महिला म्हणुन जिल्हा परीषदेत भावनाताई नखाते यांची कार्यपद्धती उल्लेखनीय
आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषवृत
परभणी (धम्मपाल उजगरे)-तंत्रज्ञानाचे हे युग स्त्री-पुरुष समानतेच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे .स्त्रीचं अस्तित्व हे कृतीतून सिद्ध होत असतं असं व्यक्तिमत्त्व असलेल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण व आरोग्य सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा सौ भावना अनिलराव नखाते यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आढावा घेतला असता दररोज एक शाळा ,एक दवाखाना याला भेट देणे व दुपारी ३ ते ७ वेळेत जिल्हा परीषद मध्ये थांबून समस्या निराकरण करणे व अभ्यासपुर्वक प्रश्नाची सोडवणूक करणे,बुथ कमिटीवर महिलांची नियुक्ती करून पक्ष संघटन मध्ये नाविण्यपूर्णता आणली हि त्यांची कार्यपद्धती राजकीय नेतृत्वातील महिलांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी म्हणावी लागेल आपला उपाध्यक्षा पदाचा कार्यभार स्वतः सांभाळण्याचे धाडसी पाऊल हे राजकीय प्रवासातील परीवर्तन घडवू शकते.
सौ भावनाताई नखाते यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाली .विशेष म्हणजे उपाध्यक्ष पदासाठी कोणतेही आरक्षण नसतानाही केवळ कर्तुत्व व काम करण्याची इच्छाशक्ती या नेतृत्वगुणामुळे निरपेक्ष पक्षनेतृत्वाने त्यांना उपाध्यक्षा म्हणून संधी दिली अर्थात या संधीच सोनं व्हाव असा त्यांचा प्रयत्न चालू आहे.बदल हवा असेल तर काही तरी केल पाहीजे हा मंत्र त्यांनी शिक्षण व आरोग्य विभागास देऊन कमालीची सुधारणा घडवून आणली . त्यांनी शाळेत मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे अध्ययन स्तरनिश्चिती व त्यानंतर अध्ययन निष्पत्ती हे विशेष उपक्रम कार्यप्रवण करीत शाळा डिजीटल करण्यावर त्यांचा भर आहे.त्याचबरोबर मुले व मुलींची आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली तसेच ग्रामीण भागातील पाच आरोग्य उपकेंद्रासाठी ईमारत निधी उपलब्ध करून सुसज्ज ईमारतीचा पायाभरणी शुभारंभ करत .ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच महिलांची प्रसूती झाली पाहिजे. हा त्यांचा प्रयत्न महिलांना व त्यांच्या कुटुंबाला होणारा त्रास कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे. आरोग्य सेवा हि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी सौ नखाते यांची धडपड सुरू आहे . तसेच अस्मिता योजनेअंतर्गत कार्ड व सेनिटरी नँपकिन्स चा लाभ खाजगी शाळेतील मुलींना व्हावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांचे कडे केलेला पाठपुरावा व जि.प. सभागृहातील व्यासपिठावर त्यांचे कुशल प्रभावी नेतृत्वावरून त्यांच्या कामाची चुणूक निश्चितच लक्षात येते.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये महिला सक्षमीकरणावर भर देऊन बुथ कमिटीवर महिलांची निवड हि बाब हि उल्लेखनीय म्हणावी लागेल.महिला जिल्हाध्यक्षा म्हणुन भावनाताई नखाते यांनी राजधानीत परभणी चा वेगळा ठस्सा उमटविला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत दुर्धर आजाराच्या व्यक्तींना मदत दिली त्यामध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिले आणि पती निधनानंतर कुटुंब प्रमुख म्हणुन आदर्श मातांचा शोध घेऊन ज्यांनी आपल्या पाल्यांना शासकीय नौकरीत यशस्वी केले त्या कर्तृत्वान महिलांचा सातत्याने गौरव केला हि बाबही विशेष आहे.
पतीची खंबीर साथ व मार्गदर्शन
पुरुष वर्गाची स्त्रीला साथ मिळत असल्यामुळेच आज स्त्री समानता हे पर्व बघायला मिळत आहे .माझे पती कृऊबास चे सभापती अनिलराव नखाते यांनी मला जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले एवढेच नव्हे तर वेळोवेळी त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळते त्याच बरोबर आ.बाबाजानी दुर्राणी व जिल्हा परीषद मधिल सहकारी व अधिकारी ,कर्मचारी यांची मधील समन्वयाची भुमीका यामुळे मी हे काम प्रभावीपणे करू शकत आहे असे सौ भावनाताई नखाते यांनी सांगितले
आशा वर्कर्स यांना मानधन व विद्यार्थी फिस करीता ५ लक्ष तरतुद करणारी पहिली जिल्हा परीषद
सर्वसाधारण महिला प्रसुतीकरीता अशा वर्कर्स यांना जिल्हा परीषद सेस फंडातुन प्रति लाभार्थी २०० रू मानधन देण्याचा निर्णय जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या पुढाकाराने घेतला.तसेच जिल्हा परीषदेतील ८ वी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एन एम एम एस हि राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा फिस भरण्यास पैसे नसल्याने परीक्षेस बसत नव्हते त्यामुळे परीक्षा फी भरण्यासाठी ५ लक्ष रूपयाची तरतुद केली .ज्यामुळे यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार याप्रमाणे चार वर्षांत ४८ हजार रूपये राष्ट्रीय शिष्यवृत्ती चा लाभ मिळणार आहे त्यामुळे असे महत्वपूर्ण दोन निर्णय घेणारी राज्यातील परभणी हि पहिलीच जिल्हा परीषद आहे.जि.प.शाळांसाठी सौर प्लँन्ट,त्याच बरोबर निजामकालीन ४० माध्यमिक शाळापैकी पहिल्या टप्प्यात १० शाळांना ईमारत बांधकाम निधी मंजुरीसाठी व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा .बचतगट व लघुउद्योग या माध्यमातून केले जाणारे महिला सक्षमीकरण यामुळे सौ भावनाताई नखाते या महिला नेतृत्वाचे निश्चित कौतुक करावे लागेल.
नारी शक्तीला सलाम....
समाजात निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसह ज्या मातांनी आपल्या मुलीला घडवुन प्रशासकीय कामकाज मिळविण्यासाठी यशस्वी केले त्या मुली व माता तसेच सर्व महिलांचे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मि अभिनंदन करते.
यानिमित्त मी असे सांगू इच्छिते की स्री बद्दल जेथे आदर केला जातो तेथे ईश्वरी अधिष्ठान असते तर जेथे स्री ची आव्हेलना होते तेथे सर्व निष्क्रियता येते. हे प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमधील सत्य आहे .म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनापुरता महिलांचा गौरव न होता दैनंदीन जिवनात महिलांचा आदर झाला पाहिजे.
सुंदर व्यवस्थापन व क्रियाशिल कौशल्यात अमेरीकन रिपोर्ट मध्ये भारतीय महिलेचा उल्लेख झाला हि बाब महिला वर्गासाठी निश्चितच अभिमानाची आहे.महिलांच्या समस्या सोडविणे व त्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी माझा प्रयत्न आहे
महिला व मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे.असे सौ भावना नखाते यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा