*कार्यालये व विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढण्यास तसेच घोषणा देणे, सभा घेण्यास निर्बंध*
परभणी,दि.14 :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय अधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्याने, उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनीधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे. निवडणूकी संबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटींग्स, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहीने, किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृतीस निर्बंध लादण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर, यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्दारे वरील ठिकाणी वरीलप्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालीत आहे. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले आहे. सदरील देश दि.11 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा