शनिवार, २ मार्च, २०१९

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी

अर्ज सादर करण्याचे आवाहन 


परभणी, दि. 1 :- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना केंद्र शासनामार्फत लागू झाली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगाराकरीता महत्वपूर्ण पेंन्शन योजना असून एलआयसीद्वारे ही चालविली जाते. लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असणे अपेक्षित असून असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी जवळच्या सीएससी केंद्रामध्ये नोंदणी करुन याचा लाभ घ्यावा. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी केले आहे.


प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी  असंघटीत क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या कामगारांना वय वर्ष 60 नंतर प्रति महिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. असंघटीत क्षेत्रे, घरामधून व्यवाय चालविणारे, रस्त्यावर दुकान लावणारे दुकानदार, वाहनचालक, प्लंबर, टेलर शिंपी, गिरणी कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, कचरा जमा करणारे, बीडी कामगार, शेती कामगार, मोची, धोबी, मनरेगामध्ये करणारे कामगार, भुमिहीन मजदूर आदि असंघटीत क्षेत्रातील वर्गाचा समावेश आहे.


लाभासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 दरम्यान असावे,  वयानूसार मासिक हप्ता कमीत कमी 55 रुपये तर जास्तीत जास्त 200रुपये आहे. वयोमानाप्रमाणे मासिक हप्त्याची जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम शासनामार्फत दरमहा जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे, जर एखादी व्यक्ती ईएसआयसी, ईपीएफ व एनपीएसमध्ये सहभागी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. योजनेचा लाभ घेतल्यानंतर जर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला तर मृत्यू पश्चात पती, पत्नीला 50 टक्के रक्कम अदा करण्यात येईल.


योजनेची नोंदणी करण्यासाठी आपल्या गावातील सीएससी केंद्रामध्ये  जावून करणे गरजेचे आहे. सीएससी केंद्र चालकाद्वारे ऑनलाईनवर माहिती नोंदवावी. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक बचत खाते पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, भ्रमणध्वनी क्रमांक  लागणार आहे. याची नोंद घ्यावी असे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...