लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९
*शिक्षक व प्राध्यापकांना निवडणूक*
*विषयक कामे करणे बंधनकारक*
परभणी, दि. २४ :- निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची घोषणा केली असून निवडणूक विषयक कामे जिल्ह्यात सध्या सुरु चालू आहेत. दहावी व बारावी परीक्षेसाठी ज्या शिक्षक, प्राध्यापकांची मॉडरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अशा शिक्षक व प्राध्यापकांना निवडणूकीच्या कामातून वगळण्यात यावेत अशा प्रकारच्या कुठल्याही सुचना उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक व प्राध्यापकांना निवडणूक विषयक नेमून दिलेली कामे करणे बंधनकारक आहे. अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
तरी सर्व प्राध्यापक व शिक्षकांनी १७- परभणी लोकसभा मतदारसंघात नेमून दिलेले निवडणूकीचे कार्य राष्ट्रीय हिताचे असल्याने तसेच निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत व कालमर्यादेत पार पाडण्यामध्ये हयगय होणार नाही, कामकाज अतिशय काळजीपूर्वक बिनचुक व विहीत कालमर्यादेत पार पाडण्याची दक्षता घ्यावी. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या कामात निष्काळजीपणा केल्यास सबंधित अधिकारी- कर्मचा-यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानूसार कार्यवाही करण्यात येईल. असे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, 17- परभणी लोकसभा मतदारसंघ यांनी दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा