सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

पाथरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.

पाथरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा........
----------------------------------------------------------
पाथरी / प्रतिनीधी :-- अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पाथरी तहसील कार्यालयाच्या वतीने दि.24 डिसेंबर रोजी दुपारी 1:00 वाजता तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी व्ही एल. कोळी तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा पाथरीचे तालुका अध्यक्ष श्यामभाऊ रणेर सचीव डाॅ.अण्णासाहेब जाधव ता.उपाध्यक्ष नागनाथ कदम डाॅ.ल.रा.मानवतकर तसेच व्यासपीठावर तहसीलदार निलम बाफना यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमांत अ.भा.ग्रा.पंचायतच्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर ग्राहक संरक्षण कायदा 1986 बद्दल विस्तृत माहिती डाॅ. मानवतकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये त्यांना योग्य दरात वस्तू व सेवा मिळावी यासाठी व्यापक स्वरूपात व सर्व सामान्य माणसांपर्यंत कायद्याची माहीती जनजागृती च्या माध्यमातून होणे आवश्यक असल्याची गरज आहे असे अध्यक्ष श्याम रणेर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच तहसीलदार बाफना मॅडम यांनीही ग्राहकांच्या मुलभुत हक्क्काविषयी विश्लेषणीय माहीती दिली. व उपविभागीय अधिकारी कोळी यांनीही ग्राहकाची फसवणूक होणार नाही याची काळजी व्यापारी वर्गानींही घ्यायला हवी. व ग्राहकांनी पण आपण खरेदी केलेल्या वस्तू ची पावती घेतली पाहीजे कारण नुकसान झाल्यानंतर त्या पावतीमुळे तक्रार करता येईल व नुकसान भरपाई मिळेल ही माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी शहरातील व्यापारी संघटनाचे अध्यक्ष आरेफ खान तसेच पदाधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलण नवगीरे यांनी केले तर आभार प्रदर्शन साखरे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...