गुरुवार, १४ मार्च, २०१९

मतदारांना मतदान यादीत,नाव नोंदविण्याची शेवटची सं

*मतदारांना मतदान यादीत*

 *नाव नोंदविण्याची शेवटची संधी*


परभणी दि.14:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 17- परभणी लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नमुना-6 मध्ये नावनोंदणीसाठी प्राप्त झालेले दावे नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत निकाली काढून नोंदणी करता येवू शकणार आहे.

 नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत  प्राप्त नमुना-6 अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी मतदान यादीत नाव असल्याची खात्री करावी तसेच नाव मतदान यादीत आढळून आले नाही तर नमुना क्र.6 भरून बीएलओ किंवा संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावेत. असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...