बुधवार, २७ मार्च, २०१९

एमसीएमसी समितीने माध्यमातील जाहिराती बरोबरच पेडन्यूज वरही विशेष लक्ष ठेवावे -जिल्हाधिकारी पी. शिवशंकर

*एमसीएमसी समितीने माध्यमातील जाहिराती बरोबरच पेडन्यूज वरही विशेष लक्ष ठेवावे*

-जिल्हाधिकारी पी. शिवशंकर


परभणी ,दि.२७:- जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने विविध प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होणा-या

राजकीय पक्ष व उमेदवारांच्या जाहीरातीबरोबरच  मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक  माध्यमातील  उमेदवार  व राजकीय  पक्षाबाबत  आलेल्या वृत्त, विशेष वृत्त व लेख अदि मजकूराची तपासणी  करुन  त्यातील पेडन्यूज  वर बारकाईने लक्ष ठेवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर  यांनी  सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या बैठकीत  जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक  अधिकारी महादेव किरवले, समिती सदस्य सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुचिता शिंदे, आकाशवाणी केंद्राचे संचालक  बगाटे, प्राध्यापक डॉ सुधीर इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की,भारत निवडणूक  आयोगाच्या  निर्देशाप्रमाणे  मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमावर पसिध्द करण्यासाठी   राजकीय पक्ष  व उमेदवारांच्या  जाहिरातीचे  पूर्वप्रमाणीकरण जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या द्विसदस्यीय समितीच्या मार्फत  केले जाईल . त्याप्रमाणेच  मुद्रीत , इलेक्ट्रॉनिक माध्यमातील  जाहिरातीच्या स्वरुपातील  व मोबदला  देऊन प्रसिध्द केलेल्या बातम्यांची  तपासणी करुन  संशयित  पेड न्यूज  वर बारकाईने लक्ष ठेवावे. व त्या पेडन्यूज असल्याचे  आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे  सिध्द होत असेल तर संबंधित  उमेदवारांना  नोटीस  देण्याबरोबरच  पेड न्यूज  वरील तो खर्च संबंधित  उमेदवारांच्या निवडणूक  खर्चात  नोंद  करण्याबाबत  निवडणूक खर्च समितीला कळविले पाहीजे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

नोंदणीकृत  राष्ट्रीय  अथवा राज्यस्तरावरील  पक्ष आणि निवडणूक  लढविणाऱ्या  प्रत्येक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारित करण्याच्या पूर्वी  किमान  3 दिवस  आधी जाहिरात प्रमाणीकरणासाठी  अर्ज करावा.तसेच बिगर  नोंदणीकृत  राजकीय पक्ष  अथवा  अन्य व्यक्तींनी जाहिरात प्रसारित  करण्यापूर्वी  किमान  7 दिवस आधी  अर्ज करणे  आवश्यक आहे. सदरील विहित वेळेत प्रमाणीकरणासाठी  आलेल्या जाहिराती 48 तासांच्या  आत प्रमाणीत  करुन  देण्याची  जबाबदारी  समितीची  असल्याचे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले.

प्रत्येक राजकीय  पक्ष व उमेदवारांनी  प्रसारमाध्यमांतून प्रचार, प्रसिध्दी  करण्यासाठी  जाहिरातीचे पूर्व  प्रमाणीकरण  घेणे  अत्यंत आवश्यक  आहे. तसेच  प्रसारमाध्यमांनीही राजकीय, पक्ष व  उमेदवारांच्या प्रसिध्दीसाठी  आलेल्या जाहिराती  एमसीएमसी  समितीकडून  प्रसारणाचे  प्रमाणपत्र मिळाल्याची  खात्री  करावी व  त्यानंतरच  जाहिराती  प्रसिध्द  कराव्यात व निवडणूक  विभागाला  निर्भिड, मुक्त  व नि:पक्ष वातावरणात  निवडणुका  घेण्यासाठी  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी माध्यम प्रमाणीकरण समितीच्या कार्यपध्दतीबाबत  मार्गदर्शन केले. 

प्रारंभी समितीचे सदस्य सचिव  जिल्हा माहिती अधिकारी आलुरकर यांनी समितीच्या कामकाजाबाबत व कार्यपद्धतीबाबत माहिती  दिली.

****

रविवार, २४ मार्च, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ ,शिक्षक व प्राध्‍यापकांना निवडणूक,विषयक कामे करणे बंधनकारक*

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९

*शिक्षक व प्राध्‍यापकांना निवडणूक*

*विषयक कामे करणे बंधनकारक*


     परभणी, दि. २४ :- निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची घोषणा केली असून निवडणूक विषयक कामे जिल्‍ह्यात सध्‍या सुरु चालू आहेत. दहावी व बारावी परीक्षेसाठी ज्‍या शिक्षक, प्राध्‍यापकांची मॉडरेटर म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे अशा शिक्षक व प्राध्‍यापकांना निवडणूकीच्‍या कामातून वगळण्‍यात यावेत अशा प्रकारच्‍या कुठल्‍याही सुचना  उपसचिव व सह मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांच्‍याकडून अद्याप प्राप्‍त झालेल्‍या नाहीत. त्‍यामुळे शिक्षक व प्राध्‍यापकांना निवडणूक विषयक नेमून दिलेली कामे करणे बंधनकारक आहे. अशी माहिती निवडणूक विभागाकडून  देण्‍यात आली आहे.


 तरी सर्व प्राध्‍यापक व शिक्षकांनी १७- परभणी लोकसभा मतदारसंघात नेमून दिलेले निवडणूकीचे कार्य राष्‍ट्रीय हिताचे असल्‍याने तसेच निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत व कालमर्यादेत पार पाडण्‍यामध्‍ये हयगय होणार नाही, कामकाज अतिशय काळजीपूर्वक बिनचुक व विहीत कालमर्यादेत पार पाडण्‍याची दक्षता घ्‍यावी. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्‍या  कामात निष्‍काळजीपणा केल्‍यास सबंधित अधिकारी- कर्मचा-यांवर निवडणूक आयोगाच्‍या नियमानूसार कार्यवाही करण्‍यात येईल. असे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी, 17- परभणी लोकसभा मतदारसंघ यांनी दिले आहेत.

शनिवार, २३ मार्च, २०१९

शरद पवार यांची मंगळवारी जाहीर सभा

           

परभणी, (उजगरे लक्ष्मण) ः- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांचा उमेदवारी अर्ज 26 मार्च 2019 रोजी दाखल करण्यात येणार आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर यांनी दिली.


आघाडीचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीच चांगलाच जोर लावला असून येत्या 26 मार्च रोजी भव्य शक्तिप्रदर्शन करून राजेश दादा विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शहरातील नूतन विद्यालयापासून सुभाष रोड – शिवाजी चौक – गांधी पार्क मार्गे स्टेडियम मैदान पर्यंत दुपारी 1 ते 3 दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत किमान 60 ते 70 हजार मतदार सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून या रॅलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी 3.00 वाजता मा. शरद पवार यांची स्टेडियम मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी. मंत्री सुरेशराव वरपूडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी मंत्री फौजिया खान, माजी. खा. तुकारामजी रेंगे पाटील, उपमहापौर माजू लाला, भगवान वाघमारे, स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख, किरण सोनटक्के, राजेंद्र वडकर, संतोष बोबडे यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जिल्हा व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था-जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

*लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था* -जिल्हाधिकारी पी.शिवशंकर


परभणी दि. 22- भारत निवडणूक आयोगाने ‘वंचित ना राहो कोणी मतदार’ हे बोधवाक्य या लोकसभा निवडणुकीसाठी घोषित केले आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्र पातळीवरील दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडून आणण्याची व नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

  

 त्यासाठी सर्व स्तरावरील ‘स्वीप’ कार्यकर्त्यांनी व बीएलओनी अशा दिव्यांग मतदारांची पत्त्यासह यादी करून घेऊन त्यांना आणण्या- नेण्याची व्यवस्था व त्यासाठी वाहनाची उपलब्धता आणि सहकार्य करण्यासाठी मदतनीस उपस्थिती आवश्यक असणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक व्हीलचेअरची उपलब्धता ठेवावी प्रत्यक्ष मदतीसाठी सर्व व्यवस्था केली जाईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना आयोगाने दिलेल्या आहेत दिव्यांग जनांच्या संघटना आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी अशा सूचना आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.


मतदार जनजागृती कार्यक्रमाचा म्हणजेच ‘स्विप’ चा आढावा जिल्‍हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सविस्तर सूचना देण्यात आल्या यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रताप सवडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. वंदना वाहुळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. आशा गरुड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर तसेच स्वीप चे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.


*दिव्यांगासाठी PWD अँप*


दिव्यंगाची मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअर ची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी PWD हे मोबाईल अँप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे मोबाईल अँप डाऊनलोड साठी गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. परभणी लोकसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांनी आपली मागणी या अपवर नोंदवावी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या बीएलओ यांच्याकडेही मागणी नोंदवता येईल. या निवडणुकीत एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार,मात्र वंचित बहुजन आघाडीच ठरवणार खाजदार कोण,आज ठरणार मेघना बोर्डीकर निवडणूक रिंगणात राहणार की माघार घेणार.

वंचित बहुजन आघाडी ठरवणार परभणीचा खाजदार.
लक्ष्मण उजगरे_परभणी लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याची चर्चा सध्या मतदार संघात रंगत जरी असली पण येणारी लोकसभा मतदारसंघात खाजदार कोण होणार हे मात्र वंचित बहुजन महासंघच ठरवणार हे मात्र निश्चित आहे.
   कारण परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस/काँग्रेस पार्टीचे राजेश विटेकर तर शिवसेनेकडून संजय जाधव हे निवडणूक रिंगणात आहेत.त्याच बरोबर मेघना बोर्डीकर या अपक्ष म्हणून लोकसभा मतदारसंघात लढणार हे जवळजवळ निश्चित असल्याने शिवसेनचे मतदार फुटणार व त्यात संजय जाधव यांच्यावर नाराज असलेला गट देखील संजय जाधव यांच्या विरोधात काम करणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारांचे मत आहे.म्हणुनच परभणी लोकसभा मतदारसंघाचा खाजदार वंचित बहुजन आघाडी ठरवणार हे मात्र निश्चित.
     परभणी जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. देशातील पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 1951 व 1977 ची लोकसभा निवडणूक वगळता 1984 पर्यंत परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते. परंतु 1989 पासून या जिल्ह्यातून काँग्रेस जवळपास हद्दपार झाली असून शिवसेनेने हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला बनविला आहे. शिवसेनेच्या या विजयात अपक्षांचा मोलाचा वाटा आहे.
1989 साली स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण करून नवे पर्व सुरू केले. या अगोदर शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यताही नव्हती. 1989 साली पहिल्यांदाच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व उभे केले. याच काळात त्यांनी परभणीत मोठी जाहीर सभा घेवून जनतेच्या मनात शिवसेनेबद्दल वेगळे अस्तित्व निर्माण केले. तेव्हापासून या जिल्ह्यात 1998 ची निवडणूक वगळता सातत्याने शिवसेना विजयी होत आली आहे. परंतु या विजयात प्रत्येक वेळी अपक्ष आणि इतर उमेदवारांचा सहभाग लाभला आहे.
1991 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने या जिल्ह्यात पुन्हा पदार्पण केले. त्यावेळी परभणी जिल्ह्यात जनता दलाने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला. यावेळी शिवसेनेकडून अशोकराव देशमुख, जनता दलाकडून प्रताप बांगर तर काँग्रेसकडून माणिकराव भांबळे यांच्यात लढत झाली. अतिशय अटीतटीच्या या लढतीत शिवसेनेला 143293, जनता दलाला 123132 तर काँग्रेसला 118209 मते मिळाली होती. वास्तविक जनता दल आणि काँग्रेस ही पूर्वी एकत्रच होती. परंतु वेगळे लढल्यामुळे त्याचा फटका काँग्रेस आणि जनता दलाला बसला. याशिवाय या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षासह एकूण 23 उमेदवार रिंगणात होते. यापैकी बरेच उमेदवार हे काँग्रेस पक्षाशी निगडीत होते. ही मते फुटल्यामुळे काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला.
1996 मध्ये शिवसेनेकडून सुरेश जाधव तर काँग्रेसकडून अशोक देशमुख यांच्यात लढत झाली. यावेळी अशोक देशमुख यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जनतेने चिडून त्यांच्याविरोधात कौल दिला. यावेळी सुरेश जाधव यांना 230762 तर अशोक देशमुख यांना 115887 मते मिळाली होती. यावेळी पहिल्यांदाच परभणी जिल्ह्यात समाजवादी पार्टीने आपला उमेदवार उतरविला होता. सपाचे उमेदवार राजेश पाटील गोरेगावकर यांना 55407 तर अपक्ष उमेदवार गणेशराव दुधवगावकर यांना 31674 मते मिळाली होती. राजेश गोरेगावकर आणि गणेशराव दुधगावकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासीच होते. परंतु त्यांच्यात फूट पडल्यामुळे काँग्रेसला सहन करावा लागला. या निवडणूकीत 26 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.
1998 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुरेशराव वरपूडकर हे 320415 मते घेवून विजयी झाले होते तर शिवसेनेचे सुरेश जाधव यांना 274922 मते मिळाली होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत केवळ 5 उमेदवार रिंगणात असल्यामुळे काँग्रेसला हा विजय मिळविला आला होता.
1999 साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीत जनतेच्या मनात काँग्रेसबद्दल रोष निर्माण झाला आणि भाजपने अबकी बारी अटलबिहारी हा नारा देत निवडणुक लढविली. या निवडणुकी अगोदर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात स्वदेशी मुद्दा उपस्थित करून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यामध्ये परभणी लोकसभा निवडणुकीत सुरेशराव वरपूडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळी लढल्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला बसला. शिवसेनेचे सुरेश जाधव 254019 मते घेवून विजयी झाले होते तर काँग्रेसचे रावसाहेब जामकर यांना 210354 मते व वरपूडकर यांना 179443 मते मिळाली होती. रावसाहेब जामकर आणि सुरेशराव वरपूडकर एकत्र लढले असते तर काँग्रेसचा विजय निश्‍चित होता.
2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदार संघातून शिवसेनेचे तुकाराम रेंगे पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशराव वरपूडकर यांच्यात लढत झाली. यामध्ये रेंगे पाटील यांनी 339318 मते घेवून विजय मिळविला. तर सुरेशराव वरपूडकर यांना 283147 मतांवर समाधान मानावे लागले. सुरेशराव वरपूडकर यांना समाजवादी पार्टी आणि इतर अपक्षांनी फटका दिल्याने त्यांना पराजित व्हावे लागले. सपाचे गफार मास्टर यांनी 17736 मते तर अपक्ष उमेदवारांनीही बर्‍यापैकी मते घेतल्यामुळे वरपूडकरांना पराभव स्विकारावा लागला हेाता.
2009 साली झालेल्या निवडणुकीत पूर्वीचे काँग्रेसवासी असलेले गणेशराव दुधगावकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेशराव वरपूडकर हे रिंगणात होते. गणेशराव दुधगावकर यांनी 385387 मते घेवून विजय मिळविला हेाता तर सुरेशराव वरपूडकर यांना 319969 मते मिळाली होती. यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जयश्री जामगे या निवडणुक रिंगणात होत्या. त्यांना 64615 मते मिळाली होती. या फुटीच्या मतामुळे वरपूडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. याशिवाय अन्य 16 इतर उमेदवारांच्या मत विभागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.
2014 ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. नरेंद्र मोदी यांनी सर्व देशभर झंझावात निर्माण करून एक भयंकर अशी लाट निर्माण केली. या लाटेत देशातील निवडणुकीचे चित्र बदलून गेले. त्याचा परिणाम परभणी लोकसभा मतदारसंघावरही झाला. या निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना चांगलीच टक्कर दिली. शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे 578455 मते घेवून विजयी झाली असले तरीही विजय भांबळे यांनी 451300 मते मिळविली होती. त्यांच्या पराभवात बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारासह अन्य 18 उमेदवारांनी मोलाचा वाटा उचलला होता. आपसातील गटबाजी आणि अपक्षांचा सहभाग यामुळेच 1989 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेसला आपल्याच बालेकिल्यात सातत्याने हार मानावी लागली आहे. 2019 साली होत असलेल्या निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात येतात आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी किती प्रमाणात कमी होते यावर विजयाचे गणित अवलंबून आहेत. त्यातच मा. प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसला किती धोक्यात आणू शकते यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे.

रविवार, १७ मार्च, २०१९

मर्यादीत व्यक्ती व वाहनांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी मिळणार प्रवेश; आदेश लागू

*मर्यादीत व्यक्ती व वाहनांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी मिळणार प्रवेश; आदेश लागू*


परभणी,दि.16 :-  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणने ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.


परभणीचे जिल्हादंडाधिकारी  पी.शिवशंकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत परभणी जिल्हयात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

शनिवार, १६ मार्च, २०१९

सकल मराठी समाजाचा प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूरच्या उमेदवारीस पाठींबा का….? कारण आरएसएसकडे गेलेला स्वराज्याचा भगवा परत मिळविण्यासाठी….! राजेश खडके सकल मराठी समाज

सकल मराठी समाजाचा प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूरच्या उमेदवारीस पाठींबा का….? कारण आरएसएसकडे गेलेला स्वराज्याचा भगवा परत मिळविण्यासाठी….! राजेश खडके सकल मराठी समाज


स्वराज्य खूप कष्टाने आणि अलुतेदार व बलुतेदार यांच्या बलीदानावर शिवरायांनी उभे केलेले होते हे कोणालाही विसरून चालता येणार नाही.स्वराज्यात तुळापुरला खूप महत्व होते आणि हे महत्व कोणीही आपल्याला सांगणार नाही.स्वराज्य असावे अशी शहाजीराजे यांची संकल्पना होती आणि ती माता जिजाऊ यांचे बरोबर त्यांनी शेअर केली होती.त्यामुळे स्वराज्याचे महत्व माता जिजाऊ याना समजले होते.स्वराज्य उभारणीसाठीची जमीन शहाजीराजे यांनी तयार केली होती हे कोणी आपल्याला सांगणार नाही.परंतु स्वराज्य उभारणीत खूप मोठे योगदान शहाजीराजे यांचे होते त्यामुळे त्यांना झाकण्याचा प्रयत्न सर्वच स्थरावर केला जातोय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण शहाजीराजे यांचे गाव वेरूळ आहे.वेरूळ हे बौध्द लेण्यासाठी प्रसिध्द असलेले ठिकाण आहे.त्यामुळे शहाजीराजे वास्तव्य लेण्यामध्येच गेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.इतिहासात हिंदू नावाचा शब्द केव्हा दाखल झाला याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते असे मानण्यास कोणताही पुरावा उपलब्ध नाही.परंतु भगव्या ध्वजाला ऐतिहासिक महत्व होते हे आपल्याला नाकरून चालणार नाही कारण इतिहासात भगवा ध्वज समतावादी होता याला अनेक पुरावे आहेत.प्रथम भगव्या ध्वजाची निर्मिती ही गौतमीपुत्र सिध्दार्थ यांनी केली आहे.पिंपळाचे वृक्ष प्रथम गौतम बुध्दानी जगा समोर आणलेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि सम्राट अशोक यांनी याच भगव्या ध्वजाला आपल्या समतावादी साम्राज्याचे प्रतिक केले आहे.त्यांच्या नंतर संत नामदेव महाराज यांनी पंढरपूर येथील बौध्द विहारतील गौतम बुद्धांना पांडुरंग म्हणजे कमळाचे फुल असे नाव देऊन वारकरी सांप्रदाय स्थापन करून समतेचे प्रतिक म्हणून हाच भगवा ध्वज वारकरी यांच्या हातात दिलेला आहे.त्यामुळे स्वराज्य संकल्पना असणारे शहाजीराजे यांनी स्वत: पुण्यामध्ये लाल महालाची निर्मिती वासिमचे बांगर यांचेकडून १६१५-१६ मध्ये करून घेतली आहे हे कोणी सांगणार नाही.१६२२ मध्ये नागरवास या गावी हत्तीच्या वजना एवढी तुळा करून त्या वजना एवढे सोने चांदी आणि अन्न धान्य गोरगरीब रयतेमध्ये वाटून १६२२ मध्ये स्वराज्य संकल्पित केले आहे.म्हणून तुळा झालेवरून नागरवास या गावाला तुळापुर असे नाव पडले आहे.हाच समतावादी भगवा ध्वज शिवरायांचा हातामध्ये दिला आणि शिवरायांनी समतावादी स्वराज्य स्थापन केले आहे.शाक्त पंथीय शंभूराजे यांनी वैदिक धर्म पद्धतीत झालेला ६ जून १६७४ चा पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार २४ सप्टेंबर १६७४ मध्ये करून घेतलेला आहे.या राज्याभिषेक पद्धतीला मनुवादी व्यवस्थेने बदनाम करण्याचे षड्यंत्र केले आहे.कारण ज्या देवीची पूजा शंभूराजे करीत होते तिला यांनी अघोरी लोकांची देवी म्हणून जनमानसात पेरण्याचे काम केले आहे.परंतु शंभूराजे ज्या देवीला पुजायचे ती सिंधू संस्कृती मधील पहिली स्त्री राणी होती तिला नेऋती असे म्हणत जिने शेतीचे संशोधन करू अन्न धान्य आणि शेतीच्या अवजारे यांचा शोध लावला,या नेऋतीला शेतात मरीआई म्हणून पूजले जाते.अशांना वैदिक धर्म पंडित कधीही पूजा कारायला जात नाही आणि हे आवर्जून कित्येक वेळा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे.अशा शंभूराजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहिला आहे.बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे गौरवशाली आणि पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिटींगप्रेस काढली होती ती रत्नाकर गायकवाड या मनुवादी गुलामाने उध्वस्थ केली आहे.असा इतिहास पुन्हा उभा राहू नये म्हणून वैदिक धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे जिथे स्वराज्य संकल्पित झाले तेथेच म्हणजे तुळापुर येथे केली आहे हे आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. अशा समतावादी संभाजीराजे यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज “ असे नामकरण करून आपल्याला त्यांचेपासून दूर ठेवलेली आहे हे पण आपण आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे.अशा शंभूराजे यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार याने भीमा कोरेगाव येथे घेऊन उभी राहिलेली जातीयवादी पेशवाई संपविलेली आहे हे पण कोणी सांगणार नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काही कार्य आपण आंबेडकर समर्थक म्हणून आभ्यासायला हवे जसे १९२० साली कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट,संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणे,२४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना का केली आणि हाच दिवस का निवडला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य समातवादी होते हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दाखवून शिवरायांनी केलेला दुसरा राज्याभिषेक दिवसाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.आणि याच दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतावादी भगव्या ध्वजाचाच मान ठेवला आहे.भीमा कोरेगावला भेट देऊन तेथील शूर वीरांना अभिवादन करून महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुस्मृतीचा कायदा मोडून मनुस्मृती दहन करून स्वतंत्र भारताला संविधान देऊन २२ प्रतिज्ञामध्ये १० प्रतिज्ञा समता प्रस्थापित करण्याची घेतली आहे.आणि हाच समतावादी भगवा ध्वज प्रधान करून प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचविण्यासाठी आणि स्वराज्यातील त्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना म्हणजे बामणी व्यावस्थेने वंचित केलेल्या घटकासाठी लढत आहे म्हणून त्यांना संसदेत निवडून पाठविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून सकल मराठी समाजाच्या वतीने त्यांच्या सोलापूर येथील उमेदवारीस सक्रीय पाठींबा आम्ही देत आहोत.

मर्यादीत व्यक्ती व वाहनांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी मिळणार प्रवेश; आदेश लागू

*मर्यादीत व्यक्ती व वाहनांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी मिळणार प्रवेश; आदेश लागू*


परभणी,दि.16 :-  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दाखलनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणने ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.


परभणीचे जिल्हादंडाधिकारी  पी.शिवशंकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत परभणी जिल्हयात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

गुरुवार, १४ मार्च, २०१९

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर,परभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर यांची उमेदवारी जाहीर.

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर.

___________________________________

परभणी-लक्ष्मण उजगरे_लोकसभा निवडणूक २०१९ साठी राष्ट्रवादी काँग्रेस आज दहा लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये परभणी लोकसभेसाठी राजेश विटेकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

        राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माढा, अहमदनगरसह अन्य जागांवरील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. तसेच हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच उर्वरित नावांची घोषणा येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माढा, अहमदनगर, बीड, नाशिक, शिरूर आदी ठिकाणचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर झालेेले नाहीत. तसेच मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावरही आज शिक्कामोर्तब झालेले नाही.


राष्ट्रावादी काँग्रेसचे पहिल्या यादीतील  उमेदवार -


* रायगड - सुनील तटकरे


* बारामती - सुप्रिया सुळे


* सातारा - उदयनराजे भोसले


* कोल्हापूर - धनंजय महाडिक


* बुलडाणा - राजेंद्र शिंगणे 


* जळगाव - गुलाबराव देवकर


* परभणी - राजेश विटेकर


* ईशान्य मुंबई   - संजय दीना पाटील 


*ठाणे - आनंद परांजपे


* कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील


* हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा 


 * लक्षद्विप - मोहम्मद फैझल

मतदारांना मतदान यादीत,नाव नोंदविण्याची शेवटची सं

*मतदारांना मतदान यादीत*

 *नाव नोंदविण्याची शेवटची संधी*


परभणी दि.14:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 17- परभणी लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नमुना-6 मध्ये नावनोंदणीसाठी प्राप्त झालेले दावे नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत निकाली काढून नोंदणी करता येवू शकणार आहे.

 नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत  प्राप्त नमुना-6 अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी तसेच नाव मतदान यादीत आढळून आले नाही तर नमुना क्र.6 भरून बीएलओ किंवा संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावेत. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले यांनी कळविले आहे.

मतदारांना मतदान यादीत,नाव नोंदविण्याची शेवटची सं

*मतदारांना मतदान यादीत*

 *नाव नोंदविण्याची शेवटची संधी*


परभणी दि.14:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 17- परभणी लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नमुना-6 मध्ये नावनोंदणीसाठी प्राप्त झालेले दावे नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत निकाली काढून नोंदणी करता येवू शकणार आहे.

 नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत  प्राप्त नमुना-6 अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी तसेच नाव मतदान यादीत आढळून आले नाही तर नमुना क्र.6 भरून बीएलओ किंवा संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावेत. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले यांनी कळविले आहे.

नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

**नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध*


परभणी,दि.14 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 साठी कार्यक्रम दि.10.03.2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निर्बंध घालण्याची गरज आहे.

1. ईतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे.

2. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चीत केल्याप्रमाणे कागद वापरणे.

3. आयोगाने निश्चीत केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे.


जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी  प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आदेश निर्गमित केले आहेत की, वरीलप्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी.असेही आदेशात नमुद करण्‍यात आले आहे.*


परभणी,दि.14 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 साठी कार्यक्रम दि.10.03.2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व ईतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना खालील बाबीवर निर्बंध घालण्याची गरज आहे.

1. ईतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे.

2. नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चीत केल्याप्रमाणे कागद वापरणे.

3. आयोगाने निश्चीत केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे.


जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी  प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आदेश निर्गमित केले आहेत की, वरीलप्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी.असेही आदेशात नमुद करण्‍यात आले आहे.

सार्वजनिक मालमत्ता विरुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई आदेश लागू

*सार्वजनिक मालमत्ता विरुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई आदेश लागू*


परभणी,दि.14 :-  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अमलात आलेली आहे. माझे असे निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती/संस्था यांचेकडुन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डींग्ज,बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावुन शहराचे विरुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती/संस्था यांचेकडुन होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावुन शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.


भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महानगरपालीका, नगरपालीका व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शीत करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर (नष्ट) करुन ईमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहीराती तात्काळ काढुन घेणे आवश्यक आहे.


जिल्हा दंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशाकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दि.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्‍यात आले आहे.

कार्यालये व विश्रामगृहाच्‍या परिसरात मिरवणुका काढण्यास तसेच घोषणा देणे, सभा घेण्‍यास निर्बंध

*कार्यालये व विश्रामगृहाच्‍या परिसरात मिरवणुका काढण्यास तसेच घोषणा देणे, सभा घेण्‍यास निर्बंध*


 परभणी,दि.14 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्याने, उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनीधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे. निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीने, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृतीस निर्बंध लादण्‍यात आले आहेत.


जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर, यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्‍दारे वरील ठिकाणी वरीलप्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले आहे. सदरील देश दि.11 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्‍यात आले आहेत. असेही आदेशात नमुद करण्‍यात आले आहे.

बुधवार, १३ मार्च, २०१९

निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल’ आणि ‘पीडब्ल्यूडी’ ॲपची निर्मिती* मतदारांसाठी विविध डिजिटल

*निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल’ आणि ‘पीडब्ल्यूडी’ ॲपची निर्मिती*

मतदारांसाठी विविध डिजिटल सुविधा


परभणी, दि. 13 : लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांची सुविधा आणि निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग यावेळेस डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल (cVigil) हे नवे मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करता येईल.

*

असे वापरा ‘सी व्हीजिल’*

सी व्हीजिल ॲपचा वापर निवडणूक अधिसूचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत

 केला जाऊ शकतो. तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हीडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येईल. सिटिजन व्हिजिलन्स अंतर्गत सुरु करण्यात आलेले हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र ठरेल.


आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हीडिओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हीडिओ या ॲपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल.


ॲप वापरकर्त्यास सी व्हिजिल ॲपद्वारे आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते.


तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होईल. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाईल ॲपवर तक्रार करता येईल.


*दिव्यांगांसाठी ॲप*

दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी PWD हे ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे दोन्ही मोबाईल ॲप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.


याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.nic.in या मुख्य संकेतस्थळाचा वापर करता येईल. 1800111950 तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

सोमवार, ११ मार्च, २०१९

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९कार्यक्रम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९

कार्यक्रम


सर्व टप्प्यांमधील मतदानाची मतमोजणी ही २३ मे २०१९ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक हा २७ मे २०१९ आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे 

काटेकोर पालन करावे

- जिल्हाधिकारी पी.शिवशंकर



सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखाची बैठक जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आचार संहितेचे पालन करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीपूर्वी कार्यादेश दिलेल्या व काम सुरु झालेल्या तसेच  काम सुरु न झालेल्या प्रकरणांची माहिती विहित नमुनयात प्रशासनाला सादर करण्यात यावे. कोणत्याही नवीन कामांना मंजूरी देता येणार नाही. सुरु असलेल्या कामांना पुढे चालु ठेवण्यास हरकत नाही. यासंदर्भात काही मार्गदर्शन हवे असल्यास संबंधित विभागाला सचिवस्तरावर पत्रव्यवहार करावा व त्याची प्रत जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात यावी. आचारसंहिता लागू झाली असल्याने कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पाडणारी कृती होऊ नये असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी पी.शिवशंकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी विविध विभागाच्या प्रमुखांनी आचारसंहितेसंबंधी विविध प्रश्न मांडले. त्याचे निरसन यावेळी करण्यात आले.


यापूर्वी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुचना देण्यात आल्या. 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे रोख व्यवहार आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे इतर प्रकारे व्यवहार झाल्या प्रकरणी दररोजचा अहवाल प्रत्येक बँक शाखेने निवडणूक कार्यालयास सादर करावा. याशिवाय निवडणूक उमेदवारांचे स्वतंत्र खाते उघडण्यास सहकार्य करावे. असे सांगून निवडणूक कामकाजात बँकांनी सक्रिय राहून सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी पी.शिवशंकर यांनी केले. यावेळी अग्रणी बँक अधिकारी सुनिल हट्टेकर आणि बँक अधिकारी उपस्थित होते.


याशिवाय जिल्हाधिकारी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेऊन निवडणूक आचारसंहितेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व निवडणूक कालावधीत आचार संहितेचे राजकीय पक्षांकडूनही काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

शनिवार, ९ मार्च, २०१९

पाथरी येथील ज्ञानेश्वर नगर येथे जागतीक महीला दिन उत्साहात साजरा

पाथरी येथील ज्ञानेश्वर नगर येथे जागतीक महीला दिन उत्साहात साजरा

पाथरी(प्रतीनिधी):भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी पाथरी व प्रगती महिला बचत गट ज्ञानेश्वर नगर पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शुक्रवार, ८ मार्च, २०१९

संकल्प संस्थेत जागतिक महिला दिन साजरा..

संकल्प संस्थेत जागतिक महिला दिन साजरा..

      

पाथरी प्रतिनिधी दीनांक (8 मार्च )संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने दिनांक 8 मार्च 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता संकल्प भवन येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा विठ्ठल साळवे जेष्ठ कार्यकर्ते हे होते, सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले, त्यानंतर संकल्प संस्थेत काम करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सन्मान करण्यात आला.

 प्रसंगी रेशमा शेख, सपना राठोड, पूजा गाडे आदी, महिला कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय समारोप करतांना विठ्ठल साळवे म्हणले की महिला ही जगाची जननी आहे, महिला शिवाय घरातील कोणतेच काम शक्य नाही आज महिलांनी सर्व क्षेत्रात कामात आपली ठसा उमटवला आहे, महिला ह्या   मेहनती, सर्व परिवाराची काळजी घेऊन आपली जिमदारी पूर्ण करतात, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब खोपे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली,संचालन, राजु साठे यांनी केले तर आभार वैजनाथ कसबे यांनी केले, कार्यक्रम यशवितेसाठी गब्रू शिंदे, बालाजी सोगे, सावन जोंधळे, शंकर होगे, अंकुश कांबळे,सतीश तोडके, सुरेश लालझरे, यांनी परिश्रम घेतले.

बुधवार, ६ मार्च, २०१९

महिला म्हणुन जिल्हा परीषदेत भावनाताई नखाते यांची कार्यपद्धती उल्लेखनीय

महिला म्हणुन जिल्हा परीषदेत भावनाताई नखाते यांची कार्यपद्धती उल्लेखनीय

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषवृत 

परभणी  (धम्मपाल उजगरे)-तंत्रज्ञानाचे हे युग स्त्री-पुरुष समानतेच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे .स्त्रीचं अस्तित्व हे कृतीतून सिद्ध होत असतं असं व्यक्तिमत्त्व असलेल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा  सौ भावना अनिलराव नखाते यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आढावा घेतला असता दररोज एक शाळा ,एक दवाखाना याला भेट देणे व दुपारी ३ ते ७ वेळेत जिल्हा परीषद मध्ये थांबून समस्या निराकरण करणे व अभ्यासपुर्वक प्रश्नाची सोडवणूक करणे,बुथ कमिटीवर महिलांची नियुक्ती करून पक्ष संघटन मध्ये नाविण्यपूर्णता आणली  हि त्यांची कार्यपद्धती राजकीय नेतृत्वातील महिलांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी  म्हणावी लागेल आपला उपाध्यक्षा पदाचा कार्यभार स्वतः सांभाळण्याचे  धाडसी पाऊल हे राजकीय प्रवासातील परीवर्तन घडवू शकते.

                         सौ भावनाताई नखाते यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाली .विशेष म्हणजे  उपाध्यक्ष पदासाठी कोणतेही आरक्षण नसतानाही केवळ कर्तुत्व व  काम करण्याची इच्छाशक्ती या नेतृत्वगुणामुळे  निरपेक्ष पक्षनेतृत्वाने त्यांना उपाध्यक्षा म्हणून संधी दिली अर्थात या संधीच सोनं व्हाव असा त्यांचा प्रयत्न चालू आहे.बदल हवा असेल तर काही तरी केल पाहीजे हा मंत्र त्यांनी शिक्षण व आरोग्य विभागास देऊन कमालीची सुधारणा घडवून आणली  . त्यांनी शाळेत मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे अध्ययन स्तरनिश्चिती व त्यानंतर अध्ययन निष्पत्ती हे  विशेष उपक्रम कार्यप्रवण करीत शाळा डिजीटल करण्यावर त्यांचा भर आहे.त्याचबरोबर मुले व मुलींची  आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली तसेच ग्रामीण भागातील  पाच आरोग्य उपकेंद्रासाठी ईमारत निधी उपलब्ध करून सुसज्ज ईमारतीचा पायाभरणी शुभारंभ करत .ग्रामीण भागातील  प्राथमिक आरोग्य केंद्रातच महिलांची प्रसूती झाली पाहिजे. हा त्यांचा प्रयत्न महिलांना व त्यांच्या कुटुंबाला होणारा त्रास कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे. आरोग्य सेवा हि  सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सौ नखाते यांची  धडपड सुरू आहे .  तसेच अस्मिता योजनेअंतर्गत कार्ड व सेनिटरी नँपकिन्स चा लाभ खाजगी शाळेतील मुलींना व्हावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांचे कडे केलेला पाठपुरावा  व जि.प. सभागृहातील व्यासपिठावर त्यांचे  कुशल प्रभावी नेतृत्वावरून त्यांच्या कामाची चुणूक निश्चितच लक्षात येते.

     राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये महिला सक्षमीकरणावर भर देऊन बुथ कमिटीवर महिलांची निवड हि बाब हि उल्लेखनीय म्हणावी लागेल.महिला जिल्हाध्यक्षा म्हणुन भावनाताई नखाते यांनी राजधानीत परभणी चा वेगळा ठस्सा उमटविला आहे.

           जिल्हा परिषद अंतर्गत दुर्धर आजाराच्या व्यक्तींना  मदत दिली त्यामध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिले आणि पती निधनानंतर कुटुंब प्रमुख म्हणुन आदर्श मातांचा शोध घेऊन ज्यांनी आपल्या पाल्यांना शासकीय नौकरीत यशस्वी केले त्या कर्तृत्वान महिलांचा सातत्याने गौरव केला हि बाबही विशेष आहे.

पतीची खंबीर साथ व मार्गदर्शन

 पुरुष वर्गाची स्त्रीला साथ मिळत असल्यामुळेच आज स्त्री समानता हे पर्व बघायला मिळत आहे .माझे पती कृऊबास चे सभापती  अनिलराव नखाते यांनी मला जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले एवढेच नव्हे तर वेळोवेळी त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळते त्याच बरोबर आ.बाबाजानी दुर्राणी व जिल्हा परीषद मधिल सहकारी व अधिकारी ,कर्मचारी यांची मधील समन्वयाची भुमीका यामुळे मी हे काम प्रभावीपणे करू शकत आहे असे सौ भावनाताई नखाते यांनी सांगितले

आशा वर्कर्स यांना मानधन व विद्यार्थी फिस करीता ५ लक्ष तरतुद करणारी पहिली जिल्हा परीषद

 सर्वसाधारण महिला प्रसुतीकरीता अशा वर्कर्स यांना जिल्हा परीषद सेस फंडातुन प्रति लाभार्थी २०० रू मानधन देण्याचा निर्णय जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या पुढाकाराने घेतला.तसेच जिल्हा परीषदेतील  ८ वी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एन एम एम  एस हि राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा फिस भरण्यास पैसे नसल्याने परीक्षेस बसत नव्हते त्यामुळे  परीक्षा फी भरण्यासाठी ५ लक्ष रूपयाची तरतुद केली .ज्यामुळे यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार याप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रूपये राष्ट्रीय  शिष्यवृत्ती चा लाभ मिळणार आहे त्यामुळे असे महत्वपूर्ण दोन निर्णय घेणारी  राज्यातील परभणी हि पहिलीच जिल्हा परीषद आहे.जि.प.शाळांसाठी सौर प्लँन्ट,त्याच बरोबर निजामकालीन ४० माध्यमिक शाळापैकी पहिल्या टप्प्यात  १० शाळांना ईमारत बांधकाम निधी मंजुरीसाठी व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा .बचतगट व लघुउद्योग या माध्यमातून केले जाणारे  महिला सक्षमीकरण यामुळे सौ भावनाताई नखाते या महिला नेतृत्वाचे निश्चित कौतुक करावे लागेल.

                नारी शक्तीला सलाम....

            समाजात निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसह ज्या मातांनी आपल्या मुलीला घडवुन प्रशासकीय कामकाज मिळविण्यासाठी यशस्वी केले त्या मुली व माता तसेच सर्व महिलांचे  आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मि अभिनंदन करते.  

             यानिमित्त मी असे सांगू इच्छिते की स्री बद्दल जेथे आदर केला जातो तेथे ईश्वरी अधिष्ठान असते तर जेथे स्री ची आव्हेलना होते तेथे सर्व निष्क्रियता येते. हे प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमधील सत्य आहे .म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनापुरता महिलांचा गौरव न होता दैनंदीन जिवनात महिलांचा आदर झाला पाहिजे.

 सुंदर व्यवस्थापन व क्रियाशिल कौशल्यात अमेरीकन रिपोर्ट मध्ये भारतीय महिलेचा उल्लेख झाला हि बाब महिला वर्गासाठी निश्चितच अभिमानाची आहे.महिलांच्या समस्या सोडविणे व त्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी माझा प्रयत्न आहे 

     महिला व मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे.असे सौ भावना नखाते यांनी स्पष्ट केले.

शनिवार, २ मार्च, २०१९

जिल्हा आरोग्य विभाग,आणि संकल्प एकत्रित काम करून जिल्हा कुपोषण मुक्त आणि ऍनिमिया मुक्त करू- मा. भावना ताई नखाते,

जिल्हा आरोग्य विभाग,आणि संकल्प एकत्रित काम करून जिल्हा कुपोषण मुक्त आणि ऍनिमिया मुक्त करू..

- मा. भावना ताई नखाते, जिल्हा उपाध्यक्ष, तथा आरोग्य , शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, परभणी.

                                                                                  जिल्हा आरोग्य विभाग परभणी व संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने आज दिनांक 2 मार्च 2019 रोजी श्री मंगल कार्यलय परभणी येथे प्रशिक्षण संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षा मा. भावनाताई नखाते जिल्हाउपाध्यक्ष, जिल्हा परिषद, परभणी, होत्या तर प्रमुख पाहुणे मा. डॉ. शिंदे साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी,डॉ. कालिदास चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, मानवत, डॉ. टेंगसे तालुका आरोग्य अधिकारी, पाथरी, डॉ. पवार साहेब, परभणी, डॉ. बिराजदार साहेब, परभणी.                                                                                                           डॉ. अनिल कानडे            मा.डॉ. देशमुख साहेब,                                  एड.संजय केकाण, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, परभणी, संदीप बेंडसुरे, चाईल्ड लाईन परभणी, संस्थेचे अध्यक्ष, अशोक पंडित हे उपस्थित होते,

कार्यक्रमाची  सुरुवात मान्यवरांच्या हस्ते  समई प्रज्वलन करून झाली,संस्थेच्या वतीने  मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले त्यांनंतर मा. सुधाकर क्षीरसागर यांनी प्रास्ताविक करून संस्थेने परिसंवाद घेण्यामागची भूमिका स्पस्ट केली,अध्यक्षीय समारोपात पुढे  बोलताना भावना ताई म्हणाल्या की, संकल्प संस्थेची आभार, त्यांनी खूपच स्तुत उपक्रम राबविण्यात येतात, कुपोषण दूर करण्यासाठी संकल्प ने किशोरी मुली भावी माता यांच्या पासून सुरू केली, गरोदर माता, स्तनदा माता यांनी पुढे करून त्यांना आवश्यक तो आहार घेणे गरजेचे आहे, आज गावात आशा आणि अंगणवाडी ताई शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही आणि संकल्प एकत्रित काम करू, आपल्याला ऍनिमिया मुक्त आणि कुपोषण मुक्त तालुका जिल्हा करू, आरोग्य विभागाच्या सर्व टीम चांगली आहे, आरोग्य विभागाच्या कमी तक्रारी आहे, गावातील mo आणि अंगणवाडी ताई, ANm, गावपातळीवर चांगले काम करतात, चांगल्या कामाला सर्वांचे हात लागणे आवश्यक असते, महिलाना काळजी असते, आपल्या परिवाराची, मुलाची, पतीची त्यामुळे स्वतःकडे लक्ष देत नाहीत, आपण महागडे सेफ आणि बिट खाऊन रक्त वाढत नाही, परंतू भाजी पाला आणि आरोग्यासाठी चे उपयुक्त समज, गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, आजार दूर करण्यासाठी पर्यंत करणे गरजेचे आहे, ग्रामीण भागातील दुर्धर आजारासाठी आम्ही 28 लाखाची मदत केली आहे, आशाताई याना खुल्या प्रवर्गातील प्रसूती साठी 200 रुपयांचे मंजूर केली आहे, जिल्ह्यातील कुपोषण आणि माता मृत्यू दर कमी झालं आहे, सुविधा मिळत नसेल तर आमच्याकडे येणे गरजेचे आहे, सुधाकर भाऊ आणि विठ्ठल भाऊ यांनी आरोग्य वर पाथरी तालुक्यात चांगले काम उभे केले , ग्रामीण भागातील महिलांचे, आणि बाळाचे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी, आणि यांच्या मार्फत आरोग्य विभागाच्या वतीने मिळणाऱ्या सर्व मदत करण्यास मी तयार आहे, संकल्प संस्थने जिल्हात काम उभे करावे, आज घरातून कुपोषण निर्मूलनाचे काम सर्व अंगणवाडी, आणि आशा, ANM, सर्वांनी गावापासून सुरू करावेत, संकल्प आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विध्यमाणे ऍनिमिया मुक्त आणि कुपोषण मुक्त जिल्हा करण्याचा  संकल्प करू, संकल्प संस्थेस शुभेच्छा,

रामचंद्र, CRY, मुंबई, CRY संस्था देशात 26 राज्यात काम करीत असून , मुलांना गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून मुलांसाठी गावात सुविधा मिळण्यासाठी दाते मुंबई ला पैसे जमा करतात आणि संकल्प संस्थेचे माध्यमातून आम्ही तो उपक्रम राबवत आहोत त्यासाठी, आज उपस्थित आशा, अंगणवाडी ताई यांनी संकल्प च्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य काळजी घेण्यासाठी काम करावे असे मार्गदर्शन केले, कार्यक्रमास 282 अंगणवाडी ताई, ANM आणि आणि आरोग्य कर्मचारी यांची  उपस्थिती होती, कर्यक्रमाचे आभार राजू साठे यांनी केले तर संचालन संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांनी केली.

जिल्हा रुग्णालयात 2 मार्च रोजी रोग निदान शिबीराचे आयोजन

जिल्हा रुग्णालयात 2 मार्च रोजी

रोग निदान शिबीराचे आयोजन  


रोग निदान शिबीरामध्ये प्रामुख्याने स्त्रीयांचे आजार विशेषत: गर्भ पिशवीच्या आजाराचे निदान व उपचार, रक्तदाब व मधुमेह तपासणी, मौखीक आरोग्य व मुख कर्करोग तपासणी, मुत्रपिंडाचे आजार, सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान व उपचार, मानसिक रुग्णांची तपासणी, लहान मुलांचे आजार, क्लब फुट, पोटाचे विकार व उपचार, आयुर्वेदिक व होमीओपॅथी तसेच युनानी उपचार पध्दती, आरोग्य प्रदर्शन व आरोग्य विषयक सल्ला, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विविध आजारांचे निदान व शस्त्रक्रिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत विविध आजारांचे निदान व उपचार आदिची सोय करण्यात आली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आजारांवर उपचार करण्याकरीता रुग्णांनी शिबीरास येतेवेळी मुळ आधार कार्ड व राशनकार्ड सोबत घेवून यावेत. असे जिल्हा शल्य चिकित्सक, परभणी यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी

अर्ज सादर करण्याचे आवाहन 


परभणी, दि. 1 :- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना केंद्र शासनामार्फत लागू झाली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगाराकरीता महत्वपूर्ण पेंन्शन योजना असून एलआयसीद्वारे ही चालविली जाते. लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असणे अपेक्षित असून असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी जवळच्या सीएससी केंद्रामध्ये नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी केले आहे.


प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी  असंघटीत क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कामगारांना वय वर्ष 60 नंतर प्रति महिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. असंघटीत क्षेत्रे, घरामधून व्यवाय चालविणारे, रस्त्यावर दुकान लावणारे दुकानदार, वाहनचालक, प्लंबर, टेलर शिंपी, गिरणी कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरा जमा करणारे, बीडी कामगार, शेती कामगार, मोची, धोबी, मनरेगामध्ये करणारे कामगार, भुमिहीन मजदूर आदि असंघटीत क्षेत्रातील वर्गाचा समावेश आहे.


लाभासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असावे,  वयानूसार मासिक हप्ता कमीत कमी 55 रुपये तर जास्तीत जास्त 200रुपये आहे. वयोमानाप्रमाणे मासिक हप्त्याची जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम शासनामार्फत दरमहा जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे, जर एखादी व्यक्ती ईएसआयसी, ईपीएफ व एनपीएसमध्ये सहभागी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेचा लाभ घेतल्यानंतर जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर मृत्यू पश्चात पती, पत्नीला 50 टक्के रक्कम अदा करण्यात येईल.


योजनेची नोंदणी करण्यासाठी आपल्या गावातील सीएससी केंद्रामध्ये  जावून करणे गरजेचे आहे. सीएससी केंद्र चालकाद्वारे ऑनलाईनवर माहिती नोंदवावी. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक बचत खाते पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, भ्रमणध्वनी क्रमांक  लागणार आहे. याची नोंद घ्यावी असे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कळविले आहे.

शुक्रवार, १ मार्च, २०१९

पाथरी येथे एन.डि.आर.एफ.च्या जवानांचे पथ संचनल

पाथरी येथे एन.डि.आर.एफ.च्या जवानांचे पथ संचनल,अधिकारी व कर्मचारी सहीत २२० जवानांचा सहभाग


 

सविस्तर वृत आसे कि सध्या देशा मध्ये लोकसभा निवडणुकच्या  अनुसंघाने व याच बरोबर भारत पाकिस्तान या दोन देशा मध्ये युद्धजन्य परिस्थीती निर्मान झाली आहे याच पार्श्वभुमिवर देशा मध्ये कायदाव सुव्यावस्ता सुव्यावस्तीत राहावी म्हणुन देशातील विविध भागात मधील विभागीय स्तरावर एन.डि.आर.एफ.च्या जवाना मार्फत स्थानीक पोलीस प्रशासना सहीत पथ संचलन केले जात आहे याच अनुशंगाने दि.०१/३/२०१९ रोजी सकाळी ११:३० वा.ते दु. ०१:३० वा.च्या दरम्यान पाथरी पोलीस स्टेशन पासुन पथ संचलनाला सुरुवात करुन शहरातील मुख्यरस्त्याने चौक बाजार,जैतापुर मोहल्ला,फकराबाद मौहल्ला,शिंदे गल्ली पासुन साई रोडने व्हि.आय.पी.काॅलनी,सेलु काॅर्नर,माजलगाव रोडने पोलीस स्टेशन पाथरी आसे पथ संचलन करण्यात आले या पथ संचलना मध्ये परभणी पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्यय व अप्पर पोलीस अधिकारी विश्वपांनसरे यांच्या मार्गदर्शना मध्ये सेलु येथील डि.वाय.एस.पी.तृप्ती जाधव व आर.ए.एफ.चे अधिकारी संतोष कुमार सिंघ,पि.आय.उदय बिर,पि.आय.शिंदे,पि.आय.सैदान,पि.आय.भुमे,पि.आय.तट याच बरोबर पाथरी पोलीस स्टेशन चे ए.पि.आय.बोधगिरे याच बरोबर ए.पि.आय.काशेकर,ए.पि.आय.दिनवर या सहित आर.ए.एफ चे व पाथरी,सेलु,मानवत सहित एकुन २२० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...