शुक्रवार, ८ मार्च, २०१९

संकल्प संस्थेत जागतिक महिला दिन साजरा..

संकल्प संस्थेत जागतिक महिला दिन साजरा..

      

पाथरी प्रतिनिधी दीनांक (8 मार्च )संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने दिनांक 8 मार्च 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता संकल्प भवन येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा विठ्ठल साळवे जेष्ठ कार्यकर्ते हे होते, सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले, त्यानंतर संकल्प संस्थेत काम करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सन्मान करण्यात आला.

 प्रसंगी रेशमा शेख, सपना राठोड, पूजा गाडे आदी, महिला कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय समारोप करतांना विठ्ठल साळवे म्हणले की महिला ही जगाची जननी आहे, महिला शिवाय घरातील कोणतेच काम शक्य नाही आज महिलांनी सर्व क्षेत्रात कामात आपली ठसा उमटवला आहे, महिला ह्या   मेहनती, सर्व परिवाराची काळजी घेऊन आपली जिमदारी पूर्ण करतात, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब खोपे यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली,संचालन, राजु साठे यांनी केले तर आभार वैजनाथ कसबे यांनी केले, कार्यक्रम यशवितेसाठी गब्रू शिंदे, बालाजी सोगे, सावन जोंधळे, शंकर होगे, अंकुश कांबळे,सतीश तोडके, सुरेश लालझरे, यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...