गुरुवार, २ एप्रिल, २०२०

खातेदारांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा-जिल्हाधिकारी

खातेदारांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा-जिल्हाधिकारी
                               

           परभणी दि.31:- कोरोना विषाणू (कोविड - १९) च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खातेदारांनी बँकेत गर्दी न करता राष्ट्रीयकृत बँकेने व ग्रामीण बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्राहक सेवा केंद्राचा ( CSP ) वापर करावा. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये आज रोजी परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत  ग्रामीण बँकेचे विविध ठिकाणी एकूण ३३७ ग्राहक सेवा केंद्र कार्यरत असून या केंद्रामार्फत १० हजार रुपयापर्यंत पैसे काढणे, २० हजार रुपयापर्यंत पैसे भरणे व २० हजार रुपयापर्यंतची रक्कम इतरांच्या खात्यामध्ये भरणे या सेवा पुरविण्यात येतात.
          त्याचप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रामार्फत २० हजार रुपयापर्यंत पैसे काढणे, २० हजार रुपये पर्यंत पैसे भरणे व ५० हजार रुपयापर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरण्याची सेवा पुरविण्यात येत आहे. तरी बँकेमार्फत गाव  व दिवस निहाय ग्राहक सेवा केंद्राचे वेळ बँकाकडून घोषित करण्यात येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रावरील ( SCP )  सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नसून ग्राहकांनी या सेवा केंद्राचा वापर केल्यावर त्यांना बँकेच्या शाखेपर्यंत प्रवास करावा लागणार नाही यामुळे काम सोपे होण्यास मदत होणार आहे . तरी या सेवेचा सर्व खातेदारांनी लाभ घ्यावा. असे जिल्हाधिकारी , परभणी यांनी कळविले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...