शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

रुखवतात ठेवली ग्रंथसंपदा,औरंगाबाद येथील विवाहत सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस दिली ग्रंथ भेट.

               रुखवतात ठेवली ग्रंथसंपदा
औरंगाबाद येथील विवाहत सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस दिली ग्रंथ भेट.
सोनपेठ/प्रतिनिधी---दिनांक २९ डिसेंबर २०१८ रोजी रामनगर (औरंगाबाद) येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालय या ठिकानी आदर्श विवाह संपन्न झाला. प्राप्त माहीती नुसार औरंगाबाद येथील गणेश आप्पासाहेब बेदरे यांची कन्या चि.सौ.कां.भाग्यश्री हीचा विवाह हर्सूल (औरंगाबाद) येथील संजयशेठ मुंडलीक यांचे चिरंजीव प्रियेश मुंडलीक यांचेसी नातलग व मित्र परिवारां समक्ष नुकताच आनंदात पार पडला. नवविवाहीतांच्या हस्ते या मंगल प्रसंगी उपस्थितांना ग्रंथ भेट देण्यात आले.
     जिल्ह्यातील सोनपेठ येथुन विविध उपक्रमाचे औचित्य साधुन वाचनप्रेमींकडून ग्रंथांची मोठ्या प्रमाणात देवान घेवान होत असुन; जमा झालेली पुस्तके विविध शाळेतील ग्रंथालयास देण्यात येतात. या योजनेतुन ग्रंथ वाचन चळवळीच्यावतीने आजपर्यंत लाखो रुपयांची पुस्तके अनेक शाळांना देण्यात आली आहेत. आजच्या या विवाहा निमित्त वधु पक्षाकडील मंडळींनी रूखवतात गृहोपयोगी साहित्य सोबत मौल्यवान  ग्रंथसंपदा नवदाम्पत्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना व सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस भेट देण्यात आली. 
सोनपेठच्या ग्रंथ चळवळीच्या प्रयोगाने प्रेरित होऊन मलाही या चळवळीचा भागीदार व्हावे असे वाटले व त्यांच्या प्रेरणेनेच मी ग्रंथ भेट दिली असल्याचे वधुचे आजोबा आप्पासाहेब अण्णाराव बेदरे यांनी प्रतिनीधीशी बोलतांना सांगीतले. सोनपेठसारख्या ग्रामीण भागातुन होत असलेले वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य शहरीभागातुनही राबविले जाण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर समाजातील प्रत्येक घटकाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपल्या गावातील शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी केले.
या मंगलकार्यास नंदकुमार बोऱ्हाडे सेवानिवृत्त नायब तहसीलदार रहाता, नायब सुभेदार (से.नि.) शिवाजी बोकन, ओमप्रकाश चव्हाण, सुधाकरराव टाक, सोपानराव मुंडलीक, नंदु चिंतामणी, कैलास बुटे, सतिश शहाणे, आमोल शहाणे, चंद्रकांत मुंडलीक, मछिंद्र मुंडलीक, किरणसेठ बोऱ्हाडे, रमेश बोऱ्हाडे, गजानन मुंडलीक, संतोष शहाणे, रवींद्र मुंडलीक, विजय बेद्रे, आदींसह वधु-वर पक्षातील तसेच शहरातील नातलग व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी चालविल्या या अनोख्या उपक्रमाची उपस्थितांत चर्चा होताना दिसून आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...