बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

सुर्य पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने वृध्दाश्रम व रुग्णालया मध्ये फळ वाटप कार्यक्रम संपन्न

सुर्य पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने वृध्दाश्रम व रुग्णालया मध्ये फळ वाटप कार्यक्रम संपन्न.                                       पाथरी/प्रतीनिधी: भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी च्या वतीने ओमकार वृध्दा श्रमातील वृध्दांना व ग्रामीन रुग्णालयातील रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप करुन सुर्य पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांची १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली                          सविस्तर वृत असे कि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या १०६ व्या जयंती च्या निमीत्ताने दि.१२/१२/२०१८ रोजी पाथरी येथील ओमकार वृध्दा श्रमातील वृध्दांना,ग्रामीन रुग्णालय पाथरी येथील रुग्णांना व ओमकार रुग्णालय पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या अध्यक्षते मध्ये मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला या वेळी ग्रामीन रुग्णाय येथील कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन ग्रामीन रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डाॅ.सुमंत वाघ हे होते तर ओमकार वृध्द श्रम व ओमकार रुग्णालय पाथरी येथील फळ वाटप कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन डाॅ.जगदिश शिंदे हे होते तर वरील तिन हि ठिकांच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टि.एम.शेळके सर हे होते या वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीती म्हणुन ग्रामीन रुग्णालयाचे डाॅ.वाकनकर,डाॅ.जाधव,डाॅ.अधिकार घुगे,डाॅ.एम.एम.मनेरे,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.बालासाहेब घोक्षे,भारिप नेते प्रकाश उजागरे,टि.डी.रुमाले,संपादक विठ्ठल साळवे,पत्रकार महासंघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष तथा भारतीय बौध्द महासभेचे आवडाजी ढवळे,बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष शुध्दोधन शिंदे,माजी अध्यक्ष पि.बी.वनखेडे,माजी अध्यक्ष बि.एन.वाघमारे,भारिप युवा जि.अध्यक्ष दिलीप मोरे,बि.एन.घागरमाळे,वामनराव साळवे,भारिप ता.युवा अध्यक्ष अनिल ब्रम्हराक्षे,ता.कार्यअध्यक्ष कुमार भालेराव,लिंबाजी ढवळे,फुलवरे,कृष्णा कांबळे,महिला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,महिला उपअध्यक्षा सोमित्राबाई शिंगाडे,महिला उपअध्यक्षा सोनाबाई लांडगे,संभाजी शिंदे आदी उपस्थीत होते या सेवा भावी उपक्रमा मुळे ओमकार रुग्णालयातील व ग्रामीन रुग्णालयातील रुग्ण व त्याच बरोबर ओमकार वृध्दाश्रमातील वृध्द नागरीक यांनी समाधान व्यक्त केले तर भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी ने भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमीत्ताने वृधा श्रमातील नागरीकांना फळे वाटप केल्या बद्दल ओमकार वृध्दा श्रमाचे संचालक डाॅ.जगदिश शिंदे यांनी अभार व्यक्त केले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...