सकल मराठी समाजाचा प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापूरच्या उमेदवारीस पाठींबा का….? कारण आरएसएसकडे गेलेला स्वराज्याचा भगवा परत मिळविण्यासाठी….! राजेश खडके सकल मराठी समाज
स्वराज्य खूप कष्टाने आणि अलुतेदार व बलुतेदार यांच्या बलीदानावर शिवरायांनी उभे केलेले होते हे कोणालाही विसरून चालता येणार नाही.स्वराज्यात तुळापुरला खूप महत्व होते आणि हे महत्व कोणीही आपल्याला सांगणार नाही.स्वराज्य असावे अशी शहाजीराजे यांची संकल्पना होती आणि ती माता जिजाऊ यांचे बरोबर त्यांनी शेअर केली होती.त्यामुळे स्वराज्याचे महत्व माता जिजाऊ याना समजले होते.स्वराज्य उभारणीसाठीची जमीन शहाजीराजे यांनी तयार केली होती हे कोणी आपल्याला सांगणार नाही.परंतु स्वराज्य उभारणीत खूप मोठे योगदान शहाजीराजे यांचे होते त्यामुळे त्यांना झाकण्याचा प्रयत्न सर्वच स्थरावर केला जातोय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण शहाजीराजे यांचे गाव वेरूळ आहे.वेरूळ हे बौध्द लेण्यासाठी प्रसिध्द असलेले ठिकाण आहे.त्यामुळे शहाजीराजे वास्तव्य लेण्यामध्येच गेले आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.इतिहासात हिंदू नावाचा शब्द केव्हा दाखल झाला याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते असे मानण्यास कोणताही पुरावा उपलब्ध नाही.परंतु भगव्या ध्वजाला ऐतिहासिक महत्व होते हे आपल्याला नाकरून चालणार नाही कारण इतिहासात भगवा ध्वज समतावादी होता याला अनेक पुरावे आहेत.प्रथम भगव्या ध्वजाची निर्मिती ही गौतमीपुत्र सिध्दार्थ यांनी केली आहे.पिंपळाचे वृक्ष प्रथम गौतम बुध्दानी जगा समोर आणलेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि सम्राट अशोक यांनी याच भगव्या ध्वजाला आपल्या समतावादी साम्राज्याचे प्रतिक केले आहे.त्यांच्या नंतर संत नामदेव महाराज यांनी पंढरपूर येथील बौध्द विहारतील गौतम बुद्धांना पांडुरंग म्हणजे कमळाचे फुल असे नाव देऊन वारकरी सांप्रदाय स्थापन करून समतेचे प्रतिक म्हणून हाच भगवा ध्वज वारकरी यांच्या हातात दिलेला आहे.त्यामुळे स्वराज्य संकल्पना असणारे शहाजीराजे यांनी स्वत: पुण्यामध्ये लाल महालाची निर्मिती वासिमचे बांगर यांचेकडून १६१५-१६ मध्ये करून घेतली आहे हे कोणी सांगणार नाही.१६२२ मध्ये नागरवास या गावी हत्तीच्या वजना एवढी तुळा करून त्या वजना एवढे सोने चांदी आणि अन्न धान्य गोरगरीब रयतेमध्ये वाटून १६२२ मध्ये स्वराज्य संकल्पित केले आहे.म्हणून तुळा झालेवरून नागरवास या गावाला तुळापुर असे नाव पडले आहे.हाच समतावादी भगवा ध्वज शिवरायांचा हातामध्ये दिला आणि शिवरायांनी समतावादी स्वराज्य स्थापन केले आहे.शाक्त पंथीय शंभूराजे यांनी वैदिक धर्म पद्धतीत झालेला ६ जून १६७४ चा पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार २४ सप्टेंबर १६७४ मध्ये करून घेतलेला आहे.या राज्याभिषेक पद्धतीला मनुवादी व्यवस्थेने बदनाम करण्याचे षड्यंत्र केले आहे.कारण ज्या देवीची पूजा शंभूराजे करीत होते तिला यांनी अघोरी लोकांची देवी म्हणून जनमानसात पेरण्याचे काम केले आहे.परंतु शंभूराजे ज्या देवीला पुजायचे ती सिंधू संस्कृती मधील पहिली स्त्री राणी होती तिला नेऋती असे म्हणत जिने शेतीचे संशोधन करू अन्न धान्य आणि शेतीच्या अवजारे यांचा शोध लावला,या नेऋतीला शेतात मरीआई म्हणून पूजले जाते.अशांना वैदिक धर्म पंडित कधीही पूजा कारायला जात नाही आणि हे आवर्जून कित्येक वेळा प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे.अशा शंभूराजे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहिला आहे.बुध म्हणजे विद्वान आणि भूषण म्हणजे गौरवशाली आणि पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुध्दभूषण” नावाची प्रिटींगप्रेस काढली होती ती रत्नाकर गायकवाड या मनुवादी गुलामाने उध्वस्थ केली आहे.असा इतिहास पुन्हा उभा राहू नये म्हणून वैदिक धर्म पंडित यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे जिथे स्वराज्य संकल्पित झाले तेथेच म्हणजे तुळापुर येथे केली आहे हे आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. अशा समतावादी संभाजीराजे यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज “ असे नामकरण करून आपल्याला त्यांचेपासून दूर ठेवलेली आहे हे पण आपण आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे.अशा शंभूराजे यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार याने भीमा कोरेगाव येथे घेऊन उभी राहिलेली जातीयवादी पेशवाई संपविलेली आहे हे पण कोणी सांगणार नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काही कार्य आपण आंबेडकर समर्थक म्हणून आभ्यासायला हवे जसे १९२० साली कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट,संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणे,२४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना का केली आणि हाच दिवस का निवडला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य समातवादी होते हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला दाखवून शिवरायांनी केलेला दुसरा राज्याभिषेक दिवसाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.आणि याच दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतावादी भगव्या ध्वजाचाच मान ठेवला आहे.भीमा कोरेगावला भेट देऊन तेथील शूर वीरांना अभिवादन करून महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुस्मृतीचा कायदा मोडून मनुस्मृती दहन करून स्वतंत्र भारताला संविधान देऊन २२ प्रतिज्ञामध्ये १० प्रतिज्ञा समता प्रस्थापित करण्याची घेतली आहे.आणि हाच समतावादी भगवा ध्वज प्रधान करून प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचविण्यासाठी आणि स्वराज्यातील त्या अलुतेदार आणि बलुतेदार यांना म्हणजे बामणी व्यावस्थेने वंचित केलेल्या घटकासाठी लढत आहे म्हणून त्यांना संसदेत निवडून पाठविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून सकल मराठी समाजाच्या वतीने त्यांच्या सोलापूर येथील उमेदवारीस सक्रीय पाठींबा आम्ही देत आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा