मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

त्या' पाच युवकांचा सोनपेठ वासियांकडून जाहीर सत्कार

'त्या' पाच युवकांचा सोनपेठ वासियांकडून जाहीर सत्कार

सोनपेठ (प्रतिनिधी) दि.०४डिसेंबर २०१८

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सोनपेठ तालुक्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा अंतर्गत झालेल्या आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपल्या पायातील चपला सोडणाऱ्या त्या पाच तरुणांचा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडुन विशेष सत्कार करण्यात आला. सोनपेठ तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मंगळवार दिनांक ०४ डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत स्वतःच्या पायात पादत्राणे घालणार नाही असा संकल्प करनाऱ्या नारायण रोडे, भगवान उंबरे, शशिकांत भोसले, पवन बारबोले व गजानन भोसले या पाचही तरूणांना सन्मानपूर्वक पादत्राणे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या आंदोलनात आत्मबलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मेणबत्त्या पेटवून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सकल मराठा समाजाकडुन मराठा क्रांती मोर्चाच्या तालुका समन्वयकांनी या पाचही जनांना फेटा, पुष्पहार, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानपुर्वक पादत्राणे देत त्यांचा सत्कार केला.
यावेळी तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक शिवाजी कदम, अॅड श्रीकांत विटेकर, अजित देशमुख, मधुकरराव निरपणे, आशोकराव यादव , रंगनाथ सोळंके, गणेश पाटील, अनिल झिरपे, संतोष गव्हाणे, रविंद्र देशमुख, जगन्नाथ कोलते, विष्णु मस्के, गणेश कदम, मुख्याध्यापक राजकुमार धबडे, प्रा.डाॅ.संतोष रणखांब, गोपाळ भोसले, सुरेश भोसले, अमोल गांगर्डे, नंदकुमार रोडे ,अॅड. आशोकराव यादव, भाई गणेश हेंडगे, दत्ता सोळंके, शिवराज जोगदंड, गणेश सपकाळ, कालिदास मस्के, दत्ता पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम यांनी केले तर आभार अजित देशमुख यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजासोबतच ईतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...