परभणी जिल्हयात थंडीची लाट
तब्बल पंधरा वर्षानंतर परभणीचे निच्चांक तापमान ३ अंश सेल्सिअस
परभणी दि.२९:- मराठवाडयातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हयात सध्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सध्या विदर्भामध्ये थंडीची लाट आलेली असुन पश्चिम विदर्भालगतचे जे तीन जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड, हिंगोली व परभणी या जिल्हयात थंडीच्या लाटेचा परिणाम जाणवत आहे. तसेच दिवसाचे कमाल तापमानात देखील घट झाली असल्यामुळे वातावरणात गारवा अधिक जाणवत आहे आणि दिवसा सुर्याची उष्णता जमिनीत शोषन होते व रात्रीला ही जमिनीत शोषण केलेली उष्णता आकाशाकडे परत परावर्तीत होते. सध्या ढगाळ वातावरण नसल्यामुळे आणि वारा शांत किंवा स्तब्ध असल्यामुळे सुर्याची उष्णताही सरळ आकाशाकडे निघून जात आहे. जर ढगाळ वातावरण राहीले असते तर ती उष्णता परावर्तीत होऊन वातावरणातील किमान तापमानात वाढ झाली असती. परंतु तसे होत नसल्यामुळे किमान तापमानात घट होत आहे. यापूर्वी १७ जानेवारी २००३ रोजी आतापर्यंतचे सर्वात कमी किमान तापमान २.८ अंशसेल्सिअसची नोंद झाली होती. दिनांक २९ डिसेंबर रोजी १५ वर्षानंतर परभणीचे किमान तापमान हे ३ अंश सेल्सिअस पर्यंत आलेले आहे आणि आगामी ३ ते ४ दिवस असाच वातावरणात गारवा राहील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ कैलास डाखोरे यांनी दिली आहे.
शनिवार, २९ डिसेंबर, २०१८
परभणी जिल्हयात थंडीची लाट तब्बल,पंधरा वर्षानंतर परभणीचे निच्चांक तापमान ३ अंश सेल्सिअस
रुखवतात ठेवली ग्रंथसंपदा,औरंगाबाद येथील विवाहत सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस दिली ग्रंथ भेट.
रुखवतात ठेवली ग्रंथसंपदा
औरंगाबाद येथील विवाहत सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस दिली ग्रंथ भेट.
सोनपेठ/प्रतिनिधी---दिनांक २९ डिसेंबर २०१८ रोजी रामनगर (औरंगाबाद) येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालय या ठिकानी आदर्श विवाह संपन्न झाला. प्राप्त माहीती नुसार औरंगाबाद येथील गणेश आप्पासाहेब बेदरे यांची कन्या चि.सौ.कां.भाग्यश्री हीचा विवाह हर्सूल (औरंगाबाद) येथील संजयशेठ मुंडलीक यांचे चिरंजीव प्रियेश मुंडलीक यांचेसी नातलग व मित्र परिवारां समक्ष नुकताच आनंदात पार पडला. नवविवाहीतांच्या हस्ते या मंगल प्रसंगी उपस्थितांना ग्रंथ भेट देण्यात आले.
जिल्ह्यातील सोनपेठ येथुन विविध उपक्रमाचे औचित्य साधुन वाचनप्रेमींकडून ग्रंथांची मोठ्या प्रमाणात देवान घेवान होत असुन; जमा झालेली पुस्तके विविध शाळेतील ग्रंथालयास देण्यात येतात. या योजनेतुन ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने आजपर्यंत लाखो रुपयांची पुस्तके अनेक शाळांना देण्यात आली आहेत. आजच्या या विवाहा निमित्त वधु पक्षाकडील मंडळींनी रूखवतात गृहोपयोगी साहित्य सोबत मौल्यवान ग्रंथसंपदा नवदाम्पत्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना व सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस भेट देण्यात आली.
सोनपेठच्या ग्रंथ चळवळीच्या प्रयोगाने प्रेरित होऊन मलाही या चळवळीचा भागीदार व्हावे असे वाटले व त्यांच्या प्रेरणेनेच मी ग्रंथ भेट दिली असल्याचे वधुचे आजोबा आप्पासाहेब अण्णाराव बेदरे यांनी प्रतिनीधीशी बोलतांना सांगीतले. सोनपेठसारख्या ग्रामीण भागातुन होत असलेले वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य शहरीभागातुनही राबविले जाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर समाजातील प्रत्येक घटकाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपल्या गावातील शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी केले.
या मंगलकार्यास नंदकुमार बोऱ्हाडे सेवानिवृत्त नायब तहसीलदार रहाता, नायब सुभेदार (से.नि.) शिवाजी बोकन, ओमप्रकाश चव्हाण, सुधाकरराव टाक, सोपानराव मुंडलीक, नंदु चिंतामणी, कैलास बुटे, सतिश शहाणे, आमोल शहाणे, चंद्रकांत मुंडलीक, मछिंद्र मुंडलीक, किरणसेठ बोऱ्हाडे, रमेश बोऱ्हाडे, गजानन मुंडलीक, संतोष शहाणे, रवींद्र मुंडलीक, विजय बेद्रे, आदींसह वधु-वर पक्षातील तसेच शहरातील नातलग व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी चालविल्या या अनोख्या उपक्रमाची उपस्थितांत चर्चा होताना दिसून आले.
शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८
संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी हणुमान कोल्हे
संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी हणुमान कोल्हे
पाथरी/प्रतिनिधी:-संभाजी ब्रिगेडच्या पाथरी तालुकाध्यक्ष पदी शुक्रवार 28 डिसेंबर रोजी हॉटेल सिटीप्राईड येथे हणुमान कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी नियुक्तीचे पत्र संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रविन दादा गायकवाड यांच्या हस्ते कोल्हे यांना देण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे,शांताराम कुंजीर, बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, दादासाहेब टेंगसे,डॉ जगदिश शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष पांडूरंग कोल्हे,संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम पौळ, जगदिश कोल्हे,विजय कोल्हे, बाळासाहेब झिंजान यांची उपस्थिती होती. या निवडी नंतर उपस्थित मान्यवरांनी हणुमान कोल्हे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
तरुणांनो व्यवसायिक,उद्योजक व्हा-प्रविन गायकवाड
तरुणांनो व्यवसायिक,उद्योजक व्हा-प्रविन गायकवाड
पाथरी/प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका वेळी अहद तंजावर तहद पेशावर आपला मुलूख असला पाहीजे हा निर्धार केला.पुढे मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले,दहा वर्ष दिल्ली काबीज केली .आता काळ बदलला आहे.
तरूणांना व्यवसाय, नोकरी करण्याच्या जगभर संधी आहेत, देशा बाहेर जात अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा काबीज करत अर्थाजन करणे काळाची गरज आहे. यातून मिळणारे परकिय चलन अब्जो रुपयांत असून देश सेवीची एक मोठी संधी यातून निर्माण होते.त्यामुळे आता जागृती खूप झाली तरुणांनो उद्योजक, व्यावसाईक होण्याचा कानमंत्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविन गायकवाड यांनी हॉटेल सिटी प्राईड येथिल संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाच्या वतिने शुक्रवार 28 डिसेंबर रोजी आयोजित स्वागत समारंभात बोलता दिला.
या वेळी त्यांच्या सोबत शांताराम कुंजीर, छगन शेरे, बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे,जि प चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कोल्हे, डॉ जगदिश शिंदे, जगदिश कोल्हे, ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे,पत्रकार किरण घुंबरे ,बाळासाहेब झिंजान, सचिन निलवर्ण यांची या वेळी उपस्थिती होती. पुढे बोलतांना ते म्हणाले की,सहकार क्षेत्रात दुध, साखर कारखाने या पलीकडे जात तरुणांनी एकत्र येत आधुनिक यंत्र,वाहने यांचे कारखाने का काढू नयेत? असा उदबोधक प्रश्न उपस्थित केला. 16 टक्के आरक्षणा विषयी बोलतांना ते म्हणाले की ही रिकामी बाटली आहे. न्यायालयात हे टिकणार नाही. येत्या काळात हे दिसून येणार आहे. जात ही व्यवसायावर ठरलेली आहे. गावगाड्यात शेती कसणाराला कुनबी म्हटले जायचे आणि कुनबी हाच मराठा असून तो ओबीसीत जातो. आणि आेबीसी आरक्षण घटने नुसार आहे. पन्नास टक्यावरच आरक्षण हे टिकणार नसल्याचा ही उल्लेख त्यांनी या वेळी केला. तरूणांनी जमेल ती कामे करा.घर,गाव या पेक्षा कामांच्या शोधात बाहेर पडा, आपल्या आदर्शा बद्दल जास्त भावनिक होऊ नका कारण डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी असले तरच जिवन जगने सोपे होते.नुसत्या भावनांनी पोट भरत नसल्याचे सांगुन उद्योग,व्यवसाय,काम,धंदा लाज न बाळगता केला पाहीजे असे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले. गायकवाड हे माजलगाव येथील कार्यक्रम आटोपून सकाळी आठ वाजता नायगाव येथे जात होते. या वेळी हॉटेल सिटी प्राईड येथे मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या वतिने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन तुकाराम पौळ यांनी केले तर प्रास्ताविक किरण घुंबरे यांनी केले आभार पांडूरंग कोल्हे यांनी मानले. या कार्यक्रमा साठी संभाजी ब्रिगेडचे नव नियुक्त तालुका अध्यक्ष हणुमान कोल्हे, संदिप टेंगसे,विजय कोल्हे, प्रभाकर काळे, शिवदास काळे, शरद यादव, शाम धर्मे,धनंजय आडसकर ,सुनिल जाधव, अमोल भाले, परमेश्वर नवले,गजानन घुंबरे, कार्तिक घुंबरे यांच्या सह मोठ्या संखेने युवकांनी परिश्रम घेतले.
मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८
जि.प.आंतरराष्ट्रीय ओजस शाळा माळीवाडा शाळेचे,भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण व लोकार्पण सोहळा पार पडला.
पाथरी/प्रतिनिधी-आज दि 25/12/2018 वार मंगळवार रोजी जि प आंतरराष्ट्रीय ओजस शाळा माळीवाडा येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ,आज आमच्या शाळेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण व लोकार्पण सोहळा पार पडला.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवीतव्यासाठी महाराष्ट्र्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (M I E B)स्थापना करण्यात आलेली असून राज्यातील 13 शाळांना आंतराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सह्याद्री अतिथीगृह ,मलबार हिल ,मुंबई येथे मा.नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस ,मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते ,व मा .नामदार श्री विनोदजी तावडे ,मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,मंत्रालय मुंबई ,यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाचे आमच्या शाळेत आंतरराष्ट्रीय शाळा नामकरण व लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
मंत्रालयातील प्रक्षेपणानंतर माळीवाडा शाळेचे
"भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा"
नामफलकाचे अनावरण मा .पृथ्वीराज बि. पी. मुख्यकार्यकारी अधिकारी परभणी यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आदरणीय आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय आमदार मोहनभाऊ फड उपस्थित होते.
त्याचबरोबर जि प अध्यक्षा उज्वलाताई राठोड,व जि प उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते उपस्थित होत्या.
आदरणीय आमदार मोहन भाऊ फड बोलताना म्हणाले की, माझ्या मतदार संघातील शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते याचा मला अभिमान असून,शाळेतील समस्या ,अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करीन ,शाळेच्या प्रगती बाबत सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
भावनाताई नखाते शिक्षण सभापती परभणी यांनी आपल्या मनोगतात शाळेला जास्तीत जास्त मदत केली जाईल व शाळेला मंजूर करण्यात आलेल्या वर्ग खोल्याचे भूमिपूजन करण्यात आले.
आदरणीय आमदार बाबाजानी साहेबांणी आपल्या मनोगतात उपस्थितांची मने जिंकली, कारण आनंदाची बाब म्हणजे शाळेला 2 एक्कर जमीन देण्याचा शब्द देऊन लवकरच त्या ठिकाणी भव्य अशी इमारत करणार असे घोषित केले.
उज्वलाताई राठोड जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात शाळेला जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय शाळेचे मुख्याध्यापक श्री चिंचाणे सरांनी केले.शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
सदर कार्यक्रमास श्री दादासाहेब टेंगसे,बाबूरावजी नागेश्वर,शिवकन्याताई ताई ढगे,मीनाताई भोरे,अनिल भाऊ नखाते,आशाताई गरुड शिक्षणाधिकारी परभणी,खोगरे साहेब,ससाणे साहेब,आम्ले साहेब,गाढे साहेब,राठोड साहेब,टेंगसे साहेब, कोल्हे साहेब,मंगलताई गायकवाड बालविकास अधिकारी,उपस्थित होते.
समिती च्या सर्व सन्माननीय सदस्यांनी कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.
शिक्षक ,गावकरी यांच्या सर्वांच्या सहभागाणे आजचा नामकरण व लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला,आदरणीय डोंगरे सरांनी व जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इखे सरांनी आभार मानले.
👏🏻
सदाशिव थोरात यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान
सदाशिव थोरात यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी
पाथरी:-जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष,सपोर्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी पाथरीचे चेअरमन तथा सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षक सदाशिव थोरात यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद,परभणीच्या वतिने दिला जाणारा राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार रविवार 25 डिसेंबर रोजी महापौर मिनाताई वरपुडकर यांच्या हस्ते सहपत्नीक प्रदान करण्यात आला.
25 डिसेंबर मंगळवार रोजी परभणी येथे कृष्णा गार्डन येथे दुपारी 12 वाजता महापौर मिनाताई वरपुडकर, गिरीष जाधव, डॉ भारत नांदूरे, व्यंकटराव जाधव,दि. ना फड यांच्या प्रमुख उपस्थितित त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या मान्यवरांना ही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. थोरात यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल बालकिशनजी चांडक, गोपाल लाड, शाम झाडगांवकर, लक्ष्मण साखरे पाटील, प्रसाद जोशी, प्रा डॉ सुरेश सामाले, अभियंते सतिष कोल्हे, श्रीधर लाडाने, सय्यद गुलशेर खान मामा, जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील, तुकाराम पौळ, प्रा गोपाल होगे, कैलास जाधव, गजानन घुंबरे पाटील, पत्रकार माणिक केंद्रे, सिद्धार्थ वाव्हळे,ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सोमवार, २४ डिसेंबर, २०१८
पाथरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.
पाथरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा........
----------------------------------------------------------
पाथरी / प्रतिनीधी :-- अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पाथरी तहसील कार्यालयाच्या वतीने दि.24 डिसेंबर रोजी दुपारी 1:00 वाजता तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी व्ही एल. कोळी तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पाथरीचे तालुका अध्यक्ष श्यामभाऊ रणेर सचीव डाॅ.अण्णासाहेब जाधव ता.उपाध्यक्ष नागनाथ कदम डाॅ.ल.रा.मानवतकर तसेच व्यासपीठावर तहसीलदार निलम बाफना यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमांत अ.भा.ग्रा.पंचायतच्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर ग्राहक संरक्षण कायदा 1986 बद्दल विस्तृत माहिती डाॅ. मानवतकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये त्यांना योग्य दरात वस्तू व सेवा मिळावी यासाठी व्यापक स्वरूपात व सर्व सामान्य माणसांपर्यंत कायद्याची माहीती जनजागृती च्या माध्यमातून होणे आवश्यक असल्याची गरज आहे असे अध्यक्ष श्याम रणेर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच तहसीलदार बाफना मॅडम यांनीही ग्राहकांच्या मुलभुत हक्क्काविषयी विश्लेषणीय माहीती दिली. व उपविभागीय अधिकारी कोळी यांनीही ग्राहकाची फसवणूक होणार नाही याची काळजी व्यापारी वर्गानींही घ्यायला हवी. व ग्राहकांनी पण आपण खरेदी केलेल्या वस्तू ची पावती घेतली पाहीजे कारण नुकसान झाल्यानंतर त्या पावतीमुळे तक्रार करता येईल व नुकसान भरपाई मिळेल ही माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी शहरातील व्यापारी संघटनाचे अध्यक्ष आरेफ खान तसेच पदाधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलण नवगीरे यांनी केले तर आभार प्रदर्शन साखरे यांनी केले.
रविवार, २३ डिसेंबर, २०१८
पाथरी येथिल भव्य रोजगार मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.
ओंकार सेवाभावी संस्था पाथरी ता.पाथरी जि.परभणी च्या वतीने दि.२३ डिसेंबर २०१८ रोजी शांताबाई नखाते विद्यालय,शिवाजी नगर,पाथरी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे उद् घाटक म्हणून मा.खा.संजय जाधव,तर अध्यक्षस्थानी मा.आ.बाबाजाणी दुर्राणी साहेब,प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी सभापती मा.अनिलभाऊ नखाते,जि.प.उपाध्यक्षा मा.सौ.भावनाताई नखाते,डाॅ.राजेंद्र चौधरी,मा.चंद्रकांत जाधव,डाॅ.निवृत्ती पवार,डाॅ.दिनेश बोराळकर,मा.संदिपभैय्या टेंगसे,मा.अमोल भाले,
ओंकार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा मेळाव्याचे आयोजक मा.डाॅ.जगदिश शिंदे व मा.सौ.श्रुतीताई शिंदे आदी उपस्थित होते. या मेळाव्यास पाथरी,मानवत,सोनपेठ,परभणी,माजलगाव परिसरातील बेरोजगार फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.जमलेल्या उपस्थित बेरोजगारांची मुलाखत घेण्यासाठी औरंगाबाद,पुणे,मुंबई या परिसरातील विविध कंपनीचे समन्वयक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.जगदिश शिंदे यांनी केले.मराठवाड्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवुन देण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.सौ.भावनाताई नखाते यांनी मार्गदर्शन करताना,दुष्काळी मराठवाड्यातील बेरोजगारांसाठी रोजगाराची फार मोठी संधी आहे.हा जगन्नाथाचा रथ आपण सर्वांनी मिळून पुढे चालू ठेवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.बाबाजाणी दुर्राणी साहेब यांनी बेरोजगारांची होत असलेली हेळसांड,शेतक-यांची अस्वस्थता ई.बाबींचा आढावा घेऊन त्यांनी डाॅ.जगदिश शिंदे सर यांना या मेळाव्याच्या बाबतीत शुभेच्छा दिल्या.
या रोजगार मेळाव्यात 5000 युवक व युवतींनी सहभाग घेतला,या पैकी 1000 युवकांना जागेवर जॉयनींग लेटर मिळाले व सोबत 700 युवकांनी मोफत व्यवसाय प्रशिक्षण व त्यानंतर किमान मासिक वेतन रु.16000 साठी रेजिस्ट्रेशन केले.LIC मध्ये 600 युवकांना घर बसल्या प्रतिमाह रु. 5000 चा जॉब व याव्यतिरिक्त 1000 युवकांना पुढील इंटरव्हिव्हचे लेटर मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गणेशराव आम्ले यांनी तर आभार प्रदर्शन तुकाराम शेळके यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ.अतुल भाले पाटील,मोतिराम निकम,डाॅ.सचिन कदम,डाॅ.माधव राठोड,डाॅ.दिनेश बोराळकर,डाॅ.विक्रम पाटील,मु.अ.एन.ई.यादव,प्राचार्य के.एन.डहाळे,प्रकाश रोकडे,तुकाराम पौळ आदींनी परिश्रम घेतले.
सोमवार, १७ डिसेंबर, २०१८
राष्ट्रिय ग्राहक दिन साजरा करण्यची अ.भा.ग्राहक पाचायतची मागणी
राष्ट्रिय ग्राहक दिन साजरा करण्यची अ.भा.ग्राहक पाचायतची मागणी
सोनपेठ (प्रतिनिधी) :-
सोनपेठ तालुका शाखा अखिल भारतीय ग्राहक पाचायत यांच्या वतीने दि.17 डिसेंबर 2018 सोमवार रोजी एका निवेदनाद्वारे राष्ट्रिय ग्राहक दिन साजरा करण्यची मागणी केलेली असून निवेदनात संदर्भ शासनाकडील पत्र क्र.राग्रादि / 2017 / प्रक्र.141 / ग्रासं - 2 दि.15 डिसेंबर 2017 नुसार राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य सास्कृतिक कार्यक्रम , प्रदर्शने , शिबिरे , परिसंवाद , चर्चासत्र , कार्यशाळा , ग्राहक संरक्षण विषयक निबंध / चित्रकला / वक्तृत्व / वाद-विवाद स्पर्धा अशा प्रकारचे विविध ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करावे व त्या बाबत पूर्व तयारी व नियोजन करणे कामी तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पाचायत तालुका शाखा प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी.ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्राहकांचे संवर्धन व संरक्षण करणे अपेक्षित आहे, ग्राहकांचे हित लक्षात घेवून प्रशासनाने नेहमीच एक पाऊल पुढे जाऊन काम करणे आपेक्षित आहे, परंतु आपल्या तालुक्यात या बाबत नेहमीच उदासीनता राहिलेली आहे, तरी वरीलप्रमाणे दि.15 ते 31 डिसेंबर 2018 हा ग्राहक जागृती पंधरवाडा म्हणून साजरा करावा अशी शेवटी विनंती केली आहे.या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पाचायत तालुका अध्यक्ष किरण स्वामी, उपाध्यक्ष मंजूर मुल्ला व सचिव राधेशाम वर्मा यांच्या स्वाक्षरी असून तालुका संघटक बळीराम काटे, सहसचिव सद्दाम हुसेन, कोषाध्यक्ष अभिजित गाडेकर लासिना, सर्व श्री सदस्य विजय काळे शेळगाव, हरिभाऊ डाके आवलगाव, तुकाराम यादव खडका, धोंडीराम शिंदे डिघोळ, पांडुरंग शिंदे नरवाडी, सौ.उषाताई कडतन, सौ.रुक्मिनताई नासे आदींची नाव व मोबाईल क्रमांकाची यादी जोडलेली आहे.हे निवेदन तहसील कार्यालय सोनपेठ येथील लिपिक प्रकाश गोरे व लिपिक गोविंद राठोड (मेजर) यांना देण्यात आलेले आहे.माहितीस्तव मा.डॉ.विलास मोरे अखिल भारतीय ग्राहक पाचायत जिल्हाध्यक्ष यांना पाठवण्यात आले आहे.
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...