शुक्रवार, २२ मार्च, २०१९

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था-जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

*लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था* -जिल्हाधिकारी पी.शिवशंकर


परभणी दि. 22- भारत निवडणूक आयोगाने ‘वंचित ना राहो कोणी मतदार’ हे बोधवाक्य या लोकसभा निवडणुकीसाठी घोषित केले आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्र पातळीवरील दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदानासाठी निवडणूक यंत्रणेकडून आणण्याची व नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

  

 त्यासाठी सर्व स्तरावरील ‘स्वीप’ कार्यकर्त्यांनी व बीएलओनी अशा दिव्यांग मतदारांची पत्त्यासह यादी करून घेऊन त्यांना आणण्या- नेण्याची व्यवस्था व त्यासाठी वाहनाची उपलब्धता आणि सहकार्य करण्यासाठी मदतनीस उपस्थिती आवश्यक असणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक व्हीलचेअरची उपलब्धता ठेवावी प्रत्यक्ष मदतीसाठी सर्व व्यवस्था केली जाईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना आयोगाने दिलेल्या आहेत दिव्यांग जनांच्या संघटना आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी अशा सूचना आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.


मतदार जनजागृती कार्यक्रमाचा म्हणजेच ‘स्विप’ चा आढावा जिल्‍हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सविस्तर सूचना देण्यात आल्या यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक प्रताप सवडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. वंदना वाहुळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. आशा गरुड, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर तसेच स्वीप चे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.


*दिव्यांगासाठी PWD अँप*


दिव्यंगाची मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअर ची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी PWD हे मोबाईल अँप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे मोबाईल अँप डाऊनलोड साठी गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. परभणी लोकसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांनी आपली मागणी या अपवर नोंदवावी तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या बीएलओ यांच्याकडेही मागणी नोंदवता येईल. या निवडणुकीत एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...