मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

सदाशिव थोरात यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान

सदाशिव थोरात यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी
पाथरी:-जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष,सपोर्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी पाथरीचे चेअरमन तथा सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षक सदाशिव थोरात यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद,परभणीच्या वतिने दिला जाणारा राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार रविवार 25 डिसेंबर रोजी महापौर मिनाताई वरपुडकर यांच्या हस्ते सहपत्नीक प्रदान करण्यात आला.
25 डिसेंबर मंगळवार रोजी परभणी येथे कृष्णा  गार्डन येथे दुपारी 12 वाजता महापौर मिनाताई वरपुडकर, गिरीष जाधव, डॉ भारत नांदूरे, व्यंकटराव जाधव,दि. ना फड यांच्या प्रमुख उपस्थितित त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या मान्यवरांना ही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. थोरात यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल बालकिशनजी चांडक, गोपाल लाड, शाम झाडगांवकर, लक्ष्मण साखरे पाटील, प्रसाद जोशी, प्रा डॉ सुरेश सामाले, अभियंते सतिष कोल्हे, श्रीधर लाडाने, सय्यद गुलशेर खान मामा, जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील, तुकाराम पौळ, प्रा गोपाल होगे, कैलास जाधव, गजानन घुंबरे पाटील, पत्रकार माणिक केंद्रे, सिद्धार्थ वाव्हळे,ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...