जिल्हा आरोग्य विभाग,आणि संकल्प एकत्रित काम करून जिल्हा कुपोषण मुक्त आणि ऍनिमिया मुक्त करू..
- मा. भावना ताई नखाते, जिल्हा उपाध्यक्ष, तथा आरोग्य , शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, परभणी.
जिल्हा आरोग्य विभाग परभणी व संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने आज दिनांक 2 मार्च 2019 रोजी श्री मंगल कार्यलय परभणी येथे प्रशिक्षण संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षा मा. भावनाताई नखाते जिल्हाउपाध्यक्ष, जिल्हा परिषद, परभणी, होत्या तर प्रमुख पाहुणे मा. डॉ. शिंदे साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी, परभणी,डॉ. कालिदास चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, मानवत, डॉ. टेंगसे तालुका आरोग्य अधिकारी, पाथरी, डॉ. पवार साहेब, परभणी, डॉ. बिराजदार साहेब, परभणी. डॉ. अनिल कानडे मा.डॉ. देशमुख साहेब, एड.संजय केकाण, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, परभणी, संदीप बेंडसुरे, चाईल्ड लाईन परभणी, संस्थेचे अध्यक्ष, अशोक पंडित हे उपस्थित होते,
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलन करून झाली,संस्थेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यांनंतर मा. सुधाकर क्षीरसागर यांनी प्रास्ताविक करून संस्थेने परिसंवाद घेण्यामागची भूमिका स्पस्ट केली,अध्यक्षीय समारोपात पुढे बोलताना भावना ताई म्हणाल्या की, संकल्प संस्थेची आभार, त्यांनी खूपच स्तुत उपक्रम राबविण्यात येतात, कुपोषण दूर करण्यासाठी संकल्प ने किशोरी मुली भावी माता यांच्या पासून सुरू केली, गरोदर माता, स्तनदा माता यांनी पुढे करून त्यांना आवश्यक तो आहार घेणे गरजेचे आहे, आज गावात आशा आणि अंगणवाडी ताई शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही आणि संकल्प एकत्रित काम करू, आपल्याला ऍनिमिया मुक्त आणि कुपोषण मुक्त तालुका जिल्हा करू, आरोग्य विभागाच्या सर्व टीम चांगली आहे, आरोग्य विभागाच्या कमी तक्रारी आहे, गावातील mo आणि अंगणवाडी ताई, ANm, गावपातळीवर चांगले काम करतात, चांगल्या कामाला सर्वांचे हात लागणे आवश्यक असते, महिलाना काळजी असते, आपल्या परिवाराची, मुलाची, पतीची त्यामुळे स्वतःकडे लक्ष देत नाहीत, आपण महागडे सेफ आणि बिट खाऊन रक्त वाढत नाही, परंतू भाजी पाला आणि आरोग्यासाठी चे उपयुक्त समज, गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, आजार दूर करण्यासाठी पर्यंत करणे गरजेचे आहे, ग्रामीण भागातील दुर्धर आजारासाठी आम्ही 28 लाखाची मदत केली आहे, आशाताई याना खुल्या प्रवर्गातील प्रसूती साठी 200 रुपयांचे मंजूर केली आहे, जिल्ह्यातील कुपोषण आणि माता मृत्यू दर कमी झालं आहे, सुविधा मिळत नसेल तर आमच्याकडे येणे गरजेचे आहे, सुधाकर भाऊ आणि विठ्ठल भाऊ यांनी आरोग्य वर पाथरी तालुक्यात चांगले काम उभे केले , ग्रामीण भागातील महिलांचे, आणि बाळाचे आरोग्य चांगल्या राहण्यासाठी, आणि यांच्या मार्फत आरोग्य विभागाच्या वतीने मिळणाऱ्या सर्व मदत करण्यास मी तयार आहे, संकल्प संस्थने जिल्हात काम उभे करावे, आज घरातून कुपोषण निर्मूलनाचे काम सर्व अंगणवाडी, आणि आशा, ANM, सर्वांनी गावापासून सुरू करावेत, संकल्प आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विध्यमाणे ऍनिमिया मुक्त आणि कुपोषण मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करू, संकल्प संस्थेस शुभेच्छा,
रामचंद्र, CRY, मुंबई, CRY संस्था देशात 26 राज्यात काम करीत असून , मुलांना गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून मुलांसाठी गावात सुविधा मिळण्यासाठी दाते मुंबई ला पैसे जमा करतात आणि संकल्प संस्थेचे माध्यमातून आम्ही तो उपक्रम राबवत आहोत त्यासाठी, आज उपस्थित आशा, अंगणवाडी ताई यांनी संकल्प च्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य काळजी घेण्यासाठी काम करावे असे मार्गदर्शन केले, कार्यक्रमास 282 अंगणवाडी ताई, ANM आणि आणि आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती होती, कर्यक्रमाचे आभार राजू साठे यांनी केले तर संचालन संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा