श्री महालिंगेश्वर विद्यालयात गोवर रुबेला लसीकरण संपन्न
शाळेतील ४८५ विद्यार्थ्यांना लसीकरणाचा लाभ
सोनपेठ- (प्रतिनिधी) दि.०३डिसेंबर २०१८
सोनपेठ शहरात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोवर रुबेला या जीवघेण्या आजाराचे महाराष्ट्रातून समुळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने दि. २७नोव्हेंबर १८ ते दि.३१डिसेंबर २०१८ या कालावधीत लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोनपेठ शहरातील शाळांमधुन लसीकरण मोठ्याप्रमाणात चालू आहे. तालूक्यातील २५हजाराहून अधिक आंगणवाडी, बालवाडी, शालेय व शाळाबाह्य असलेल्या ९महिने ते १५वर्ष वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण करण्यात येनार असल्याचे तालूका आरोग्याधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शहरातील श्री महालिंगेश्वर विद्यालयात आज लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील २६१मुली व २२४मुलांना (एकुण४८५) लसीकरण करण्यात आले.
यावेळी तालूका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पर्यवेक्षक श्रीमती ठोंबरे एस.पी. लस टोचक श्रीमती गाढे व्ही.के., मुंडे एस.पी., डावकर एस.एल. लांडे एम.यू., मिश्रक मालपाणी बी.बी., तालूका समूह संघटक देशमुख बी.डब्ल्यू. गट प्रवर्तक श्रीमती रंजवे पी.एम., कार्यक्रम सहाय्यक कुंभार बी.ए., आरोग्य सेवक डूबे ए.ए., वाहन चालक बालाजी सातपुते, खटाणे एस.डी. आदींचा सहभाग होता.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीकरणास आलेल्या कर्मचाऱ्यांना उत्स्फूर्तपणे सहकार्य केले.
सोमवार, ३ डिसेंबर, २०१८
श्री महालिंगेश्वर विद्यालयात गोवर रुबेला लसीकरण संपन्न,शाळेतील ४८५ विद्यार्थ्यांना लसीकरणाचा लाभ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा