रो.ह.योजनेची कामे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन
सोनपेठ तालुक्यातील असंख्य महिला शेतमजूरांची मागणी
सोनपेठ (प्रतिनिधी) दि.११डिसेंबर २०१८
सबंध महाराष्ट्रात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. सोनपेठ तालुक्यातही अशीच वाईट परिस्थिती आहे. तालूक्यातील सर्वच नद्या कोरड्या पडलेल्या असून लवकरच विहीरीही तळगाठतील. त्यामुळे शेतकरी बांधवाना नापिकीला तोंड द्यावे लागनार आहे. अशा परिस्थितीत शेतमालकांना मजुरांना काम देणे अशक्य झाले आहे. रोजंदारीचा प्रश्नही भेडसावत आहे, परिणामी या शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या दुष्काळी परिस्थितीत शेतमजूर व महिलांकडे शेती कामाशिवाय दुसरे कसलेही कौशल्य नाही. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शेतमजूर महिलांना त्वरीत रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा.तहसीलदार सोनपेठ यांच्या मार्फत देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मा.महसूलमंत्री मुंबई, मा.पालकमंत्री परभणी, मा.आमदार पाथरी, मा.जिल्हाधिकारी परभणी यांनाही देण्यात आले आहे. यावेळी तहसीलचे राठोड यांनी निवेदनाची प्रत स्वीकारली.
निवेदनावर गणेशनगर, संभाजीनगर, सोनपेठ शहर व तालूक्यातील शेकडो महिला शेतमजूरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग तात्या कदम, सीतारामजी खेडकर, भगवानराव रुपनर यांच्यासह सोनपेठ शहर व तालुक्यातील शेकडो महिला, पुरूषांचा सहभाग होता.
दिलेल्या निवेदनावर वेळीच उपाययोजना न झाल्यास निवेदनकर्ते उपोषणाची तयारी करतील अशी चर्चा आहे.
मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८
रो.ह.योजनेची कामे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन, सोनपेठ तालुक्यातील असंख्य महिला शेतमजूरांची मागणी.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा