाक म्हणजे मानवी अस्तीत्वाला निर्माण झालेला धोका हे वेळीच ओळखणे गरजेचे होते.केवळ चंगळवादी आणि भोगवादी अमेरीकन संस्कृतीकडे लागलेले डोळे आणि त्याचे अनुकरण यातून काहीही साध्य होणार नाही हे आता बहुधा जगाला कळालेले असेल.महासत्ताही कधी नव्हती इतकी हतबल झाली आहे.ट्रम्प यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळेच ह्या जीवघेण्या आजाराला अमेरीका बळी पडली आहे.गंभीर धोक्याची पूर्वसुचना देऊनही योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच अमेरीकेत ही सद्यस्थिती उदभवली आहे.मूळात कोरोना हा आजार कसा पसरला आणि तो एकट्या वूहान प्रांतातच का उदभवला बाकी चीनमध्ये का पसरला नाही? हे एक चीनने टाकलेले जैवीक युध्दाचे पाऊल आहे का?यासारखे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत.त्यावर थोडा प्रकाश टाकणे महत्वाचे ठरते.त्यासाठी चीनमधील वूहान प्रांताचे स्थान लक्षात घ्यावे लागेल.याच प्रांतात चीनची राष्ट्रीय विषाणू संस्था आहे.याच संस्थेत वटवाघळाद्वारे किंवा इतर प्राण्यांवर प्रयोग करीत असताना हा विषाणू बाहेर पडला अशी चर्चा होत आहे.अनेक जबाबदार माध्यमांनीही तसे वृत्त दिले आहे.वूहान प्रांतातील या विषाणू संस्थेच्या बाजूला मांस विक्रीची ठिकाणे आसल्याने तेथून हा रोग पसरला अशीही चर्चा आहे.चीनमध्ये या रोगाची सुरूवात  डिंसेबरमध्ये झाली.आणी वूहान प्रांत वगळता उर्वरीत चीनमध्ये ह्या रोगाची कुठेही लागण झालेली नाही.माञ या रोगाची वेळीच माहिती देऊन जगाला आश्वस्त सजग करण्याची तसदी चीनने का घेतली नाही.चीनपासून शेकडो मैल दूर असलेल्या  देशात हा रोग पसरला माञ चीनच्या इतर प्रांतात तो का पसरला नाही याची सांगोपांग चर्चा केल्यास काहीअंशी तरी हे जैवीक युध्दाची दिशा असल्याचे लक्षात येते.याचे कारण जेव्हा अमेरीका आणि चीन व्यापारयुध्द शिगेला पोहोचले त्यानंतरच हा विषाणू निर्माण झाला.तेव्हा याचे योग्य ते स्पष्टीकरण आणि जागतीक आरोग्य संघटनेतर्फ चौकशी होऊन यातील खरे काय हे आगामी काळात स्पष्ट  करावे लागेल तेव्हाच  कुठे ह्या शंका संपुष्टात  येऊ शकतात.चीनची प्रशांत महासागरातील आणी आशियातील प्रचंड दादागीरी वाढते विस्तारवादी धोरण यातून ह्या शंका अधिकाधिक दृढ होताना दिसत आहेत.यातील योग्य  काय हे स्वतःहून चीनने स्पष्ट करायला हवे अन्यथा  चीनला जागतीक बहिष्काराला सामोरे जावे लागेल.याचे कारण ज्या परकीय व्यापाराच्या बळावर चीन महासत्ता होतो आहे त्याची जागतीक बाजारपेठ संपुष्ठात आली तर चीनपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते.कोरोना या विषाणूला चीनी विषाणू असे अमेरीकन आध्यक्षांनी संबोधायला सुरुवात केलीच आहे.आणि पुढे त्यात इतरही देश सामील होऊन चीनला एकाकी  पाडू शकतात यात कुठलीच शंका नाही.राहीला प्रश्न या विषाणूच्या निर्मूलनाचा.त्यासाठीचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.त्याला आगामी काळात निश्चीतच यश येईल यात शंका नाही माञ याचे दूरगामी परीणाम सर्वच क्षेञावर होऊ शकतात. आज जागतीक अर्थव्यवस्था  पूर्णपणे ठप्प झाल्याने होणाऱ्या  आर्थिक  नुकसानीची मोजदाज करणेही अशक्य आहे.याचे सामाजीक आणि राजकीय  जीवनावरही प्रचंड परीणाम होऊ शकतात .अमेरीका आता परदेशी लोकांना सक्तीने बाहेर काढू शकते,पर्यटन आणि चंगळवादी संस्कृतीला निश्चीतच तडे जातील.परदेशी वस्तू वापरावरही अमेरीकन विचार करतील किंबहूना परदेशी  वस्तू वापरणारच नाहीत.त्यातून जागतीक व्यापाराचे अनेक करार संपूष्ठात येऊ शकतात.भविष्यात  अशी आव्हाने निर्माण होणार नाहीत याची पूरेपूर काळजी अमेरीका घेईल यात दुमत नाही.यामुळे भारतासारख्या  विकसनशील देशातील अनेकांचे परदेशी देशातील रोजगार जातील.त्यातच परदेशगमन नकोच अशीही भावना निर्माण होऊ शकते.त्यातून निर्माण होणारी बेकारी आणी लोकसंख्येचा अधिकांश कसा हाताळायचा हा प्रश्न निर्माण होऊन सरकार ह्या एकाच मुद्यांवर कोसळेल.शहरे निर्मनुष्य होऊन खेड्यांकडे लोकांचा ओढा वाढेल.जीवनशैलीतही बरेचसे बदल होतील.काटकसर आणि निसर्गस्नेही जीवशैली अंगीकारुन भारतीय चीनी वस्तूवर बहिष्कार  घालतील यात शंका नाही.त्यामुळेच आतापासून चीन चीनीभाई भाई चा प्रचार आळवीत आहे.त्यासाठी त्यांनी तो आपल्या राष्ट्रीय  अस्मितेचा मुद्दा बनला आहे.कोरोनाच्या निर्मीत्ताने दैववादावरही बरेचसे प्रबोधन होत आहे.देव हा संकटात धावून येतो असे आजपर्यत म्हटल्या जात होते कोरोनात माञ सर्व देवांनी सक्तीने क्वारंटाईन स्विकारले आहे.सामना सारख्या दैनीकातून पहिल्यांदाच दैववादावर टिका करणारा लेख संजय राऊतांनी लिहला.त्यावर सर्व स्तरातून व्यापक चर्चा झाली.देवांनी मैदान सोडले त्यामुळे आता दैववादावर अवलंबून आपले हित होणार नाही असा सुर त्यात होता.तो प्रबोधनकार ठाकरेंच्या लिखाणाचा परीपाक होता.देव देवळात नसतो देवळात पुजाऱ्यांचे पोट असते असे गाडगेबाबा म्हणाले होते.त्यामुळे लाखो समाजसुधारकांनी जे सांगीतले त्याची प्रचिती कोरोनामुळे लाखो दैववादी लोकांना झाली.आता तरी भारतीय लोक दैववादापासून काहीसे दुरावतील अशी आशा आहे.त्यापुढे जाऊन पुतळ्यांवर आणि मंदीरावर लांखो रुपये खर्च करणारे आपले प्रधानसेवक  नागरीकत्व,हिंदू देश उभारणीचे भाबडे स्वप्न दाखवून देशासाठी काहीही केलेले नाही हेही उघड झाले आहे.केवळ ईटलीच्या आरोग्य व्यवस्थेचे डोस पाजवून घरातच बसा असा एकतर्फी कार्यक्रम आळवीला जात असताना भारतात मात्र आपण गेल्या ७ वर्षात एकही रुग्णालय उभारु शकलो नाही,आरोग्यावर काहीएक रक्कम खर्च झाली नाही,पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले गेले नाही.केवळ राम आणि मंदीरे,हिंदू मुस्लीम वाद,विरोधी लोकांना दहशतवादी,नक्षलवादी असे शिक्के मारुन काँग्रेसने देश लूबाडल्याच्या वल्गना करण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही याची साधी खंतही व्यक्त मोदींनी व्यक्त केली नाही.देशप्रेमाचा मुलामा माञ यावेळी दिसला नाही.कुठे गेली आता स्वंयसेवकांची फौज,लाठ्या काठ्यांची आयुधे,रेशीमबागेतील देशसेवक सगळे दिखाऊ आणि घरभेदी हे आता उघड झाले आहे.लाखोंची मदत सगळे उद्योजक,खेळाडू देत आहेत.या पैशाचा सरकार विनियोग करणार का? पुन्हा आपला पाढा सुरुच हा प्रश्न यानिर्मीत्ताने निर्माण झाला आहे.प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जाते त्यातून आपण काय धडा घ्यायचा हे ठरवले पाहिजे.केवळ ट्रिलीयन डाँलरची अर्थव्यवस्था  निर्माण करुन उपयोग नाही तर पायाभूत सुविधा,शिक्षण ,आरोग्य यावर लक्ष द्यावे लागेल.त्यासाठी  भबकेबाज प्रचार सोडून धार्मिक  सहीष्णू दृष्टी स्वीकारावी लागेल.तेव्हाच  कुठे रचनात्मक बदल दिसू लागतील.याबरोबरच गोमुञामुळे सगळेच आजार दूर होतात असा स्वदेशी  शोध लावणाऱ्यांना आळा घालावा लागेल.कुठे गेले आता बाबा रामदेव त्यांनी किती रक्कम मदत म्हणून दिली सरकारला.रामदेवांचे कुठे गेले स्वदेशप्रेम, कुठे गेली पतंजली उपचारपध्दती.काहीही करुन अध्यात्माद्वारे लोकांना धार्मिक नशेत चढवून आपले हित साधण्याची ती एक पध्दत  आहे.त्यामुळे कोरोनाने जगण्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहून धार्मिक सहिष्णूतेतूनच अंतीम जगाचे कल्याण आहे हे दाखवून दिले आहे हे माञ नक्की.

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...