शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

प्रिन्स अकॅडमी सीबीएसई मध्ये आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

*प्रिन्स अकॅडमी सीबीएसई मध्ये आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*
सेलू /प्रतिनिधी-(दि ८) श्रीराम प्रतिष्ठान, संचलित प्रिन्स अकॅडमी सीबीएसई मध्ये आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते . या प्रदर्शनामध्ये  प्रिन्स अकॅडमी सीबीएसई सेलू , प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू ,ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू, व प्रिन्स एकात्मिक आदिवासी प्रकल्प सेलू यानी  सहभाग नोंदवला . एकूण ९४ विज्ञान प्रतिकृती सहभागी झाले.
  वैज्ञानिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी सतत मागील १० वर्षांपासून या शालेय स्तरावरील  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन डॉ. संजय रोडगे हे दरवर्षी  प्रिन्स अकॅडमी सीबीएसई  येथे करत असतात. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या  अध्यक्ष स्थानी डॉ.  संजय रोडगे, प्रमुख पाहुणे राम रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, काकडे सर , अपूर्वा तंत्रनिकेतनचे प्राचार्य अशोक बोडखे इत्यादी उपस्थित होते . आज या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकी किडे होण्यापेक्षा वैज्ञानिक संकप्लणा समजावून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक अडचणी किती प्रगल्भ पद्धतीने सोडवता येतील यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे , वैज्ञानिक शिक्षण हे वैयक्तिक नसून हे आपल्या समाजासाठी आहे. हे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये होणे गरजेचे आहे तरच आपल्या भारत देशाची प्रगती जी भविष्यातील नागरिक म्हणजेच विद्यार्थी यांच्या हातामध्ये आहे असे अध्यक्षीय  भाषणामध्ये डॉ संजय रोडगे यांनी मत व्यक्त केले .
या विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक गटात प्रथम क्रमांक व्ही - झट  कार सहभागी विद्यार्थी आर्यन सासवडे, वेदांत पामे, सय्यद झैफ, विष्णू तोंडे मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे  यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक भविष्यातील घर २.० सहभागी विद्यार्थी बालाजी गडदे , तनिश बिनायके मार्गदर्शक शिक्षक इंजि. अक्रम शेख  व तृतीय क्रमांक कार्बन कॅप्चर पॉवर प्लांट सहभागी विद्यार्थी सिद्धी आदळकर , शिवानी नावडे मार्गदर्शक शिक्षक भगवान क्षीरसागर  यांनी मिळवला.
प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्रदूषण मुक्त ऊर्जा सहभागी विद्यार्थी शिवराज टकले , वेद जवळेकर मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे  द्वितीय क्रमांक स्मार्ट दुभाजक सहभागी विद्यार्थी प्रसाद उंबरकर , मधुर कापसे मार्गदर्शक शिक्षक अनिल उजगरे  तृतीय क्रमांक रेन वॉटर हार्वेस्टिंग सहभागी विद्यार्थी गीता मांगले,  वैशाली किरवले मार्गदर्शक शिक्षक  वरप्रसाद मद्दु   यांनी मिळवला. सर्व विजेत्या विद्यर्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सौ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.  महादेव साबळे, प्राचार्य वर्षा स्वरूप, उपप्राचार्य ग्लॅसि फेर्नांडिस यांनी अभिनंदन केले  व
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा  दिल्या. यावेळी परीक्षक म्हणून प्रा. विठ्ठल सरकटे, प्रा. शिवानी मलवडे, प्रा. अशोक बोडखे, प्रा. विष्णू ताठे यांनी जिम्मेदारी सांभाळली. कार्यक्रमचे प्रास्ताविक हरिभाऊ कांबळे तसेच आभार प्रदर्शन कौशल पामे यांनी केले. नोंदणी विभाग सतीश बरसले, शिस्त विभाग तेजस्वीनी देशपांडे, नियोजन विभाग संतोष राऊत, मदन मानमोडे यांनी सांभाळला. तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी , शिक्षक , शिकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...