परभणी, (उजगरे लक्ष्मण) ः- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांचा उमेदवारी अर्ज 26 मार्च 2019 रोजी दाखल करण्यात येणार आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर यांनी दिली.
आघाडीचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीच चांगलाच जोर लावला असून येत्या 26 मार्च रोजी भव्य शक्तिप्रदर्शन करून राजेश दादा विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शहरातील नूतन विद्यालयापासून सुभाष रोड – शिवाजी चौक – गांधी पार्क मार्गे स्टेडियम मैदान पर्यंत दुपारी 1 ते 3 दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत किमान 60 ते 70 हजार मतदार सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून या रॅलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी 3.00 वाजता मा. शरद पवार यांची स्टेडियम मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी. मंत्री सुरेशराव वरपूडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी मंत्री फौजिया खान, माजी. खा. तुकारामजी रेंगे पाटील, उपमहापौर माजू लाला, भगवान वाघमारे, स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख, किरण सोनटक्के, राजेंद्र वडकर, संतोष बोबडे यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जिल्हा व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा