मंगळवार, ४ डिसेंबर, २०१८

दुष्काळ परिस्थितीमुळे खाजगी शिकवणीच्या शुल्कात शेतकऱ्यांच्या पाल्यांकरीता सवलत

जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद

दुष्काळ परिस्थितीमुळे खाजगी शिकवणीच्या शुल्कात शेतकऱ्यांच्या पाल्यांकरीता सवलत

परभणी, दि. 4 :- परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी परभणी शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांची बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनाकरीता खाजगी शिकवणीची फीस भरणे शक्य होणार नाही.  त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील तेंव्हा परभणी शहरातील कोचिंग क्लासेस संचालक यांनी शेतकऱ्यांच्या पाल्याकरीता फीसमध्ये सवलत द्यावी असे आवाहनास सर्व कोचिंग क्लासेस संचालक यांनी बैठकीतमान्यता दिली व आम्हीसुध्दा समजाचा घटक आहोत आम्ही निश्चित सवलत देवू असे आश्वासन खाजगी कोचिंग संचालक यांनी दिले.
या बैठकीस उपशिक्षणाधिकारी सलगर व खाजगी कोचिंग क्लासेसचे संचालक दिलिप घुंबरे, राजेश रणखांबे, विश्वभर काठवटे, प्रा.शाहेद पठाण, प्रा.विष्णु नवपुते, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.आतिश परिहार, प्रा.संदीप जैस्वाल, प्रा.बी.गुंडूंराव, प्रा.नितिन उंडाळकर, प्रा.संदीप गरुड, प्रा.अरुण शेजावळे, आमीर शेख, डॉ.मारोती हुलसुरे,  प्रा.आकाश टाकळकर, प्रा.गजानन काकडे, प्रा.कैलास सुळसुळे, प्रा.विठ्ठल खल्लाळ, प्रा.गोविंद कोलेवाड, प्रा.संतराम यादव, प्रा.जितेंद्र देशमुख,अतुल गडम, डॉ.विजय मगर, प्रा.विश्वनाथ केगडे, प्रा.सागर पाठक, प्रा.राजू शिंदे, प्रा.संभाजी संवडकर, प्रा.नितिन पारवे, प्रा.सचिन देशमुख, प्रा.संतोष कुलकर्णी, अमीत मुक्कावार, विनोद मस्के, दिनकर गरुड, यांची उपस्थिती होती. तसेच परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...