शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये गुणानुक्रम पटकावणा-या विद्यार्थी व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार.

पाथरी/प्रतिनिधी-आज दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये गुणानुक्रम पटकावणा-या विद्यार्थी व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.परभणीच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती मा.सौ.भावनाताई नखाते तर प्रमुख पाहुण्या  म्हणून मा.सौ.मिराताई सरोदे,मु.अ.यादव एन.ई,प्राचार्य डहाळे के.एन उपस्थित होते.प्राथमिक गटातुन तालुका सर्वप्रथम स्वराज नवनाथ यादव,माध्यमिक गटातुन सर्वद्वितीय गोविंद मुरलीधर जाधव,लोकसंख्या शिक्षण माध्यमिक गटातुन सर्वप्रथम आसोले आर.टी सर,शैक्षणिक साहित्य माध्यमिक गटातुन सर्वप्रथम गावंडे ए.ए सर,तर प्राथमिक गटातुन सर्वप्रथम चव्हाण बी.एम सर,मार्गदर्शक शिक्षक आम्ले जी.जी,श्रीमती कांबळे के.एच,श्रीमती शिंदे जे.डी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सौ.भावनाताई नखाते यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे आवाहन केले व पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...